भाजप आमदार प्रशांत बंब यांच्या सभेमध्ये पुन्हा गोंधळ:गवळी शिवरा गावामध्ये वातावरण तापले; प्रश्न विचारणाऱ्या तरुणास धक्काबुक्की

गंगापूर मतदारसंघामध्ये राजकीय वातावरण तापले आहे. गेले काही दिवस भाजप उमेदवार प्रशांत बंब यांच्या प्रचारसभामध्ये गोंधळ पाहायला मिळत आहे. गवळी शिवरा गावात 2 तरुणांनी रेल्वे संदर्भात आश्वासन दिले होते अजून आले नाही म्हणत प्रश्न विचारले यानंतर सभेमध्ये गोंधळ झाला. दरम्यान प्रशांत बंब यांनी त्या तरुणांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी न ऐकल्याने सभेला उपस्थिती नागरिक आणि तरुणांमध्ये मोठा वाद झाला. याबाबत सभेत गोंधळ घालून वातावरण दूषित करण्याचा विरोधकांचा डाव असल्याचा आरोप सभेनंतर प्रशांत बंब यांनी केला आहे. आमदार प्रशांत बंब यांची मतदारांना धमकी महायुतीचे गंगापूर- खूलताबाद मतदारसंघाचे उमेदवार प्रशांत बंब यांनी मतदारांना धमकी दिल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. यात प्रशांत बंब माझ्या मित्राला आदेश दिला तर पळता भुई थोडी होईल, खाली बैस जास्त आवाज करू नको असे म्हणताना दिसत आहे. चव्हाण-बंब यांच्यात लढत गंगापूर-खुलताबाद विधानसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे आमदार सतीश चव्हाण यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने भाजपचे प्रशांत बंब व चव्हाण यांच्यात अटीतटीची लढत होणार, असे चित्र आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये पदवीधर मतदारसंघाचे आमदार असलेल्या सतीश चव्हाण यांनी मागील दोन वर्षांपासून गंगापूर-खुलताबाद मतदारसंघामध्ये विधानसभा लढवण्याचे संकेत दिले होते. परंतु महायुतीमध्ये हा मतदारसंघ भाजपला सुटल्याने व काही दिवसांपूर्वी भाजपचे तिकीट विद्यमान आ. बंब यांना निश्चित असल्याने आ. चव्हाण यांनी सरकारविरोधात पत्र लिहून सरकारच्या कारभाराबाबत जाहीर नाराजी व्यक्त केल्याने त्यांना पक्षविरोधी कारवायांच्या कारणावरून निलंबित केले होते. तेव्हा त्यांनी शरद पवार गटात जाऊन उमेदवारी घेतली.

  

Share