हिंगोली बाजार समितीचे दोन संचालक गुरुजी अपात्र:जिल्हा उपनिबंधकांचा निर्णय

हिंगोली बाजार समितीचे दोन संचालक गुरुजी अपात्र:जिल्हा उपनिबंधकांचा निर्णय

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दोन संचालक गुरुजींना त्यांचे उत्पन्नाचे मुख्यस्त्रोत शेती नसल्याच्या कारणावरून त्यांना संचालक पदावर राहण्यास अपात्र ठरविण्यात आले आहे. याबाबतचा निर्णय जिल्हा उपनिबंधक डॉ. एल. एल. बोराडे यांनी नुकताच दिला आहे. विशेष म्हणजे एक संचालक विद्यमान उपसभापती आहेत. हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात झाली आहे. या निवडणुकीत डिग्रस कऱ्हाळे येथील स्वामी विवेकानंद विद्यालयाच्या मुख्याध्यापक पदावर असलेले शामराव जगताप व जयपूर येथील संगमेश्‍वर विद्यालयात मुख्याध्यापक पदावर कार्यरत असलेले अशोक श्रीरामे या दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या निवडणुकीत दोघेही विजयी झाले आहेत. सध्या श्रीरामे हे बाजार समितीचे उपसभापती असून जगताप हे संचालकपदावर कार्यरत आहेत. दरम्यान, उपसभापती श्रीरामे यांच्या विरुध्द शंकर पोले यांनी तर संचालक जगताप यांच्या विरुध्द परसराम राऊत यांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे अपील दाखल केले होते. या दोघांच्याही उत्पन्नाचा मुख्यस्त्रोत शेती नसल्याचे अपीलामध्ये नमुद केले होते. त्यासोबत त्यांनी दोघांचेही वेतन प्रमाणपत्र सोबत जोडले होते. सदर प्रकरण जिल्हा उपनिबंधक डॉ. एस. एल. बोराडे यांच्या समोर सुनावणीसाठी आले होते. या प्रकरणात दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर बाजार समितीचे उपसभापती अशोक श्रीरामे व संचालक शामराव जगताप यांचे उत्पन्नाचे मुख्यस्त्रोत शेतीपासून नसल्याने त्यांनी बाजार समितीच्या संचालकपदी राहण्यास अपात्र ठरवित असल्याचा निर्णय जिल्हा उपनिबंधक डॉ. बोराडे यांनी दिला आहे. या शिवाय वरील निर्णयाविरुध्द ३० दिवसांच्या आत विभागीय सहनिबंधक छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे दाद मागता येणार असल्याचे निर्णयात नमुद केले आहे.

​हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दोन संचालक गुरुजींना त्यांचे उत्पन्नाचे मुख्यस्त्रोत शेती नसल्याच्या कारणावरून त्यांना संचालक पदावर राहण्यास अपात्र ठरविण्यात आले आहे. याबाबतचा निर्णय जिल्हा उपनिबंधक डॉ. एल. एल. बोराडे यांनी नुकताच दिला आहे. विशेष म्हणजे एक संचालक विद्यमान उपसभापती आहेत. हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात झाली आहे. या निवडणुकीत डिग्रस कऱ्हाळे येथील स्वामी विवेकानंद विद्यालयाच्या मुख्याध्यापक पदावर असलेले शामराव जगताप व जयपूर येथील संगमेश्‍वर विद्यालयात मुख्याध्यापक पदावर कार्यरत असलेले अशोक श्रीरामे या दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या निवडणुकीत दोघेही विजयी झाले आहेत. सध्या श्रीरामे हे बाजार समितीचे उपसभापती असून जगताप हे संचालकपदावर कार्यरत आहेत. दरम्यान, उपसभापती श्रीरामे यांच्या विरुध्द शंकर पोले यांनी तर संचालक जगताप यांच्या विरुध्द परसराम राऊत यांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे अपील दाखल केले होते. या दोघांच्याही उत्पन्नाचा मुख्यस्त्रोत शेती नसल्याचे अपीलामध्ये नमुद केले होते. त्यासोबत त्यांनी दोघांचेही वेतन प्रमाणपत्र सोबत जोडले होते. सदर प्रकरण जिल्हा उपनिबंधक डॉ. एस. एल. बोराडे यांच्या समोर सुनावणीसाठी आले होते. या प्रकरणात दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर बाजार समितीचे उपसभापती अशोक श्रीरामे व संचालक शामराव जगताप यांचे उत्पन्नाचे मुख्यस्त्रोत शेतीपासून नसल्याने त्यांनी बाजार समितीच्या संचालकपदी राहण्यास अपात्र ठरवित असल्याचा निर्णय जिल्हा उपनिबंधक डॉ. बोराडे यांनी दिला आहे. या शिवाय वरील निर्णयाविरुध्द ३० दिवसांच्या आत विभागीय सहनिबंधक छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे दाद मागता येणार असल्याचे निर्णयात नमुद केले आहे.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment