चोहोट्टा बाजार येथे महिलादिनी कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
अकोट तालुक्यातील चोहोट्टा बाजार येथील कृषी उत्पन्न उपबाजार समिती सभागृहात महिला दिनानिमित्त रयत शेतकरी संघटनेचे पूर्णाजी खोडके व मित्र परिवार व उपसरपंच विजया राणे यांच्या संयुक्त सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी महिलांचा सत्कार केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हरिदीनी वाघोडे होत्या. कावसा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकिता पाटकर, चोहोट्टा बाजार आरोग्य उपकेंद्राच्या डॉ. रोझी, उपसरपंच विजया राणे,सरला पेटे, मंगला पुडकर, शिक्षिका सारिका बुले उपस्थित होत्या. या वेळी कावसा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकिता पाटकर म्हणाल्या की. महिलांचा सन्मान वर्षातून एकदा सन्मान न होता, वर्षातील ३६५ दिवस व्हावा. या वेळी रयत शेतकरी संघटनेचे विदर्भ युवा अध्यक्ष पुर्णाजी खोडके यांनी मनोगत व्यक्त केले.तालुक्यातील चोहोट्टा बाजार परिसरातील कर्तृत्वान महिलांचा आशा सेविका अंगणवाडी सेविका, बचत गटासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा, पाणी फाउंडेशनच्या कर्तृत्ववान महिलांचा सत्कार केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शारदा आठवडे यांनी केले तर उपसरपंच विजया राणे यांनी आभार मानले. सर्वच क्षेत्रात आज महिला आघाडीवर : उपसरपंच राणे जागतिक महिला दिनानिमित्त उपसरपंच विजया राणेंनी सांगितले प्राचीन काळापासून महिलांवर अत्याचार होत .आहेत. कारण महिला शांत असतात मात्र सध्या परिस्थिती बदललेली आहे. २१ व्या शतकातील महिला स्वतंत्र विचाराच्या सुरक्षित व पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत हे अभिमानास्पद आहे, सर्व क्षेत्रात आज महिला आघाडीवर आहेत. आपल्यावर अन्याय अत्याचार होत असेल तर आपणच स्वतः त्याविरुद्ध पेटून उठावे, असे त्या म्हणाल्या.