विरोधकांना दरवेळी उत्तर देण्याची गरज नाही. कमी बोला आणि वादग्रस्त वक्तव्य टाळा, अशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना दिल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कामाला लागा, असे आदेश देखील त्यांनी दिले आहेत. वादग्रस्त वक्तव्याने पक्षाचे नाव खराब होत असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दरम्यान त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. आता आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. या पार्श्वभूमीवर ग्राउंड झिरोवर उतरून कामाला लागा, अशा सूचना एकनाथ शिंदे यांनी आपल्या सर्व मंत्री आणि आमदारांना दिल्या आहेत. विरोधकांच्या आरोपाला आपल्या कामातूनच उत्तर देण्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी कालच गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील भेट घेतली. यासह आपल्या सर्व पक्षाच्या खासदारांची बैठक देखील एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. एकनाथ शिंदे यांच्या या दिल्ली दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत काही चर्चा झाली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतरच सर्व मंत्री आणि आमदारांना या सूचना दिल्या गेल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर लक्ष एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे लोकसभा निवडणुकीत नुकसान झाले असले तरी विधानसभा निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळाले आहे. मात्र, या दोन्ही निवडणुकीत भाजपचा चेहरा शिंदे यांच्या उमेदरांसमोर होता. मात्र, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा कस लागणार आहे. त्यामुळे शिंदे यांनी आपल्या सर्व आमदार आणि मंत्र्यांना कामाला लागण्याच्या सूचना केल्या आहेत.