दादर हनुमान मंदिर प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया:म्हणाले – रेल्वे प्रशासनाशी चर्चा करून मार्ग काढू, मंदिराचे नियमितीकरण करून घेऊ

दादर येथील हनुमान मंदिराला रेल्वेने नोटीस दिल्यानंतर राजकारण चांगलेच तापले होते. या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी सरकारला धारवेर धरले होते. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून आरोप-प्रत्यारोप आणि दावे-प्रतिदावे करण्यात आले. अशात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे. न्यायालयाने मागील काळात निर्णय देऊन मंदिरांच्या श्रेणी केल्या आहेत. जुनी मंदिरे त्या श्रेणीनुसार नियमित करता येतात. त्यामुळे रेल्वे प्रशासनाशी चर्चा करून आम्ही त्यातून नक्कीच मार्ग काढू. नियमातील तरतुदीनुसार त्या मंदिराचे नियमितीकरण आपण करून घेऊ, असे देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले. ते आज पुणे येथे माध्यमांशी संवाद साधत होते. रेल्वे प्रशासनाकडून दादर स्थानकावर पुनर्विकासाची कामे करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्यामुळे दादर स्थानकाजवळील 80 वर्षे जुने हनुमान मंदिर हटवण्याबाबत मंदिर प्रशासनाला रेल्वेकडून नोटीस पाठवण्यात आली होती. या नोटीशीला स्थानिकांसह राजकीय विरोधकांनीही तीव्र विरोध केला. या प्रकरणावरून उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर जोरदार हल्लाबोल केला होता. नोटीसीला स्थगिती
या प्रकरणी आदित्य ठाकरे यांनी मंदिरात जाऊन आरती करण्याची घोषणा केल्यानंतर वातारवण अधिकच तापले होते. पण तत्पूर्वी, रेल्वेने आपल्या नोटीसीला स्थगिती दिली. भाजप नेते मंगलप्रभात लोढा यांनी शनिवारी या मंदिराला भेट दिल्यानंतर ही माहिती दिली. रेल्वेने आपल्या नोटीसीला स्थगिती दिली आहे. त्यामुळे या मंदिरात यापुढेही हनुमानाची नित्यपूजा व आरती सुरू राहील, असे लोढा यांनी सांगितले. आदित्य ठाकरेंकडून हनुमानाची आरती
दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी घोषणा केल्याप्रमाणे शनिवारी सायंकाळी दादर येथील हनुमान मंदिरात जाऊन महाआरती केली. यावेळी यावेळी त्यांच्यासोबत खासदार संजय राऊत, खासदार अनिल देसाई, सचिन अहिर यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. हे ही वाचा… दादरच्या हनुमान मंदिरात भाजप – ठाकरे गटात मोठा राडा:किरीट सोमय्यांना पाहताच ठाकरेंचे शिवसैनिक आक्रमक, पोलिसांनी काढले बाहेर दादर येथील हनुमान मंदिराला रेल्वेने नोटीस दिली होती. त्यावरून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे चांगलेच आक्रमक झाले होते. भाजप नेते किरीट सोमय्या मंदिरात दर्शनासाठी आले होते. यावेळी मंदिराच्या परिसरात मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते. किराट सोमय्या मंदिरात येताच शिवसैनिक आक्रमक झाले. त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते आणि ठाकरेंचे शिवसैनिक आमने-सामने आल्याने गदारोळ उडाला होता. ठाकरेंच्या शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांना बाहेर काढण्याची मागणी केली. सविस्तर वाचा…

  

Share