छावा फिल्म म्हणून वाईट:इतिहास म्हणून बघायला गेले तरी प्रॉब्लेमॅटीक, अभिनेता आस्ताद काळेची चित्रपटावर टीका

छावा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तसेच अनेकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. त्याचसोबत हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात देखील अडकला होता. मात्र, टीकेपेक्षा कौतुकच अधिक झाले आहे. विकी कौशलने या चित्रपटात छावाची अर्थातच छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली होती. तर अक्षय खन्ना यांनी औरंगजेबाची भूमिका निभावली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले होते. या चित्रपटात अनेक मराठी कलाकार होते, त्यात आस्ताद काळे यांनी देखील एक छोटी नकारात्मक भूमिका केली होती. मात्र आस्ताद काळे यांनी या चित्रपटावर टीका केली आहे. अभिनेता आस्ताद काळे यांनी फेसबुकवर 5 पोस्ट केल्या आहेत. त्यात तो लिहितो, “मी आता खरे बोलणार आहे.. छावा वाईट फिल्म आहे. फिल्म म्हणून वाईट आहे. इतिहास म्हणून बघायला गेलात तरी प्रॉब्लेमॅटीक आहे. सर्वतोपरी वाईट आहे.” तसेच पुढे ते लिहितात, “हा कुठला इतिहास आहे? महाराणी सोयराबाई सरकारांनी छत्रपती संभाजी महाराजांविरुद्ध औरंगजेबाच्या मुलाला पत्र पाठवले होते? काय पुरावा आहेत याचे?” तसेच सोयराबाई राणी सरकार या परपुरुषासामोर बसून पान लावतायत? आणि ते खातायत? हे कसे चालते?” पुढे ते लिहितात, सोयराबाई राणी सरकारांचे अंत्यसंस्कार एका रॅनडम नदी काठी ? असे नाही व्हायचे हो! असे पोस्ट आस्ताद काळे यांनी फेसबुकवर केले आहे. तसेच आस्ताद काळे यांनी आणखी एक पोस्ट करत म्हटले की औरंगजेबचे वय आणि आजारपण बघता, तो या वेगाने चालू शकेल? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. या फेसबुक पोस्टवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यात अनेकांनी त्यांची खिल्ली उडवली आहे. ‘अरे मग तू का यामध्ये काम केलंस?’,’सिनेमा येऊन बरेच दिवस झाले आज का बोलतोय?’ अशा कमेंट्स त्याच्या पोस्टवर येत आहेत. दरम्यान, या चित्रपटात मराठी कलाकारांनी देखील उत्तम काम केले आहे. संतोष जुवेकर, सारंग साठ्ये, सुव्रत जोशी यांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांवर आपली छाप सोडली आहे. तसेच चित्रपट देखील चांगलाच हीट ठरला आहे.

  

Share