दादर कबुतरखाना आंदोलनावर मंत्री मंगल प्रभात लोढा स्पष्टच बोलले:म्हणाले- आंदोलनात बाहेरचे लोक आले होते; किशोरी पेडणेकरांची सरकारवर टीका दादर कबुतरखाना आंदोलनावर मंत्री मंगल प्रभात लोढा स्पष्टच बोलले:म्हणाले- आंदोलनात बाहेरचे लोक आले होते; किशोरी पेडणेकरांची सरकारवर टीका

दादर कबुतरखाना आंदोलनावर मंत्री मंगल प्रभात लोढा स्पष्टच बोलले:म्हणाले- आंदोलनात बाहेरचे लोक आले होते; किशोरी पेडणेकरांची सरकारवर टीका

कबुतरखाना परिसरात जे झाले ते चुकीचे झाले असल्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी म्हटले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दादरमधील कबुतरखाना बंद करण्यात आला होता. त्यानंतर दादर परिसरात असलेल्या कबुतर खान्यावरील झाकण्यात आलेली ताडपत्री काढून टाकण्यात आली. त्यामुळे जैन समाज बांधव आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी पोलिसांसोबत काही काळ झटापट देखील झाली. त्यामुळे काही काळासाठी तणाव निर्माण झाला होता. मंगल प्रभात लोढा यांनी मध्यस्थी करत वाद शांत करण्याचा प्रयत्न केला. जैन समाजाने केलेल्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना मंगल प्रभात लोढा म्हणाले, आज कबुतरखाना परिसरात जे झाले ते चुकीचे झाले. कायद्या हातात घेऊ नका. मुंबईकरांनी शांतता राखावी. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्य त्या सूचना दिल्या आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे लोढा यांनी म्हटले आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी पर्यायी उपाययोजना राबवण्याचे स्पष्ट निर्देश दिले असल्याची माहिती देखील लोढा यांनी दिली आहे. मंगल प्रभात लोढा यांनी घटनास्थळी जाऊन पोलिस अधिकारी तसेच ट्रस्टशी संवाद साधला. ट्रस्टच्या म्हणण्यानुसार या आंदोलनात बाहेरचे लोक आले होते. त्यांनी हे सगळे केले आहे, आमचा यात संबंध नाही. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्णयाचे जैन समाजाच्या ट्रस्टने समाधान मानले होते तसेच त्यांची सभा देखील पुढे ढकलली होती, असे लोढा यांनी म्हटले आहे. किशोरी पेडणेकरांचा सरकारवर निशाणा मुंबईच्या माजी महापौर व शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया देत महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. पेडणेकर म्हणाल्या, याबाबत सरकार बॅकफूटवर का जात आहे? प्रत्येक गोष्टीत बॅकफूटवर जाऊन निर्णय घेत आहेत. मुळामध्ये कबुतराच्या विष्ठेमुळे दमा चालू होतो किंवा कोणते आजार होतात हे नक्की बरोबर आहे, आणि सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर त्यानुसार सुप्रीम कोर्टाचा अपमान होणार नाही अशा पद्धतीने पहिल्यांदा पर्यायी जागा देऊन त्यांना शिफ्ट करणे गरजेचे होते. पर्यायी व्यवस्था द्या, त्यांचा जीव वाचवा पुढे बोलताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या, जवळपास 93 वर्षाचा कबूतरखाना आहे, काल परवाच्या झोपडपट्टीला जर आपण संरक्षण देतो, तर यालाही संरक्षण दिले पाहिजे. फक्त मनुष्यवस्तीपासून त्याला लांब नेता येईल का? त्यांचा दाणापाणी थांबून चालणार नाही, ज्या क्रूर पद्धतीने सर्व काही झाले, त्याबाबतीत जैन समाज अगदीच हळवा झाला आहे. समाजा-समाजामध्ये अशा तेढ निर्माण होतील. त्याबाबतीत पर्याय व्यवस्था द्या. त्यांचा जीव वाचवा. त्यांनाही पर्याय व्यवस्था देऊन दानापाणी द्या आणि मनुष्यवस्ती पासून लांब घेऊन जा. तुम्हाला कोणी अडवले आहे का? असा सवालही पेडणेकर यांनी उपस्थित केला. तोडगा निघाला पाहिजे दादागिरी कराल तर असा प्रत्येक समाज सरकारच्या अंगावर येणार आहे. ही मस्ती होते मग. तुम्ही सुप्रीम कोर्टाला समजावायला पाहिजे होते. आम्ही पर्याय व्यवस्था देतो यांचा दाणापाणी चालू ठेवतो. मनुष्यवस्ती पासून लांब नेतो, असेही किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे. तसेच प्रत्येक वेळी सरकार बॅकफूटवर जात आहे. याचा विचार होत नाही का? की फक्त आमदार कुठे फोडायचे? कसे फोडायचे? कधी न्यायचे? किती पैसे द्यायचे? याच्यातच वेळ जातोय का? यामध्ये मध्यम मार्ग काढला पाहिजे, तोडगा निघाला पाहिजे असेही किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.

  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *