2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व 7 आरोपींच्या निर्दोष सुटकेवर भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले की, “मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील न्यायालयाचा निकाल हा काँग्रेस आणि गांधी कुटुंबाच्या दोन्ही गालावर चपराक आहे. राजीव गांधी असोत, सोनिया गांधी असोत, राहुल गांधी असोत किंवा प्रियांका गांधी असोत. त्यांचा एकमेव अजेंडा हिंदूंना बदनाम करणे आणि मुस्लिमांना खुश करणे हा राहिला आहे. मुस्लिम मतपेढीला खूश करण्यासाठी काँग्रेसने पाकिस्तानी दहशतवाद्यांबद्दल सहानुभूतीही दाखवली आहे. किरीट सोमय्या म्हणाले की “अनेक वर्षांपासून मुस्लिम मतपेढीला खूश करण्यासाठी हिंदूंना बाजूला ठेवण्यात आले. आता हे सिद्ध झाले आहे की हिंदू धर्म राष्ट्रवादावर विश्वास ठेवतो. ‘भगवा आतंकवाद’ असे काही नाही. 2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व 7 आरोपींच्या निर्दोष सुटकेवर भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले, “मी न्यायव्यवस्थेचे आभार मानतो आणि चिदंबरम, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी देशातील हिंदूंची माफी मागावी, अशी मागणी देखील त्यांनी केली. सर्वांची निर्दोष मुक्तता मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सात आरोपींविरुद्ध सुनावणी एनआयए विशेष न्यायालयात सुरू होती. 29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगाव येथे झालेल्या भिक्खू चौक बॉम्बस्फोट प्रकरणाची सुनावणी मुंबईतील एनआयए विशेष सत्र न्यायालयात सुरू होती. मुख्य आरोपींमध्ये भाजपच्या माजी खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर, मेजर (निवृत्त) रमेश उपाध्याय, लेफ्टनंट कर्नल श्रीकांत प्रसाद पुरोहित, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, लेफ्टनंट कर्नल पुरोहित आणि समीर कुलकर्णी हे आरोपी होते. या सर्वांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.