छत्रपती संभाजीराजेंनी 16 भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का?:मराठी भाषेच्या मुद्द्यावर बोलताना शिंदेच्या आमदाराचे संतापजनक व्यक्तव्य छत्रपती संभाजीराजेंनी 16 भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का?:मराठी भाषेच्या मुद्द्यावर बोलताना शिंदेच्या आमदाराचे संतापजनक व्यक्तव्य

छत्रपती संभाजीराजेंनी 16 भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का?:मराठी भाषेच्या मुद्द्यावर बोलताना शिंदेच्या आमदाराचे संतापजनक व्यक्तव्य

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त मेळाव्यानंतर प्रतिक्रिया देताना तसेच मराठी भाषेच्या मुद्द्यावर बोलताना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांची जीभ घसरली. लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे बोलताना गायकवाड यांनी ठाकरे बंधूंवर टीका करताना छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासंदर्भात अपमानास्पद शब्द वापरले. छत्रपती संभाजीराजे यांनी 16 भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? असा संतापजनक सवाल संजय गायकवाड यांनी केला. शिवाय बाळासाहेब असतानाही ठाकरे ब्रँड नव्हता, अशी टीकाही त्यांनी केली. राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून तृतीय भाषा शिकवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात ठाकरे बंधूंनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर राज्य सरकारने निर्णय मागे घेतला. या निर्णयानंतर मराठी माणसाच्या या दबावामुळे विजय मिळाल्याचे म्हणत दोन्ही ठाकरे बंधूंचा आज विजयी मेळावा पार पडला. या विजयी मेळाव्या निमित्ताने ठाकरे बंधून पहिल्यांदाज 18 वर्षानंतर एका व्यासपीठावर आले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आल्यानंतर त्यांच्यावर टीका करताना संजय गायकवाड यांनी छत्रपती संभाजीराजे आणि शिवरायांबद्दलही अपशब्द वापरले. त्यांच्या या विधानामुळे नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. नेमके काय म्हणाले संजय गायकवाड? मराठी आणि हिंदी भाषेच्या वादावर बोलताना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड म्हणाले, विषय फक्त हिंदीचा नाही, जगात आज टिकायचे असेल तर तुम्हाला अनेक भाषा शिकल्या पाहिजेत. छत्रपती संभाजी महाराजांनी 16 भाषा शिकल्या. ते मुर्ख होते का? असा प्रश्न करत शिवाजी महाराजही बहुभाषिक होते. जिजाऊ, ताराराणी, येसूबाई यांनी अनेक भाषा शिकल्या. ते सर्व लोक काही मूर्ख होते का? असे अपशब्द संजय गायकवाड यांनी वापरले. ठाकरे ब्रँड उरला नाही, असता तर… राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यावर भाष्य करताना संजय गायकवाड म्हणाले, पंधरा वर्षांपूर्वीच ते एकत्रित आले असते तर काही फरक पडला असता. पण बाळासाहेबांचा विचार उद्धव ठाकरे सोडून गेले. त्याच्यामुळे आज हिंदुत्व शिल्लक राहिलेले नाही. राज ठाकरे यांनी टाळीला टाळी देण्यासाठी खूप उशीर केलेला आहे. आता ठाकरे नावाचा ब्रँड राहिलेला नाही. आता तुम्ही किती लोकांची काम करतात यावर सगळे ठरते. ठाकरे नावाचा ब्रँड जर असता तर, बाळासाहेब जिवंत असतानाच 288 जागा निवडून आल्या असत्या. त्यावेळीही 70-74 च्या पुढे शिवसेना जात नव्हती. आता हे दोघे एकत्र आल्याने काहीही फरक पडणार नाही. मराठी पुरेशी नाही, उर्दूसुद्धा शिकायला हवी संजय गायकवाड पुढे म्हणाले, आपण परराज्यात गेल्यावर तिथे मराठीत बोलणार का? जगात टीकायचे असेल तर सगळ्या भाषा अवगत असल्या पाहिजेत. पाकिस्तानचा दहशतवाद ओळखायचा, रोखायचा असेल तर आपणाला उर्दू भाषा ही अवगत असली पाहिजे. तसेच जो कोणी महाराष्ट्रात राहून मराठी बोलण्याची लाज वाटते म्हणतो त्याचे थोबाड फोडले पाहिजे. मराठीचा अपमान आपण सहन करता कामा नये असेही आमदार संजय गायकवाड म्हणाले.

  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *