सध्या देशात जसे वातावरण आहे, त्यानुसार देशात केवळ काँग्रेस आणि भाजप हे दोनच पक्ष राहतील, असा दावा परभणी मधील ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी केला आहे. इतर सर्व छोटे – मोठे पक्ष संपवण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थित त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला, त्यावेळी ते बोलत होते. सध्या देशात आणि राज्यात जसे वातावरण आहे, त्यानुसार छोटे-मोठे सर्व पक्ष संपवायचे काम सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भविष्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षच नंबर एकचा पक्ष राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे सर्वात अधिक सदस्य संख्या असलेला पक्ष ठरणार असल्याचा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणार आज समजा-समाजामध्ये दरी निर्माण करण्याचे काम आहे. समाजात दरी निर्माण करण्याचे काम सध्या सुरू आहे. उत्तर प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्याची देखील वाटचाल चालू आहे. मात्र आपण फुले- शाहू- आंबेडकर यांचा विचार सांगणाऱ्या राज्याचे कार्यकर्ते आहोत. सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन आपल्याला पुढे जायचे आहे. आणि याच विचाराने आपण काँग्रेस पक्षाची काच धरली असल्याचे दुर्राणी यांनी म्हटले आहे. नेत्यांनी पक्षांत्तर केले तरी कार्यकर्ते आणि मतदार जागेवर अनेक नेत्यांनी पक्षांतर केले आहे. त्यांनी पक्षांतर केले असले तरी त्या-त्या पक्षाचे कार्यकर्ते आणि मतदार जागेवर आहेत. काँग्रेस पक्षाची विचारधारा फुले-शाहू- आंबेकडरांची विचारधारा आहे. त्याच विचारधारेने आपल्याला पुढील काळात वाटचाल करायची आहे. परभणी जिल्ह्यात देखील आम्ही पक्षातील सर्वांना सोबत घेऊन एकोप्याने पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास दुर्राणी यांनी व्यक्त केला.