Category: marathi

पातूर तालुक्यात ३२ गावांत ‘एक गाव एक गणपती’:गावातील तरुणाईचा पुढाकार; एकूण १७२ मंडळांकडून गणरायाची स्थापना

पातूर तालुक्यात ३२ गावांत ‘एक गाव एक गणपती’:गावातील तरुणाईचा पुढाकार; एकूण १७२ मंडळांकडून गणरायाची स्थापना

अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री गणेश गणपती बाप्पाचे जल्लोषात स्वागत झाले. गणेशोत्सवा दरम्यान शांतता व सुव्यवस्था टिकून राहावी, यासाठी तसेच राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टिकोनातून ‘एक गाव एक गणपती” ही संकल्पना पुढे आली आहे. पातूर तालुक्यात एकूण १७२ गणेश मंडळांनी श्री गणेशाची स्थापना केली. यामध्ये एकूण ३२ गावांमध्ये ”एक गाव एक गणपती” यासाठी पुढाकार घेण्यात आला.‌ या मोहिमेत गावातील तरुणाईने पुढाकार घेऊन समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. गणपती बाप्पाच्या उत्सवात प्रत्येकजण दंग झाला आहे. शहरांमध्ये, गावांमध्ये ठिकठिकाणी गणपती बाप्पा मोरयाचा गजर होताना दिसत आहे. वातावरण भक्तिमय झाले आहे.‌लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्याच्या चळवळीत लोकांनी एकत्र यावे म्हणून गणेशोत्सव सार्वजनिक स्वरुपात साजरा करायला सुरुवात केली आणि बघता बघता या उत्सवाचे स्वरुप व्यापक झाले. या उत्सवाला सामाजिकतेचे, समाजोपयोगी उपक्रमाचे स्वरुप देत गेल्या अनेक वर्षांपासून अनेक गावांमध्ये ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना रुढ झाली आहे. गावात सर्वांचा मिळून एकच गणपती बसवला जातो. गणपती उत्सवात गोळा होणाऱ्या वर्गणीतून गावाच्या विकासाची, समाजोपयोगी कामे होऊ लागली आहेत. यंदा पातूर तालुक्यात १७२ गणेश मंडळांनी नोंदणी केली आहे. पातूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकुण ९२गणपती मंडळाची स्थापना करण्यात आली. यामध्ये शहरी भागात २१ तर ग्रामीण भागात ७१ गणेश मंडळांची स्थापना झाली आहे. त्यापैकी ‘एक गाव एक गणपती’ या मोहिमेत २० गावांनी सहभाग नोंदवला आहे. तसेच चान्नी पोलिस स्टेशनच्या हद्दीत एकुण ८० गणपती मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये दोन शहरी मंडळांचा सहभाग आहे तर ग्रामीण भागात ७८ गणपती मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. उपक्रमाला चांगला प्रतिसाद चान्नी पोलिस ठाणे अंतर्गत येत असलेल्या १२ गावांमध्ये ‘एक गाव एक गणपती’ या उपक्रमातून एका मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला. आपसातील वैर नष्ट व्हावे, एकोपा कायम राहावा, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये अशा सूचना केल्याने “एक गाव एक गणपती’ या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. – रवींद्र लांडे , ठाणेदार, चान्नी.

​अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री गणेश गणपती बाप्पाचे जल्लोषात स्वागत झाले. गणेशोत्सवा दरम्यान शांतता व सुव्यवस्था टिकून राहावी, यासाठी तसेच राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टिकोनातून ‘एक गाव एक गणपती” ही संकल्पना पुढे आली आहे. पातूर तालुक्यात एकूण १७२ गणेश मंडळांनी श्री गणेशाची स्थापना केली. यामध्ये एकूण ३२ गावांमध्ये ”एक गाव एक गणपती” यासाठी पुढाकार घेण्यात आला.‌ या मोहिमेत गावातील तरुणाईने पुढाकार घेऊन समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. गणपती बाप्पाच्या उत्सवात प्रत्येकजण दंग झाला आहे. शहरांमध्ये, गावांमध्ये ठिकठिकाणी गणपती बाप्पा मोरयाचा गजर होताना दिसत आहे. वातावरण भक्तिमय झाले आहे.‌लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्याच्या चळवळीत लोकांनी एकत्र यावे म्हणून गणेशोत्सव सार्वजनिक स्वरुपात साजरा करायला सुरुवात केली आणि बघता बघता या उत्सवाचे स्वरुप व्यापक झाले. या उत्सवाला सामाजिकतेचे, समाजोपयोगी उपक्रमाचे स्वरुप देत गेल्या अनेक वर्षांपासून अनेक गावांमध्ये ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना रुढ झाली आहे. गावात सर्वांचा मिळून एकच गणपती बसवला जातो. गणपती उत्सवात गोळा होणाऱ्या वर्गणीतून गावाच्या विकासाची, समाजोपयोगी कामे होऊ लागली आहेत. यंदा पातूर तालुक्यात १७२ गणेश मंडळांनी नोंदणी केली आहे. पातूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकुण ९२गणपती मंडळाची स्थापना करण्यात आली. यामध्ये शहरी भागात २१ तर ग्रामीण भागात ७१ गणेश मंडळांची स्थापना झाली आहे. त्यापैकी ‘एक गाव एक गणपती’ या मोहिमेत २० गावांनी सहभाग नोंदवला आहे. तसेच चान्नी पोलिस स्टेशनच्या हद्दीत एकुण ८० गणपती मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये दोन शहरी मंडळांचा सहभाग आहे तर ग्रामीण भागात ७८ गणपती मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. उपक्रमाला चांगला प्रतिसाद चान्नी पोलिस ठाणे अंतर्गत येत असलेल्या १२ गावांमध्ये ‘एक गाव एक गणपती’ या उपक्रमातून एका मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला. आपसातील वैर नष्ट व्हावे, एकोपा कायम राहावा, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये अशा सूचना केल्याने “एक गाव एक गणपती’ या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. – रवींद्र लांडे , ठाणेदार, चान्नी.  

रोटरीच्या फिरत्या मोफत नेत्र तपासणी उपक्रमाचा ४८१६ रुग्णांनी घेतला लाभ:४८ रुग्णांची नेत्र शस्त्रक्रियेसाठी निवड

रोटरीच्या फिरत्या मोफत नेत्र तपासणी उपक्रमाचा ४८१६ रुग्णांनी घेतला लाभ:४८ रुग्णांची नेत्र शस्त्रक्रियेसाठी निवड

अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज रोटरीच्या फिरत्या नेत्र तपासणी पथकाच्या वतीने ऑगस्ट महिन्यात विविध गावांमध्ये शिबीर घेऊन ४८ रुग्णांची नेत्र शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली तसेच १४४२ रुग्णांना चष्मे वितरीत करण्यात आले. मे महिन्यात अनेक गावात नेत्र रुग्णांची मोफत तपासणी करून त्यांच्यावर नेत्र उपचार केलेत. रोटरी फिरते नेत्र रुग्णालय, रोटरी नॉर्थ व आनंदीलाल चिराणिया ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने या फिरत्या वाहनाच्या पथकाने विविध गावांमध्ये नेत्र तपासणी शिबिरे घेऊन नेत्ररुग्णांना औषध साहित्य वितरित केले. या अभियानात भीम नगर, अकोट फाईल, इंदिरानगर, सुधीर कॉलनी, मोहता मिल चाळ, गुलजार पुरा, हमजा प्लॉट, शिवनी, राहुल नगर, उमरी, डाबकी रोड, खडकी, दहिगाव, मनात्री, बोरगाव मंजू, चोहट्टा बाजार, गांधीग्राम, धाबा, पुनोती, निंबी, चिखलगाव, बाळापूर, डोंगरगाव, बार्शीटाकळी, राहित, साहित, शिवापूर, खडकी, गजानन नगर वाडेगाव, बाळापूरसह अनेक गावात नेत्र रुग्णांची मोफत नेत्रतपासणी शिबिरे राबवून तपासणी करण्यात आली. ऑगस्ट महिन्यात ४८१६ रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. यातील १४४२ रुग्णांना चष्मे वितरित करण्यात आले तर ४८ रुग्णांची नेत्रशस्त्रक्रियेसाठ ी निवड करण्यात आली. रोटरीच्या फिरत्या नेत्र तपासणी पथकाचे केंद्र प्रमुख डॉ. जुगल चिरानिया, डॉ. सुरेश तारे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक सुधाकर वानखडे, मंगेश वानखडे, रोटरी नॉर्थचे अध्यक्ष प्रा. प्रवीण ढोणे, सचिव डॉ. मेघना गांधी, प्रा. नंदकिशोर पाथरीकर व गावांच्या सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी परिश्रम घेतले. रोटरीच्या फिरत्या मोफत नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घेताना रुग्ण.

​अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज रोटरीच्या फिरत्या नेत्र तपासणी पथकाच्या वतीने ऑगस्ट महिन्यात विविध गावांमध्ये शिबीर घेऊन ४८ रुग्णांची नेत्र शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली तसेच १४४२ रुग्णांना चष्मे वितरीत करण्यात आले. मे महिन्यात अनेक गावात नेत्र रुग्णांची मोफत तपासणी करून त्यांच्यावर नेत्र उपचार केलेत. रोटरी फिरते नेत्र रुग्णालय, रोटरी नॉर्थ व आनंदीलाल चिराणिया ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने या फिरत्या वाहनाच्या पथकाने विविध गावांमध्ये नेत्र तपासणी शिबिरे घेऊन नेत्ररुग्णांना औषध साहित्य वितरित केले. या अभियानात भीम नगर, अकोट फाईल, इंदिरानगर, सुधीर कॉलनी, मोहता मिल चाळ, गुलजार पुरा, हमजा प्लॉट, शिवनी, राहुल नगर, उमरी, डाबकी रोड, खडकी, दहिगाव, मनात्री, बोरगाव मंजू, चोहट्टा बाजार, गांधीग्राम, धाबा, पुनोती, निंबी, चिखलगाव, बाळापूर, डोंगरगाव, बार्शीटाकळी, राहित, साहित, शिवापूर, खडकी, गजानन नगर वाडेगाव, बाळापूरसह अनेक गावात नेत्र रुग्णांची मोफत नेत्रतपासणी शिबिरे राबवून तपासणी करण्यात आली. ऑगस्ट महिन्यात ४८१६ रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. यातील १४४२ रुग्णांना चष्मे वितरित करण्यात आले तर ४८ रुग्णांची नेत्रशस्त्रक्रियेसाठ ी निवड करण्यात आली. रोटरीच्या फिरत्या नेत्र तपासणी पथकाचे केंद्र प्रमुख डॉ. जुगल चिरानिया, डॉ. सुरेश तारे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक सुधाकर वानखडे, मंगेश वानखडे, रोटरी नॉर्थचे अध्यक्ष प्रा. प्रवीण ढोणे, सचिव डॉ. मेघना गांधी, प्रा. नंदकिशोर पाथरीकर व गावांच्या सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी परिश्रम घेतले. रोटरीच्या फिरत्या मोफत नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घेताना रुग्ण.  

अडीच हजार शेतकऱ्यांची ज्वारी पडून; मुदत वाढवा:उपनिबंधकांचे पत्र; १ लाख क्विंटल खरेदी

अडीच हजार शेतकऱ्यांची ज्वारी पडून; मुदत वाढवा:उपनिबंधकांचे पत्र; १ लाख क्विंटल खरेदी

किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत ज्वारीसाठी शासकीय केंद्रांवर ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट वाढवून देण्यात यावे, असे पत्र जिल्हा उपनिबंधकांनी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या सचिवांना पाठवले आहे. सध्या २ हजार ४४५ शेतकऱ्यांकडील ज्वारी खरेदी बाकी आहे. ज्वारीच्या पिकाचे वन्यप्राण्यांच्या हैदोसाने नुकसान होते. अशातच निसर्गाच्या लहरीपणामुळे गत खरीप व नंतरच्या रब्बी हंगामात शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे उपलब्ध असलेल्या शेतमाला तरी योग्य भाव मिळावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. मात्र, बाजारात भाव कमी मिळाला. त्यामुळे शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून करण्यात आली. त्यानंतर खरेदी सुरू करण्यात आली. मात्र खरेदीचे उद्दिष्ट संपत आल्याने ते वाढवण्याची मागणी झाली. हे उद्दिष्ट वाढण्यात आले; परंतु ज्वारी खरेदीची मुदत ३१ ऑगस्ट रोजी संपली. त्यामुळे आता पुन्हा मुदत वाढ देण्याची मागणी होत आहे. किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत ज्वारीसाठी शासकीय केंद्रांवर ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट व मुदत वाढण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसनेही ३१ मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात केली होती. त्यानंतर उद्दिष्ट वाढण्यात आले. मात्र, त्यानंतरही संपूर्ण शेतकऱ्यांकडील ज्वारीची खरेदी झाली नाही. त्यामुळे आता मुदत वाढ व उद्दिष्ट वाढवून िमळाल्यास ज्वारी खरेदीची प्रक्रिया गतीने होणे आवश्यक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. अशी आहे सद्य:स्थिती जिल्ह्यातील ७ केंद्रांवर खरेदीची प्रक्रिया पार पडली. ३२०६ शेतकऱ्यांची १ लाख ४ हजार ९६२ क्विंटल ज्वारी खरेदी करण्यात आली, असे जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे यांनी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या सचिवांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे. ज्वारी विक्रीसाठी ५हजार ६५१ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. मात्र अद्यापही २ हजार ४४५ शेतकऱ्यांचा माल घेणे अद्यापही बाकी आहे. त्यामुळे ज्वारी खरेदीची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत वाढवून देण्यात यावी. तसेच खरेदीचे उद्दिष्टही ९० हजार क्विंटलपर्यंत वाढवून देण्यात यावे, असेही पत्रात म्हटले आहे.

​किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत ज्वारीसाठी शासकीय केंद्रांवर ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट वाढवून देण्यात यावे, असे पत्र जिल्हा उपनिबंधकांनी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या सचिवांना पाठवले आहे. सध्या २ हजार ४४५ शेतकऱ्यांकडील ज्वारी खरेदी बाकी आहे. ज्वारीच्या पिकाचे वन्यप्राण्यांच्या हैदोसाने नुकसान होते. अशातच निसर्गाच्या लहरीपणामुळे गत खरीप व नंतरच्या रब्बी हंगामात शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे उपलब्ध असलेल्या शेतमाला तरी योग्य भाव मिळावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. मात्र, बाजारात भाव कमी मिळाला. त्यामुळे शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून करण्यात आली. त्यानंतर खरेदी सुरू करण्यात आली. मात्र खरेदीचे उद्दिष्ट संपत आल्याने ते वाढवण्याची मागणी झाली. हे उद्दिष्ट वाढण्यात आले; परंतु ज्वारी खरेदीची मुदत ३१ ऑगस्ट रोजी संपली. त्यामुळे आता पुन्हा मुदत वाढ देण्याची मागणी होत आहे. किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत ज्वारीसाठी शासकीय केंद्रांवर ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट व मुदत वाढण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसनेही ३१ मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात केली होती. त्यानंतर उद्दिष्ट वाढण्यात आले. मात्र, त्यानंतरही संपूर्ण शेतकऱ्यांकडील ज्वारीची खरेदी झाली नाही. त्यामुळे आता मुदत वाढ व उद्दिष्ट वाढवून िमळाल्यास ज्वारी खरेदीची प्रक्रिया गतीने होणे आवश्यक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. अशी आहे सद्य:स्थिती जिल्ह्यातील ७ केंद्रांवर खरेदीची प्रक्रिया पार पडली. ३२०६ शेतकऱ्यांची १ लाख ४ हजार ९६२ क्विंटल ज्वारी खरेदी करण्यात आली, असे जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे यांनी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या सचिवांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे. ज्वारी विक्रीसाठी ५हजार ६५१ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. मात्र अद्यापही २ हजार ४४५ शेतकऱ्यांचा माल घेणे अद्यापही बाकी आहे. त्यामुळे ज्वारी खरेदीची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत वाढवून देण्यात यावी. तसेच खरेदीचे उद्दिष्टही ९० हजार क्विंटलपर्यंत वाढवून देण्यात यावे, असेही पत्रात म्हटले आहे.  

मान्सून संपण्याच्या २२ दिवसांपूर्वीच सरासरीपेक्षा ५२ मिमी जादा पाऊस:४ महिन्यात ६९३ मिमी अपेक्षित; ९३ दिवसातच ७४५ मिमी बरसला‎

मान्सून संपण्याच्या २२ दिवसांपूर्वीच सरासरीपेक्षा ५२ मिमी जादा पाऊस:४ महिन्यात ६९३ मिमी अपेक्षित; ९३ दिवसातच ७४५ मिमी बरसला‎

जिल्ह्यात यंदा मान्सून संपण्यासाठी २२ दिवस राहिले असतानाच अपेक्षित सरासरीपेक्षा ५१.४ मिमी पाऊस जास्त पडला आहे. जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत सरासरी ६९३.७ मिमी पाऊस पडणे अपेक्षित असताना आतापर्यंत ७४५.१ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची काळजी मिटली असून रब्बी हंगामातील शेतीच्या सिंचनाच्या मार्गही प्रशस्त झाला आहे. मात्र, पावसाचे दिवस कमी झाले आहेत. अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे. गत दहा वर्षात आतापर्यंत सहा वेळा ७०० मि.मी. पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. गतवर्षी जून महिन्यात दमदार पाऊस न झाल्याने शेतकरी संकटात सापडला होता. जुलै महिन्यात मात्र अतिवृष्टी झाली होती. त्यानंतर ऑगस्टमध्ये पावसाचा दीर्घ खंड होता. कधी अवर्षण तर कधी अतिवृष्टीमुळे पिकांचे उत्पादन प्रचंड घटले होते. दरम्यान यंदा जिल्ह्यात उन्हाळ्यात तापमान ४४ अंश सेल्सियसपेक्षा जास्त नोंदवण्यात आले. अनेक वेळा पारा ४२ अंश सेल्सियसपेक्षा जास्तच नोंदवण्यात आला. दरम्यान जून महिन्यापासूनच पावसाने दमदार हजेरी लावली. काही दिवसांचा खंड सोडल्यास जुलै व ऑगस्टमध्ये दमदार पाऊस झाला. अनेकदा अतिवृष्टी झाली. एकूणच यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. सप्टेंबर महिन्यातील पाऊस बोनस म्हणूनच राहणार आहे. गत वर्षीही कमी वेळेत पाऊस सन २०२३मध्ये एकूण केवळ ४७६ मि.मी. पाऊस झाला होता. मात्र सहा ते आठ दिवसातच जादा पाऊस झाल्याने पिकांचे प्रचंड नुकसान झाले. जुलैमध्ये १ लाख ६४ हजार हेक्टर, नोव्हेंबर-डिसेंबरमध ्ये १ लाख ८९ हजार ६८१ तर फेब्रुवारीमध्ये अवकाळी पाऊस झाल्याने ९ हजार १५२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांची हानी झाली होती. यंदाही कमी वेळेत जास्त पाऊस पडला आहे.

​जिल्ह्यात यंदा मान्सून संपण्यासाठी २२ दिवस राहिले असतानाच अपेक्षित सरासरीपेक्षा ५१.४ मिमी पाऊस जास्त पडला आहे. जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत सरासरी ६९३.७ मिमी पाऊस पडणे अपेक्षित असताना आतापर्यंत ७४५.१ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची काळजी मिटली असून रब्बी हंगामातील शेतीच्या सिंचनाच्या मार्गही प्रशस्त झाला आहे. मात्र, पावसाचे दिवस कमी झाले आहेत. अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे. गत दहा वर्षात आतापर्यंत सहा वेळा ७०० मि.मी. पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. गतवर्षी जून महिन्यात दमदार पाऊस न झाल्याने शेतकरी संकटात सापडला होता. जुलै महिन्यात मात्र अतिवृष्टी झाली होती. त्यानंतर ऑगस्टमध्ये पावसाचा दीर्घ खंड होता. कधी अवर्षण तर कधी अतिवृष्टीमुळे पिकांचे उत्पादन प्रचंड घटले होते. दरम्यान यंदा जिल्ह्यात उन्हाळ्यात तापमान ४४ अंश सेल्सियसपेक्षा जास्त नोंदवण्यात आले. अनेक वेळा पारा ४२ अंश सेल्सियसपेक्षा जास्तच नोंदवण्यात आला. दरम्यान जून महिन्यापासूनच पावसाने दमदार हजेरी लावली. काही दिवसांचा खंड सोडल्यास जुलै व ऑगस्टमध्ये दमदार पाऊस झाला. अनेकदा अतिवृष्टी झाली. एकूणच यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. सप्टेंबर महिन्यातील पाऊस बोनस म्हणूनच राहणार आहे. गत वर्षीही कमी वेळेत पाऊस सन २०२३मध्ये एकूण केवळ ४७६ मि.मी. पाऊस झाला होता. मात्र सहा ते आठ दिवसातच जादा पाऊस झाल्याने पिकांचे प्रचंड नुकसान झाले. जुलैमध्ये १ लाख ६४ हजार हेक्टर, नोव्हेंबर-डिसेंबरमध ्ये १ लाख ८९ हजार ६८१ तर फेब्रुवारीमध्ये अवकाळी पाऊस झाल्याने ९ हजार १५२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांची हानी झाली होती. यंदाही कमी वेळेत जास्त पाऊस पडला आहे.  

घरात शिरले गटाराचे पाणी; आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर:लोकप्रतिनिधी दहीहंडी, क्रिकेटचे सामने, आश्वासनाचे शिबिर राबवण्यात व्यस्त

घरात शिरले गटाराचे पाणी; आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर:लोकप्रतिनिधी दहीहंडी, क्रिकेटचे सामने, आश्वासनाचे शिबिर राबवण्यात व्यस्त

शहराला लागून असलेल्या ग्रामसेवक कॉलनी, नालंदा नगर सिरसो या भागात झपाट्याने वस्ती वाढत असून, सांडपाण्याची मात्र व्यवस्था नसल्याने सांडपाणी रस्त्यावर आल्याने अस्तव्यस्त अवस्था निर्माण झाली आहे. ले-आउट टाकून ते अव्वाच्या सव्वा भावाने विक्री करून मलिदा लाटल्या गेला सुविधा देण्याचा विसर मात्र ले-आउट मालकांना पडल्याची रहिवाशांकडून आेरड होत आहे. सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याचा कुठलीही व्यवस्था नसल्याने सांडपाणी रस्त्यावरून घरात जात असल्याचे दिसून येत आहे .नाल्याचे व गटारातील खराब सांडपाणी यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे डेंग्यू व मलेरिया सारखे आजारांचे रुग्ण वाढत असून, याकडे कोणाचे लक्ष नसल्याने रहिवाशी संताप व्यक्त करत आहेत. आमचा उपयोग फक्त निवडणुकीपुरताच करून घेतल्या जात असून, आश्वासन देऊन बोळवण करण्यात येते. जिल्हा परिषदे,पंचायत समिती, गट ग्रामपंचायत कोणी लक्ष देण्यास तयार नाही. लोकप्रतिनिधी ठिकठिकाणी दहीहंडी, क्रिकेटचे सामने, आश्वासनाचे शिबिर राबवण्यात व्यस्त आहे. येथेच राहत असणारे मेहेरे यांच्या घरात या गटाराचे पाणी शिरले असून, गेल्या पाच तासांच्या वर घाण पाण्याचा उपसा करून मोठ्या परिश्रमातून घरातून पाणी त्यांना काढावे लागल्याचे सांगितले. त्यामुळे या गंभीर बाबीकडे त्वरित लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आहे.

​शहराला लागून असलेल्या ग्रामसेवक कॉलनी, नालंदा नगर सिरसो या भागात झपाट्याने वस्ती वाढत असून, सांडपाण्याची मात्र व्यवस्था नसल्याने सांडपाणी रस्त्यावर आल्याने अस्तव्यस्त अवस्था निर्माण झाली आहे. ले-आउट टाकून ते अव्वाच्या सव्वा भावाने विक्री करून मलिदा लाटल्या गेला सुविधा देण्याचा विसर मात्र ले-आउट मालकांना पडल्याची रहिवाशांकडून आेरड होत आहे. सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याचा कुठलीही व्यवस्था नसल्याने सांडपाणी रस्त्यावरून घरात जात असल्याचे दिसून येत आहे .नाल्याचे व गटारातील खराब सांडपाणी यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे डेंग्यू व मलेरिया सारखे आजारांचे रुग्ण वाढत असून, याकडे कोणाचे लक्ष नसल्याने रहिवाशी संताप व्यक्त करत आहेत. आमचा उपयोग फक्त निवडणुकीपुरताच करून घेतल्या जात असून, आश्वासन देऊन बोळवण करण्यात येते. जिल्हा परिषदे,पंचायत समिती, गट ग्रामपंचायत कोणी लक्ष देण्यास तयार नाही. लोकप्रतिनिधी ठिकठिकाणी दहीहंडी, क्रिकेटचे सामने, आश्वासनाचे शिबिर राबवण्यात व्यस्त आहे. येथेच राहत असणारे मेहेरे यांच्या घरात या गटाराचे पाणी शिरले असून, गेल्या पाच तासांच्या वर घाण पाण्याचा उपसा करून मोठ्या परिश्रमातून घरातून पाणी त्यांना काढावे लागल्याचे सांगितले. त्यामुळे या गंभीर बाबीकडे त्वरित लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आहे.  

पावसामुळे बोरगाव मंजू परिसरात सोयाबीनला शेंगाच लागल्या नाहीत!:नुकसानीचे सर्वेक्षण करून तातडीने मदत करण्याची मागणी

पावसामुळे बोरगाव मंजू परिसरात सोयाबीनला शेंगाच लागल्या नाहीत!:नुकसानीचे सर्वेक्षण करून तातडीने मदत करण्याची मागणी

अकोला तालुक्यातील बोरगाव मंजू परिसरात यंदा पिके बहरली असताना सततच्या पावसामुळे सोयाबीन वाढले, तर कापसाच्या झाडांची वाढ खुंटल्याचे चित्र आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेकडो हेक्टरवरील सोयाबीनला शेंगाच लागल्या नसल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता पुढे काय करावे, हा प्रश्न पडला आहे. बोरगाव मंजू महसूल मंडळ परिसरातील बोरगाव मंजू, वाशिंबा, डोंगरगाव, सोनाळा, वणी रंभापूर,अन्वी मिर्झापूर या सह बोरगाव मंजू महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी शेतात खरिपाच्या पेरण्यासाठी पेरणी पूर्व मशागत, महागडे बियाणे खते किटकनाशके,मशागत, आर्थिक संकटात सापडलेल्या अवस्थेत असताना सुद्धा वाटेल त्या मार्गाने आर्थिक जुळवाजुळव करून सोयाबीन, कापूस, मूग,उडीद, तूर आदी आपल्या शेतात खरिपाच्या पेरण्या केल्या. परंतु निसर्गाचा लहरीपणा सततच्या पावसामुळे कुठे शेतात पाणी साचल्याने पिकांची वाढ थांबली. तर शेतकऱ्यांचे नगदी पीक मुग,उडीद हातचे गेले. दरम्यान, सोयाबीन पेरणीनंतर पिके बहरले असताना मात्र सततच्या पावसामुळे तसेच सोयाबीन पिकावर खोड अळीसह रोगांचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे सोयाबीनला शेंगाच लागल्या नसल्याचे समोर आले आहे. कापसालाही फटका बसला आहे. ना वाढ झाली ना फुले पाती लागली. अल्प प्रमाणात कापसाच्या झाडाला फुले पाती लागली. परंतु तीही झाडावरुन खाली गळून पडत असल्याचे शेतकरी सांगतात. सद्य-स्थितीत खरिपाच्या पिकांना अज्ञात रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. लाखो रुपये खर्च करून खरिपाच्या पिकांना फटका बसला त्यामुळे शेतकऱ्यांना आता पुढे काय होणार, या विवंचनेत सापडला आहे. शासनाने तातडीने मदत करावी भौगोलिक परिस्थिती पाहता बोरगाव मंजू परिसरात बहुतांश शेतकऱ्यांना निसर्गाच्या भरोशावर खरिपाच्या पिकांशिवाय पर्याय नाही. सध्या खरिपातील मुख्य पिके हातची गेल्यागत आहे. शासनाने दखल घेऊन शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केल्या शिवाय पर्याय नाहीच. नुकसानीचे सर्वेक्षण करून शासनाने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी. -पवन निवाणे, शेतकरी, बोरगाव मंजू.

​अकोला तालुक्यातील बोरगाव मंजू परिसरात यंदा पिके बहरली असताना सततच्या पावसामुळे सोयाबीन वाढले, तर कापसाच्या झाडांची वाढ खुंटल्याचे चित्र आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेकडो हेक्टरवरील सोयाबीनला शेंगाच लागल्या नसल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता पुढे काय करावे, हा प्रश्न पडला आहे. बोरगाव मंजू महसूल मंडळ परिसरातील बोरगाव मंजू, वाशिंबा, डोंगरगाव, सोनाळा, वणी रंभापूर,अन्वी मिर्झापूर या सह बोरगाव मंजू महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी शेतात खरिपाच्या पेरण्यासाठी पेरणी पूर्व मशागत, महागडे बियाणे खते किटकनाशके,मशागत, आर्थिक संकटात सापडलेल्या अवस्थेत असताना सुद्धा वाटेल त्या मार्गाने आर्थिक जुळवाजुळव करून सोयाबीन, कापूस, मूग,उडीद, तूर आदी आपल्या शेतात खरिपाच्या पेरण्या केल्या. परंतु निसर्गाचा लहरीपणा सततच्या पावसामुळे कुठे शेतात पाणी साचल्याने पिकांची वाढ थांबली. तर शेतकऱ्यांचे नगदी पीक मुग,उडीद हातचे गेले. दरम्यान, सोयाबीन पेरणीनंतर पिके बहरले असताना मात्र सततच्या पावसामुळे तसेच सोयाबीन पिकावर खोड अळीसह रोगांचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे सोयाबीनला शेंगाच लागल्या नसल्याचे समोर आले आहे. कापसालाही फटका बसला आहे. ना वाढ झाली ना फुले पाती लागली. अल्प प्रमाणात कापसाच्या झाडाला फुले पाती लागली. परंतु तीही झाडावरुन खाली गळून पडत असल्याचे शेतकरी सांगतात. सद्य-स्थितीत खरिपाच्या पिकांना अज्ञात रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. लाखो रुपये खर्च करून खरिपाच्या पिकांना फटका बसला त्यामुळे शेतकऱ्यांना आता पुढे काय होणार, या विवंचनेत सापडला आहे. शासनाने तातडीने मदत करावी भौगोलिक परिस्थिती पाहता बोरगाव मंजू परिसरात बहुतांश शेतकऱ्यांना निसर्गाच्या भरोशावर खरिपाच्या पिकांशिवाय पर्याय नाही. सध्या खरिपातील मुख्य पिके हातची गेल्यागत आहे. शासनाने दखल घेऊन शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केल्या शिवाय पर्याय नाहीच. नुकसानीचे सर्वेक्षण करून शासनाने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी. -पवन निवाणे, शेतकरी, बोरगाव मंजू.  

सोयाबीन पिकाला शेंगाच नाहीत; शेतकऱ्यांची कृषी विभागावर धडक:अकोला तालुक्यात शेतकरी हवालदिल

सोयाबीन पिकाला शेंगाच नाहीत; शेतकऱ्यांची कृषी विभागावर धडक:अकोला तालुक्यात शेतकरी हवालदिल

सोयाबीनला शेंगाच नसल्याचा प्रकार बाळापूरनंतर अकोला तालुक्यातही दिसून आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पंचायत समितीवर धडक देत तेथील कृषी विभागाला निवेदन सादर केले. तातडीने सर्वेक्षण करून नुकसान भरपाई द्या, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. यंदा खरीप हंगामात अकोला तालुक्यात पावसाचा खंड पडल्याने आधीच उत्पादन घटले. अशातच गत काही दिवसांपासून तालुक्यात प्रचंड पाऊस पडत आहे. हे कमी की काय सोयाबीन पिकाला एकही शेंग आली नसल्याचा प्रकार समोर आला आहे. अकोला पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या बाभुळगाव जहाँगीर सर्कलमध्ये गावांमध्ये संततधार पावसामुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. डोंगरगाव, बाभूळगाव, सिसा, मासा, सिसा उदेगाव, या गावातील खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या गावातील शेतकरी आपल्या शेतात दरवर्षी सोयाबीन पिकाचा पेरा मोठ्या प्रमाणात करतात. सततच्या पावसामुळे शेतातील सोयाबीनची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या सोयाबीनच्या झाडांना शेंगाच नाही. त्यामुळे या परिसरातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. या गंभीर बाबाची दखल शासनाने त्वरित घेऊन शेतकऱ्यांना शासकीय मदत देण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदन देताना योगेश नागापुरे, माणिकराव देवर, श्रीकृष्ण देवर, सुधाकर देशमुख, संजय देशमुख, राहुल काकडे, गणेश महादेवराव काकडे, गजानन वैराळे आदींसह शेतकरी होते. या निवेदनाच्या प्रती त्यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व तहसीलदारांना देण्यात आल्या आहेत. ग्रामसभा बोलावून लवकरच घेणार ठराव सततच्या पावसामुळे डोंगरगाव परिसरातील खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या संदर्भात ग्राम पंचायत कार्यालयाच्या वतीने संबंधितांना अनेक वेळा माहिती दिली आहे. या भागातील अनेक शेतकऱ्यांनी पिकांचा विमा काढलेला आहे. यासंदर्भातील शासनाने त्वरित सर्वे करुन शेतकऱ्यांना पिक विमा तसेच शासकीय मदत त्वरित द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांतर्फे डोंगरगावचे उपसरपंच किशोर काकडे यांनी केली आहे. लवकरच यासंदर्भात ग्रामसभा बोलावून ग्राम सभेचा ठराव शासनाकडे पाठवण्यात येणार आहे. सर्वाधिक नुकसान अकोल्यात यंदा अतिवृष्टीमुळे सर्वाधिक नुकसान अकोला तालुक्यात झाले आहे. जून व जुलैमध्ये ६ हजार ६३३ शेतकऱ्यांच्या ६ हजार २४१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. सोयाबीन, कापूस, तूर व उडीद पिकांची हानी झाले. त्यानंतर २ सप्टेंबर रोजीही जिल्ह्यात सर्वाधिक अकोला तालुक्यात १८ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांना अतिवृष्टीचा तडाखा बसला. हे नुकसान ५२ गावांमध्ये झाले.

​सोयाबीनला शेंगाच नसल्याचा प्रकार बाळापूरनंतर अकोला तालुक्यातही दिसून आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पंचायत समितीवर धडक देत तेथील कृषी विभागाला निवेदन सादर केले. तातडीने सर्वेक्षण करून नुकसान भरपाई द्या, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. यंदा खरीप हंगामात अकोला तालुक्यात पावसाचा खंड पडल्याने आधीच उत्पादन घटले. अशातच गत काही दिवसांपासून तालुक्यात प्रचंड पाऊस पडत आहे. हे कमी की काय सोयाबीन पिकाला एकही शेंग आली नसल्याचा प्रकार समोर आला आहे. अकोला पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या बाभुळगाव जहाँगीर सर्कलमध्ये गावांमध्ये संततधार पावसामुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. डोंगरगाव, बाभूळगाव, सिसा, मासा, सिसा उदेगाव, या गावातील खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या गावातील शेतकरी आपल्या शेतात दरवर्षी सोयाबीन पिकाचा पेरा मोठ्या प्रमाणात करतात. सततच्या पावसामुळे शेतातील सोयाबीनची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या सोयाबीनच्या झाडांना शेंगाच नाही. त्यामुळे या परिसरातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. या गंभीर बाबाची दखल शासनाने त्वरित घेऊन शेतकऱ्यांना शासकीय मदत देण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदन देताना योगेश नागापुरे, माणिकराव देवर, श्रीकृष्ण देवर, सुधाकर देशमुख, संजय देशमुख, राहुल काकडे, गणेश महादेवराव काकडे, गजानन वैराळे आदींसह शेतकरी होते. या निवेदनाच्या प्रती त्यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व तहसीलदारांना देण्यात आल्या आहेत. ग्रामसभा बोलावून लवकरच घेणार ठराव सततच्या पावसामुळे डोंगरगाव परिसरातील खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या संदर्भात ग्राम पंचायत कार्यालयाच्या वतीने संबंधितांना अनेक वेळा माहिती दिली आहे. या भागातील अनेक शेतकऱ्यांनी पिकांचा विमा काढलेला आहे. यासंदर्भातील शासनाने त्वरित सर्वे करुन शेतकऱ्यांना पिक विमा तसेच शासकीय मदत त्वरित द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांतर्फे डोंगरगावचे उपसरपंच किशोर काकडे यांनी केली आहे. लवकरच यासंदर्भात ग्रामसभा बोलावून ग्राम सभेचा ठराव शासनाकडे पाठवण्यात येणार आहे. सर्वाधिक नुकसान अकोल्यात यंदा अतिवृष्टीमुळे सर्वाधिक नुकसान अकोला तालुक्यात झाले आहे. जून व जुलैमध्ये ६ हजार ६३३ शेतकऱ्यांच्या ६ हजार २४१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. सोयाबीन, कापूस, तूर व उडीद पिकांची हानी झाले. त्यानंतर २ सप्टेंबर रोजीही जिल्ह्यात सर्वाधिक अकोला तालुक्यात १८ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांना अतिवृष्टीचा तडाखा बसला. हे नुकसान ५२ गावांमध्ये झाले.  

पार्किंगखाऊ व्यावसायिक इमारतींमुळे वाहने रस्त्यावर, दररोज वाहतूक कोंडी:बाजारपेठत इमारतींत पार्किंग सुविधा नाही हॉटेल, रुग्णालये, कार्यालयांत येणारी वाहने रस्त्यावरच‎

पार्किंगखाऊ व्यावसायिक इमारतींमुळे वाहने रस्त्यावर, दररोज वाहतूक कोंडी:बाजारपेठत इमारतींत पार्किंग सुविधा नाही हॉटेल, रुग्णालये, कार्यालयांत येणारी वाहने रस्त्यावरच‎

शहरात दिवसेंदिवस वाहनांच्या पार्किंगची समस्या जटील होत आहे. प्रमुख रस्त्यालगत व्यावसायिक इमारतींची संख्या वाढत आहे. मात्र, त्यात अनेक ठिकाणी पार्किंगची व्यवस्थाच नाही, तर काही ठिकाणी कमी क्षमतेचे पार्किंग आहेत. मुख्य बाजारपेठ असलेल्या कापड बाजार व लगतच्या परिसरात व्यावसायिक इमारतींना पार्किंगची व्यवस्थाच उपलब्ध नाही. त्यामुळे रस्त्यावरच वाहने लावली जातात. यातून दररोज वाहतूक कोंडी व वादाच्या घटना घडत आहेत. पोलिस व महापालिका प्रशासन मात्र याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत आहेत. मुख्य बाजारपेठ, चितळे रस्ता, नवीपेठ, चौपाटी कारंजा, दिल्लीगेट या मध्य शहरातील सर्वाधिक रहदारी असलेल्या रस्त्यांवर शेकडो व्यावसायिक इमारती आहेत. मात्र, एखादा अपवाद वगळता कुठेही पार्किंगची व्यवस्था नाही. सावेडी उपनगर परिसरातही अशीच परिस्थिती आहे. तसेच, बहुतांशी रुग्णालये, मंगल कार्यालयांनी त्यांच्या पार्किंगच्या जागेचा अन्य कारणासाठी वापर सुरू केल्याने तेथील वाहनेही रस्त्यावरच लावली जातात. त्यामुळे या परिसरातील नागरिकही त्रस्त आहेत. अलिकडच्या काळात वाहन पार्किंगवरून वादाच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाने वाहनांच्या पार्किंगच्या समस्येबाबत तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. दुतर्फा पार्किंग; रहिवासी त्रस्त उपनगर परिसरात अनेक ठिकाणी रहिवाशी क्षेत्रात व्यावसायिक इमारती, रुग्णालये, हॉटेलच्या बांधकामांना परवानगी देण्यात आली आहे. तेथे येणारे ग्राहक, रुग्णांचे नातेवाईक रस्त्याच्या दुतर्फा वाहने लावतात. त्यामुळे या परिसरातील रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेकवेळा वाहने लावणाऱ्या नागरिकांकडून रहिवाशांना दमदाटी, शिवीगाळ होण्याचे प्रकार घडत आहेत. तीन प्रमुख रस्त्यावर सतत वाहतूक कोंडी

​शहरात दिवसेंदिवस वाहनांच्या पार्किंगची समस्या जटील होत आहे. प्रमुख रस्त्यालगत व्यावसायिक इमारतींची संख्या वाढत आहे. मात्र, त्यात अनेक ठिकाणी पार्किंगची व्यवस्थाच नाही, तर काही ठिकाणी कमी क्षमतेचे पार्किंग आहेत. मुख्य बाजारपेठ असलेल्या कापड बाजार व लगतच्या परिसरात व्यावसायिक इमारतींना पार्किंगची व्यवस्थाच उपलब्ध नाही. त्यामुळे रस्त्यावरच वाहने लावली जातात. यातून दररोज वाहतूक कोंडी व वादाच्या घटना घडत आहेत. पोलिस व महापालिका प्रशासन मात्र याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत आहेत. मुख्य बाजारपेठ, चितळे रस्ता, नवीपेठ, चौपाटी कारंजा, दिल्लीगेट या मध्य शहरातील सर्वाधिक रहदारी असलेल्या रस्त्यांवर शेकडो व्यावसायिक इमारती आहेत. मात्र, एखादा अपवाद वगळता कुठेही पार्किंगची व्यवस्था नाही. सावेडी उपनगर परिसरातही अशीच परिस्थिती आहे. तसेच, बहुतांशी रुग्णालये, मंगल कार्यालयांनी त्यांच्या पार्किंगच्या जागेचा अन्य कारणासाठी वापर सुरू केल्याने तेथील वाहनेही रस्त्यावरच लावली जातात. त्यामुळे या परिसरातील नागरिकही त्रस्त आहेत. अलिकडच्या काळात वाहन पार्किंगवरून वादाच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाने वाहनांच्या पार्किंगच्या समस्येबाबत तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. दुतर्फा पार्किंग; रहिवासी त्रस्त उपनगर परिसरात अनेक ठिकाणी रहिवाशी क्षेत्रात व्यावसायिक इमारती, रुग्णालये, हॉटेलच्या बांधकामांना परवानगी देण्यात आली आहे. तेथे येणारे ग्राहक, रुग्णांचे नातेवाईक रस्त्याच्या दुतर्फा वाहने लावतात. त्यामुळे या परिसरातील रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेकवेळा वाहने लावणाऱ्या नागरिकांकडून रहिवाशांना दमदाटी, शिवीगाळ होण्याचे प्रकार घडत आहेत. तीन प्रमुख रस्त्यावर सतत वाहतूक कोंडी  

मोबाईलवेड्या मुलांना वठणीवर आणण्यासाठी शाळेचा उपक्रम:पाथर्डीतील श्री स्वामी समर्थ शाळेचा ‘मी मोबाईल वापरणार नाही’ उपक्रम

मोबाईलवेड्या मुलांना वठणीवर आणण्यासाठी शाळेचा उपक्रम:पाथर्डीतील श्री स्वामी समर्थ शाळेचा ‘मी मोबाईल वापरणार नाही’ उपक्रम

शहर शाळेतील विद्यार्थ्यांनी मोबाईलवर गेम खेळायचा नाही, आई-वडिलांना त्रास द्यायचा नाही, अनावश्यक मागण्या करायच्या नाही, सांगितलेला अभ्यास नियमित करायचा… यासंदर्भात पालकांची तक्रार आल्यास प्रार्थनेच्या वेळी त्या विद्यार्थ्याचे नाव जाहीर करण्यात येते. त्यामुळे शिस्त मोडणारा विद्यार्थी खजील होतो. त्यानंतर आपल्यात सुधारणा करुन सर्व नियमांचे पालन काटेकोरपणे करतो. “मी मोबाईल वापरणार नाही’ या उपक्रमांतर्गत ही शिस्त लावली आहे, शहरातील श्री स्वामी समर्थ विद्यामंदिर येथील मुख्याध्यापक एकनाथ ढोले व त्यांच्या सहकाऱ्यांनी… इतर शाळांनीही असे उपक्रम राबवण्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. श्री स्वामी समर्थ विद्या मंदिरमध्ये आज ज्युनिअर केजी ते दहावीपर्यंत साडेसातशे विद्यार्थी शिक्षण घेतात. सद्यस्थितीत मुलांना मोबाईलचे प्रचंड वेड लागले असून, त्यातून मुलांना बाहेर काढण्यासाठी शाळेने ‘मी मोबाईल वापरणार नाही’ हा अनोखा उपक्रम सुरू केला. गरज असेल तरच आई-वडिलांसोबत मोबाईलमध्ये आवश्यक ते ज्ञान घ्यायचे, परस्पर व विनाकारण मोबाईल वापरला, तर पालकाने त्याचा फोटो वर्गशिक्षकाला पाठवायचा.. प्रार्थनेच्या वेळी पालकांना फोन लावून ‘तुमचा मुलगा विनाकारण मोबाईल पाहतो का? आई-वडिलांचे ऐकतो का? घरी त्रास देतो का? आई-वडिलांचे दररोज दर्शन घेतो का?’ या सर्व प्रश्नांची उत्तरे होकारार्थी आली, की त्या मुलाचे कौतुक करायचं अन् नकारार्थी उत्तर आल्यास त्या मुलाला आठ दिवसांचा वेळ देऊन सर्व विद्यार्थ्यांसमोर यापुढे मी असं वागणार नाही, असं कबूल करायला लावायचं. आठ दिवसांनंतर विद्यार्थी चांगले वागायला सुरुवात करील, तेव्हा त्याला बक्षीस देऊन त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप मारायची. या उपक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड बदल झालेले दिसत आहेत. अनेक मुलं आता घरी मोबाईल वापरत नाहीत. अनेक पालकांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले आहे. त्याचबरोबर शाळेमध्ये वाचन प्रकल्प हाही उपक्रम बऱ्याच दिवसापासून चालू आहे. दररोज मुलाने आई-वडिलांसोबत अर्धा तास वाचन करायचे. त्या वाचन प्रकल्पावर आपल्या आई-वडिलांची स्वाक्षरी घ्यायची. हा प्रकल्प दर शनिवारी शाळेत आणून आपल्या वर्गशिक्षकाला दाखवून त्यावर वर्ग शिक्षकाची स्वाक्षरी घ्यायची. सहा महिन्यानंतर तो प्रकल्प मुख्याध्यापकांना दाखवून, त्यावर मुख्याध्यापकाचे स्वाक्षरी घ्यायची, या उपक्रमातून मुलांना आता प्रचंड वाचनाची सवय लागली आहे. तसेच, दर शुक्रवारी “भाकरी-डे’ हा दिवस साजरा केला जातो. पाथर्डीतील श्री स्वामी समर्थ विद्यामंदिर शाळेत विद्यार्थ्यंानी मोबाईल वापर टाळण्यासाठी अनोखा उपक्रम राबवण्यात येत आहे. विद्यार्थ्यंामध्ये झाला बदल विद्यार्थ्यांविषयी पालकांच्या अनेक तक्रारी होत्या. त्यामुळे शाळेने हे उपक्रम सुरू केले असून, त्याला मोठा प्रतिसाद पालक व विद्यार्थ्यांकडून मिळतो आहे. अवघ्या काही दिवसांतच आपल्या मुलात झालेला बदल पाहून अनेक पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळतात. आगामी काळात पालकांच्या सूचनेनुसार योग्य ते उपक्रम राबवू. – एकनाथ ढोले, मुख्याध्यापक

​शहर शाळेतील विद्यार्थ्यांनी मोबाईलवर गेम खेळायचा नाही, आई-वडिलांना त्रास द्यायचा नाही, अनावश्यक मागण्या करायच्या नाही, सांगितलेला अभ्यास नियमित करायचा… यासंदर्भात पालकांची तक्रार आल्यास प्रार्थनेच्या वेळी त्या विद्यार्थ्याचे नाव जाहीर करण्यात येते. त्यामुळे शिस्त मोडणारा विद्यार्थी खजील होतो. त्यानंतर आपल्यात सुधारणा करुन सर्व नियमांचे पालन काटेकोरपणे करतो. “मी मोबाईल वापरणार नाही’ या उपक्रमांतर्गत ही शिस्त लावली आहे, शहरातील श्री स्वामी समर्थ विद्यामंदिर येथील मुख्याध्यापक एकनाथ ढोले व त्यांच्या सहकाऱ्यांनी… इतर शाळांनीही असे उपक्रम राबवण्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. श्री स्वामी समर्थ विद्या मंदिरमध्ये आज ज्युनिअर केजी ते दहावीपर्यंत साडेसातशे विद्यार्थी शिक्षण घेतात. सद्यस्थितीत मुलांना मोबाईलचे प्रचंड वेड लागले असून, त्यातून मुलांना बाहेर काढण्यासाठी शाळेने ‘मी मोबाईल वापरणार नाही’ हा अनोखा उपक्रम सुरू केला. गरज असेल तरच आई-वडिलांसोबत मोबाईलमध्ये आवश्यक ते ज्ञान घ्यायचे, परस्पर व विनाकारण मोबाईल वापरला, तर पालकाने त्याचा फोटो वर्गशिक्षकाला पाठवायचा.. प्रार्थनेच्या वेळी पालकांना फोन लावून ‘तुमचा मुलगा विनाकारण मोबाईल पाहतो का? आई-वडिलांचे ऐकतो का? घरी त्रास देतो का? आई-वडिलांचे दररोज दर्शन घेतो का?’ या सर्व प्रश्नांची उत्तरे होकारार्थी आली, की त्या मुलाचे कौतुक करायचं अन् नकारार्थी उत्तर आल्यास त्या मुलाला आठ दिवसांचा वेळ देऊन सर्व विद्यार्थ्यांसमोर यापुढे मी असं वागणार नाही, असं कबूल करायला लावायचं. आठ दिवसांनंतर विद्यार्थी चांगले वागायला सुरुवात करील, तेव्हा त्याला बक्षीस देऊन त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप मारायची. या उपक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड बदल झालेले दिसत आहेत. अनेक मुलं आता घरी मोबाईल वापरत नाहीत. अनेक पालकांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले आहे. त्याचबरोबर शाळेमध्ये वाचन प्रकल्प हाही उपक्रम बऱ्याच दिवसापासून चालू आहे. दररोज मुलाने आई-वडिलांसोबत अर्धा तास वाचन करायचे. त्या वाचन प्रकल्पावर आपल्या आई-वडिलांची स्वाक्षरी घ्यायची. हा प्रकल्प दर शनिवारी शाळेत आणून आपल्या वर्गशिक्षकाला दाखवून त्यावर वर्ग शिक्षकाची स्वाक्षरी घ्यायची. सहा महिन्यानंतर तो प्रकल्प मुख्याध्यापकांना दाखवून, त्यावर मुख्याध्यापकाचे स्वाक्षरी घ्यायची, या उपक्रमातून मुलांना आता प्रचंड वाचनाची सवय लागली आहे. तसेच, दर शुक्रवारी “भाकरी-डे’ हा दिवस साजरा केला जातो. पाथर्डीतील श्री स्वामी समर्थ विद्यामंदिर शाळेत विद्यार्थ्यंानी मोबाईल वापर टाळण्यासाठी अनोखा उपक्रम राबवण्यात येत आहे. विद्यार्थ्यंामध्ये झाला बदल विद्यार्थ्यांविषयी पालकांच्या अनेक तक्रारी होत्या. त्यामुळे शाळेने हे उपक्रम सुरू केले असून, त्याला मोठा प्रतिसाद पालक व विद्यार्थ्यांकडून मिळतो आहे. अवघ्या काही दिवसांतच आपल्या मुलात झालेला बदल पाहून अनेक पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळतात. आगामी काळात पालकांच्या सूचनेनुसार योग्य ते उपक्रम राबवू. – एकनाथ ढोले, मुख्याध्यापक  

नगरच्या २८० बस कोकणात, रोज ३५० फेऱ्या रद्द:जिल्ह्यातील शटल बससेवा, लांब पल्ल्याच्या गाड्यांवर परिणाम

नगरच्या २८० बस कोकणात, रोज ३५० फेऱ्या रद्द:जिल्ह्यातील शटल बससेवा, लांब पल्ल्याच्या गाड्यांवर परिणाम

गणेशोत्सवानिमित्त अहमदनगर विभागातून २८० एसटीबस ४ सप्टेंबरपासून कोकणात पाठवल्या होत्या. त्यामुळे जिल्ह्यात दररोज सुमारे ३५० फेऱ्या रद्द होत आहेत. त्याचबरोबर इतर जिल्ह्यांतूनही बस पाठवल्यामुळे प्रवाशांना बसची वाट पहावी लागत आहे. परंतु, एसटी प्रशासनाने १५५ बस रविवारपर्यंत माघारी आल्याचे सांगत, प्रवासी सेवा सुरळीत होत असल्याचे सांगितले. गणेशोत्सवानिमित्त शहरी भागातून कोकणात गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. या प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी राज्यभरातून सुमारे ४ हजार बसची व्यवस्था करण्यात आली. त्यात नगर विभागासह, नाशिक, पुणे विभागातून बस पाठवण्यात आल्या आहेत. त्यामुळे इतर मार्गांवरील दैनंदिन फेऱ्यांवर परिणाम झाला आहे. एकट्या नगर विभागात शुक्रवारी २४ तासांत १ हजार ९०० फेऱ्या नियोजित असतात, त्यापैकी ४०३ फेऱ्या रद्द झाल्या होत्या. ४ दिवसांत फेऱ्या रद्द होत असल्याने जिल्ह्यातील प्रवाशांची गैरसोय झाली होती. परंतु, शनिवारपासून काही बस माघारी येत आहेत. सद्यस्थितीत १२५ बस कोकणात थांबवण्यात आल्या आहेत. जादा बसचे नियोजन करता जिल्ह्यातील शटल बससेवा, लांब पल्ल्याच्या गाड्यांवर परिणाम झाला. बससेवा सुरळीत होणार नगर विभागातून २८० बस कोकणात पाठवल्या होत्या, त्यापैकी काही गाड्या नगरला परत आल्या . नगरच्या केवळ १२५ गाड्या सद्यस्थितीत कोकणात थांबल्या आहेत. काही फेऱ्या रद्द होत होत्या, बस परत आल्याने प्रवासी सेवा सुरळीत होत आहे. कमलेश धनराळे, विभागीय वाहतूक अधिकारी, नगर.

​गणेशोत्सवानिमित्त अहमदनगर विभागातून २८० एसटीबस ४ सप्टेंबरपासून कोकणात पाठवल्या होत्या. त्यामुळे जिल्ह्यात दररोज सुमारे ३५० फेऱ्या रद्द होत आहेत. त्याचबरोबर इतर जिल्ह्यांतूनही बस पाठवल्यामुळे प्रवाशांना बसची वाट पहावी लागत आहे. परंतु, एसटी प्रशासनाने १५५ बस रविवारपर्यंत माघारी आल्याचे सांगत, प्रवासी सेवा सुरळीत होत असल्याचे सांगितले. गणेशोत्सवानिमित्त शहरी भागातून कोकणात गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. या प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी राज्यभरातून सुमारे ४ हजार बसची व्यवस्था करण्यात आली. त्यात नगर विभागासह, नाशिक, पुणे विभागातून बस पाठवण्यात आल्या आहेत. त्यामुळे इतर मार्गांवरील दैनंदिन फेऱ्यांवर परिणाम झाला आहे. एकट्या नगर विभागात शुक्रवारी २४ तासांत १ हजार ९०० फेऱ्या नियोजित असतात, त्यापैकी ४०३ फेऱ्या रद्द झाल्या होत्या. ४ दिवसांत फेऱ्या रद्द होत असल्याने जिल्ह्यातील प्रवाशांची गैरसोय झाली होती. परंतु, शनिवारपासून काही बस माघारी येत आहेत. सद्यस्थितीत १२५ बस कोकणात थांबवण्यात आल्या आहेत. जादा बसचे नियोजन करता जिल्ह्यातील शटल बससेवा, लांब पल्ल्याच्या गाड्यांवर परिणाम झाला. बससेवा सुरळीत होणार नगर विभागातून २८० बस कोकणात पाठवल्या होत्या, त्यापैकी काही गाड्या नगरला परत आल्या . नगरच्या केवळ १२५ गाड्या सद्यस्थितीत कोकणात थांबल्या आहेत. काही फेऱ्या रद्द होत होत्या, बस परत आल्याने प्रवासी सेवा सुरळीत होत आहे. कमलेश धनराळे, विभागीय वाहतूक अधिकारी, नगर.