Category: India

गृहमंत्री असताना लाल चौकात जाण्याची भीती वाटत होती- शिंदे:केंंद्रीय गृहमंत्री असतानाच्या काळातील स्थिती सांगितली

मनमोहन सिंग सरकारमध्ये गृहमंत्री असलेले सुशीलकुमार शिंदे जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. तेे मंगळवारी दिल्लीत म्हणाले की ‘मी देशाचा गृहमंत्री असताना जम्मू-काश्मीरच्या लाल चौक आणि दल सरोवरात जायची भीती वाटायची.’ दिल्लीतील इंडिया इंटरनॅशनल सेंटरमध्ये सोमवारी त्यांच्या ‘फाइव्ह डिकेड्स ऑफ पॉलिटिक्स’ या पुस्तकाच्या लोकार्पण कार्यक्रमात शिंदे बोलत होते. या वेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, दिग्विजय सिंह आणि...

मणिपूर पेटले; विद्यार्थ्यांचे हिंसक आंदोलन, 60 जखमी:इंफाळमध्ये कर्फ्यू, इंटरनेट बंद, 6 मागण्यांवर 24 तासांचा अल्टिमेटम संपताच सुरक्षा दलांशी भिडले विद्यार्थी

मणिपुरात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या शाळा-कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने मंगळवारी हिंसक वळण घेतले. विद्यार्थ्यांनी राज्य सरकारकडे ६ मागण्या पाठवल्या होत्या व त्या मान्य करण्यासाठी २४ तासांचा अल्टिमेटम दिला होता. मात्र, सरकारकडून कोणतेच उत्तर आले नसल्याने सुमारे २५०० विद्यार्थी संतप्त झाले. स्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून राज्य सरकारने सकाळी ११ वाजता इंफाळ पूर्व आणि पश्चिम जिल्ह्यात कर्फ्यू लावला. संपूर्ण राज्यात इंटरनेट, मोबाइल...

मणिपूरच्या इंफाळमध्ये कर्फ्यू लागू:काल मणिपूर राजभवनावर झाली होती दगडफेक, महिलांनी काढला होता मशाल मोर्चा

मणिपूरमधील इंफाळमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. येथे ड्रोन हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी (9 सप्टेंबर) रात्री महिलांनी मशाल मिरवणूक काढली. हे लोक डीजीपी आणि सुरक्षा सल्लागारांना हटवण्याची मागणी करत आहेत. आंदोलकांनी इम्फाळच्या थंगामीबंदमध्ये मशाल आणि पोस्टर घेऊन मोर्चा काढला आणि घोषणाबाजी केली. याआधी सोमवारीच आंदोलकांनी राजभवनावर दगडफेक केली होती. विद्यार्थ्यांचे नेतृत्व करणारे एम. सनाथोई चानू म्हणाले – आम्ही राज्य सरकारचे सुरक्षा...

सुशीलकुमार शिंदे म्हणाले- गृहमंत्री असताना काश्मीरला जायची भीती वाटायची:भाजपने म्हटले- आता विरोधी पक्षनेते तिथे बर्फ खेळतात; शिंदे मनमोहन मंत्रिमंडळात होते

मनमोहन सिंग सरकारमध्ये गृहमंत्री असलेले सुशील शिंदे जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. शिंदे मंगळवारी दिल्लीत म्हणाले – ‘मी देशाचा गृहमंत्री असताना जम्मू-काश्मीरच्या लाल चौक आणि दल सरोवरात जायची भीती वाटायची.’ शिंदे यांच्या वक्तव्यावर केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल म्हणाले, ‘काँग्रेस सरकारमध्ये देशाचे गृहमंत्रीही काश्मीरला जायला घाबरत होते. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देशाची सुरक्षा बळकट झाली आहे. आता विरोधी...

वायुसेनेच्या विंग कमांडरवर ज्युनिअरवर बलात्काराचा आरोप, FIR:दोन्ही अधिकारी श्रीनगरमध्ये तैनात; पीडिता म्हणाली- 2 वर्षांपासून शोषणाची बळी

भारतीय हवाई दलाच्या महिला फ्लाइंग ऑफिसरने विंग कमांडरवर बलात्काराचा आरोप केला होता. जम्मू-काश्मीरमधील बडगाममध्ये या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. दोन्ही अधिकारी श्रीनगरमध्येच तैनात आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हवाई दलाने सांगितले की, बडगामच्या पोलीस स्टेशनने आमच्याशी संपर्क केला. आम्ही या प्रकरणात अधिकाऱ्यांना सहकार्य करत आहोत. आम्हाला या प्रकरणाची माहिती आहे. एनडीटीव्हीच्या रिपोर्टनुसार, एफआयआरमध्ये महिला अधिकाऱ्याने म्हटले आहे की, गेल्या...

मणिपूरमध्ये राजभवनात जाणारे विद्यार्थी सुरक्षा दलाशी भिडले:आंदोलकांनी RAF वर छर्ऱ्याच्या गोळ्या झाडल्या; 2 जिल्ह्यांत संचारबंदी, 6 दिवस इंटरनेट बंदी

मणिपूरमध्ये मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांचे हिंसक आंदोलन सुरूच आहे. राजभवनाच्या दिशेने निघालेल्या विद्यार्थ्यांची सुरक्षा दलांशी झटापट झाली. विद्यार्थ्यांनी सुरक्षा दलांवर दगडफेक केली आणि गुलेरमधून छऱ्याच्या गोळ्या झाडल्या. यानंतर आंदोलकांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. ९ सप्टेंबरलाही विद्यार्थ्यांनी राजभवनावर दगडफेक केली होती, त्यानंतर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या आणि रबराच्या गोळ्या झाडल्या होत्या. तर 20 हून अधिक जण जखमी झाले आहेत. 9 सप्टेंबरच्या...

जमावाकडून मारहाणीच्या भीतीने जीव दिला:यूपीत मूले चोरीचा संशय, लोकांनी पाठलाग केला, 8 तास पुलावर बसून राहिला, नंतर उडी मारली

जौनपूरमध्ये मॉब लिंचिंगपासून वाचण्यासाठी एका तरुणाने पुलावरून उडी मारून आत्महत्या केली. मूले चोरीच्या संशयावरून जमाव त्याच्या मागे लागला. वाचण्यासाठी तो ओव्हर ब्रिजवर चढला. सुमारे 8 तास ओव्हरब्रिजवर बसून राहिला, खाली गर्दी होती. आयजीही घटनास्थळी पोहोचले. त्यांनी त्याला खाली उतरण्यास सांगितले. पण, तो इतका घाबरला होता की तो खाली आलाच नाही. अखेर 8 तासानंतर त्याने उडी मारून आत्महत्या केली. हे प्रकरण...

काँग्रेसने संसदेच्या 6 स्थायी समित्यांचे अध्यक्षपद मागितले:सरकारने 4 देण्याचे मान्य केले; सपा-द्रमुकला प्रत्येकी एक मिळू शकते, 24 समित्या

मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात अद्याप संसदीय स्थायी समितीचे विभाजन झालेले नाही. एकूण 24 संसदीय समित्या (लोकसभा-राज्यसभा) आहेत. या समित्यांमध्ये त्यांच्या पक्षाने जिंकलेल्या जागांच्या आधारे खासदारांचा समावेश केला जातो. यावेळी काँग्रेसने 6 स्थायी समित्यांच्या अध्यक्षपदाची मागणी केली आहे. मात्र, सरकार चार देण्यास तयार आहे. काँग्रेसने संरक्षण आणि अर्थविषयक समितीची मागणी केली असली तरी सरकार त्यांना परराष्ट्र व्यवहार समितीचे अध्यक्षपद देऊ शकते....

CPM महासचिव सीताराम येचुरींची प्रकृती चिंताजनक:23 दिवसांपासून दिल्ली एम्समध्ये उपचार सुरू; श्वसन संसर्गामुळे ICUत दाखल

सीपीएमचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांना 19 ऑगस्ट रोजी खूप ताप आल्याने दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. 23 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सीपीएमने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘कॉम्रेड सीताराम येचुरी यांना श्वसनाच्या गंभीर संसर्गाने ग्रासले आहे. डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर उपचार करत असून त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन आहे. वृत्तसंस्था...

हरियाणात भाजपची 21 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर:आतापर्यंत 90 पैकी 87 जागांवर घोषणा, एक उमेदवार बदलला, 2 मंत्र्यांची तिकिटे रद्द

भाजपने हरियाणातील उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत 21 उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. या यादीत भाजपने 2 मंत्र्यांची तिकिटे कापली आहेत. एका जागेवरील उमेदवार बदलला आहे. गेल्या निवडणुकीत पराभूत झालेले दोन माजी मंत्री पुन्हा निवडून आले आहेत. भाजपने पहिल्या यादीत 67 उमेदवारांची घोषणा केली होती. भाजपने आतापर्यंत 90 पैकी 87 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपच्या दुसऱ्या...