विभागीय अध्यक्षपदी प्राचार्य डॉ. मीनल भोंडे यांची निवड

अमरावती अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ या विभागीय संघटनेच्या सर्व कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. अध्यक्षपदी प्राचार्य डॉ. मीनल भोंडे यांची नियुक्ती केली आहे. शैक्षिक महासंघाचे राष्ट्रीय सचिव तथा महाराष्ट्राचे प्रांताध्यक्ष (उच्च शिक्षण) प्रा. प्रदीप खेडकर यांच्या अध्यक्षतेत तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यवाह प्रा. अतुल मोघे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवडणूक पार पडली. कार्यकारिणीतील इतर पदाधिकाऱ्यांमध्ये विभागीय उपाध्यक्ष डॉ. संतोष कुटे, डॉ. सच्चिदानंद बिच्चेवार, प्रा. डॉ. गोपाल ढोकणे, प्रा. डॉ. बालकृष्ण इंगळे, प्रा. डॉ. नीलेश तारे, प्रा. डॉ. अनुप शर्मा व प्रा. डॉ. विनोद गायकवाड यांचा समावेश असून, विभागीय सहमंत्री म्हणून प्रा. डॉ. श्रीकृष्ण काकडे, प्रा. डॉ. संतोष धामणे, प्रा. डॉ. संदीप चेडे, प्रा. डॉ. चंद्रशेखर कासार, प्रा. डॉ. महादेव रिठे व प्रा. डॉ. गजानन लामधाडे यांना स्थान देण्यात आले. महामंत्री व कोषाध्यक्ष पदाचे दायित्व अनुक्रमे प्रा. डॉ. मंगेश अडगोकर आणि डॉ. दिनेश खेडकर यांना देण्यात आले.प्राचार्य संवर्ग प्रमुख म्हणून प्राचार्य डॉ. नंदकिशोर ठाकरे व सहप्रमुख प्राचार्य डॉ. संजय खेरडे, महिला प्रमुख डॉ. रेखा मग्गिरवार व सहप्रमुख डॉ. अंजू खेडकर, डॉ. अजित भिसे, डॉ. हेमंत चांडक, डॉ. राजकुमार शर्मा, डॉ. शिरिष टोपरे, डॉ. हरिदास आखरे, डॉ. वासुदेव गोलाईत आदींना जबाबदारी देण्यात आली. विभागीय कार्यकारी परिषदेत सदस्य म्हणून प्राचार्य डॉ. डी. टी. इंगोले, प्राचार्य डॉ. एम. ए. शहजाद, प्रा. डॉ. नितीन देशमुख, डॉ. शिरीष जैन व डॉ. संजय साळवे यांचा समावेश केला आहे. कार्यक्रमात पुस्तक प्रकाशन करताना मान्यवर.

  

Share