मंत्रिमंडळ न मिळाल्याने छगन भुजबळ नाराज:भुजबळ साहेब आमचे सन्माननीय नेते आहेत, हसन मुश्रीफ यांनी मांडली भूमिका

महाराष्ट्रात हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस असून सर्वच मंत्रिमंडळ नागपूर येथे दाखल झाले आहेत. यावेळी पत्रकारांनी आमदार तथा मंत्री हसन मु मंत्रिपदाची शपथ घेतली याबद्दल मला आनंद माझ्यासोबतच सर्व मतदारांना होत आहे. माझ्या पक्षाने आणि आमच्या पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे तसेच राष्ट्रीय सरचिटणीस प्रफुल्ल पटेल यांनी माझ्याकडे मोठी जबाबदारी दिली आहे. ही जबाबदारी मी उत्तमप्रकारे पार पाडेल, असा विश्वास हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला आहे. छगन भुजबळ यांना मंत्रिपद न मिळाल्याने ते नाराज असल्याचे समोर आले आहे. पत्रकारांशी बोलताना देखील त्यांची नाराजी स्पष्ट दिसून आली. समाज सगळ्यांची समजूत घालेल आणि कसलीही अपेक्षा नाही, असे म्हणत त्यांनी पत्रकारांशी बोलणे टाळले असल्याचे दिसून आले. यावर बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले, भुजबळ साहेब आमचे सन्माननीय नेते आहेत. आम्ही सगळे मंडळी भेटून नक्कीच त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करू. शेवटी आमच्या श्रेष्ठींनी सुद्धा त्यांच्याबद्दल काय करावे हे ठरवून ठेवले असणार असे मला वाटते, असे हसन मुश्रीफ यांनी म्हंटले आहे. दरम्यान, महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे नेते व आमदार छगन भुजबळ यांना मंत्रिपद न मिळाल्याने ते नाराज असल्याचे समोर आले आहेत. शपथविधीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने आमदार निवासासमोरच्या देशपांडे सभागृहात पक्षाचा मेळावा आणि नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार सोहळा ठेवला होता. पक्षातील ज्येष्ठ-कनिष्ठ सहकाऱ्यांना निरोप मिळूनही मंत्रिपदाबाबत भुजबळ यांना कसलाही निरोप नसल्याने सकाळपासून संबंधितांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची चर्चा रंगली होती. महायुतीमध्ये अनेक आमदार नाराज असल्याचे समोर आले आहे. भंडाराचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर हे देखील नाराज असून त्यांनी थेट त्यांच्या उपनेते पदाचा तसेच विदर्भ समन्वयक पदाचा देखील राजीनामा दिला आहे. तसेच वेळ पडलीच तर आमदारकीचा देखील राजीनामा देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे महायुतीमधील नाराज आमदार काय भूमिका घेतात याकडे पाहणे देखील महत्त्वाचे असणार आहे.

  

Share