‘इंडिया’मध्ये नेतृत्वावरून वाद; ममतांना ठाकरे, सपाचे पाठबळ:महाराष्ट्रातील काँग्रेसच्या पराभवामुळे मित्र पक्षांनी दबाव वाढवला

लाेकसभा निवडणुकीत भाजपला २४० जागांवरच रोखण्यात यशस्वी ठरल्याने उत्साहित ‘इंडिया’ आघाडीत ६ महिन्यांतच धुसफूस सुरू झाली. जम्मू-काश्मीर व हरियाणात काँग्रेसच्या अपयशामुळे त्याची सुरुवात झाली. महाराष्ट्रातही काँग्रेसच्या पराभवामुळे संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आघाडीतील एेक्याला सुरुंग लागला आहे. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी आघाडीचे नेतृत्व करण्याची इच्छा व्यक्त केली. उद्धव ठाकरे व समाजवादी पार्टीनेही शनिवारी त्याचे समर्थन केले. काँग्रेसच्या एका गटाचे म्हणणे आहे की जो पक्ष सर्वात मोठा त्याच्याकडेच नेतृत्व पाहिजे. पण काँग्रेसमधील दुसरा गट मात्र तृणमूल किंवा समाजवादी पार्टीला आघाडीचे संयोजकपद देण्यास सहमती दर्शवत आहे. यामुळे आघाडीचे नेतृत्व कुणाकडे, यावरून मित्रपक्षांनी काँग्रेसवर दबाव वाढवला आहे. लोकसभेनंतर ४ राज्यांत निवडणुका झाल्या. त्यात झारखंडमध्येच काँग्रेस जागा वाचवू शकली. तिथेही झामुमोकडे नेतृत्व आहे. हरियाणात भाजपने काँग्रेसचा पराभव केला. महाराष्ट्रातही उद्धवसेनेने काँग्रेस पक्षावर प्रश्नचिन्ह उपस्थित केेले आहे. संसदेच्या अधिवेशनात आघाडीत मतभेद : अदानी प्रकरणात तृणमूल काँग्रेसने वेगळी भूमिका घेत काँग्रेसशी अंतर ठेवले. समाजवादी पक्षही या मुद्द्यावर काँग्रेस सोबत नाही. या दोन्ही पक्षांचे म्हणणे आहे की, हा मुद्दा जनतेशी संबंधित नाही. त्यामुळे यात काँग्रेसला साथ देणे फायदेशीर होणार नाही. दुसरीकडे, संसदेत समन्वयासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बोलावलेल्या बैठकीस ममतांनी दांडी मारली. काँग्रेस मित्रपक्षांनी गांभीर्याने घेत नसल्याचा त्यांचा आरोप आहे. ममता आघाडीत याव्यात असे आम्हाला वाटते. त्यांच्याशी चर्चेसाठी आम्ही लवकरच कोलकात्याला जाऊ. – संजय राऊत, उद्धवसेना हिवाळी अधिवेशनात लोकसभेत बैठक व्यवस्था बदलण्यावरुनही आघाडीत मतभेद झालेत. आधी इंडिया आघाडीच्या सर्व नेत्यांची आसन व्यवस्था समान होती. समाजवादी पक्षप्रमुख अखिलेश यादव राहुल गांधींसोबत आठव्या रांगेत पुढे बसत. आता सहाव्या रांगेत त्यांना पहिली सीट आहे. आपल्याकडे दुर्लक्ष होत असल्याने सपा व आप काँग्रेसवर नाराज होती. आता संयोजक पदावरुन सपा, आप, उद्धव सेना यांचे सूरही जुळू लागले आहेत. काँग्रेसनंतर (९९ खासदार) सपा (३७), तृणमूल (२७) हे आघाडीत दोन पक्ष मोठे आहेत. उद्धव सेना ९, आप ३ यांना सोबत घेतले तर काँग्रेसशिवाय या पक्षांची खासदार संख्या ७६ होते. डीएमके (२२) काँग्रेससोबत आहे. विधानसभेत पराभवानंतर शरद पवार (८) बॅकफूटवर गेले. बिहार निवडणुकीपूर्वी राजद (४) दबाव टाकू शकतो. त्यामुळे काँग्रेस अडचणीत येण्याची शक्यता.
संसदेच्या अधिवेशनात आघाडीत मतभेद अदानी प्रकरणात तृणमूल काँग्रेसने वेगळी भूमिका घेत काँग्रेसशी अंतर ठेवले. समाजवादी पक्षही या मुद्द्यावर काँग्रेस सोबत नाही. या दोन्ही पक्षांचे म्हणणे आहे की, हा मुद्दा जनतेशी संबंधित नाही. त्यामुळे यात काँग्रेसला साथ देणे फायदेशीर होणार नाही. दुसरीकडे, संसदेत समन्वयासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बोलावलेल्या बैठकीस ममतांनी दांडी मारली. काँग्रेस मित्रपक्षांनी गांभीर्याने घेत नसल्याचा त्यांचा आरोप आहे.

Share