मुख्यमंत्री ममतांनी मागितली माफी; न्यायासाठी राजीनामा देण्यासही तयार:विद्यार्थी आंदोलन, अफवा रोखण्यासाठी पाऊल

आर.जी. कार वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि खुनाच्या घटनेच्या विरोधात ३२ दिवसांपासून कनिष्ठ डॉक्टरांचे आंदोलन सुरू आहे. सरकारच्या वतीने गुरुवारी ३२ डॉक्टरांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी पाचारण केले होते. पण या चर्चेचे थेट प्रक्षेपण करा, अशी डॉक्टरांची मागणी होती. ती ममता सरकारने मान्य केली नाही. दरम्यान, दोन तासांच्या प्रतीक्षेनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी राजीनामा देण्यास तयार असल्याचे सांगितले. तसेच हा गोंधळ दूर करण्यात अपयशी ठरल्याबद्दल ममतांनी सर्वांची माफीही मागितली. सुप्रीम कोर्टाने याप्रकरणी मुदत संपल्यानंतर कारवाई करण्याचे स्वातंत्र्य राज्य सरकारला दिले आहे. मात्र आपण डॉक्टरांना माफ केल्याचे सांगून ममतांनी त्यांना कामावर परत येण्याची विनंती केली. यानंतर ममता सचिवालयातून बाहेर पडल्या. मात्र, डॉक्टर सचिवालयासमोरच ठाण मांडून आहेत.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment