स्थानिक निष्ठावंतांचा विरोध, तरीही माजी खा.खतगावकरांना काँग्रेसमध्ये दिला प्रवेश:मुंबईत प्रदेशाध्यक्ष पटोलेंच्या उपस्थितीत सोहळा, विरोधात घोषणाबाजी

स्थानिक निष्ठावंतांचा विरोध, तरीही माजी खा.खतगावकरांना काँग्रेसमध्ये दिला प्रवेश:मुंबईत प्रदेशाध्यक्ष पटोलेंच्या उपस्थितीत सोहळा, विरोधात घोषणाबाजी

नांदेडचे माजी खासदार भास्कर खतगावकर यांनी त्यांच्या सुनबाईंच्या राजकीय पुनर्वसनासाठी शुक्रवारी भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तेव्हा स्थानिक पदाधिकाऱ्यांनी प्रचंड विरोध दर्शवला. खतगावकर नि:स्वार्थ भावनेने पक्षाचे काम करतील असे लेखी लिहून घ्या, अशी घोषणाबाजीही झाली. त्यांचा विरोध मोडीत काढून मुंबईत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला. लोकसभेच्या वेळी भाजपत प्रवेश करणारे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे दाजी अशीही खतगावकरांची ओळख आहे. त्यांच्यासोबत त्यांच्या सुनबाई डाॅ. मीनल, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांनीही पक्षांतर केले. यावेळी माजी मंत्री डी. पी.सावंत, आमदार मोहन हंबर्डे उपस्थित होते. विधानसभेसाठी मुंबईतील टिळक भवनात नांदेड जिल्ह्याची आढावा बैठक झाली. ९ मतदारसंघांतील प्रत्येक इच्छुकाने आपण पक्षामध्ये किती जुने आहोत आणि आपली किती वर्षांपासून उमेदवारीची दावेदारी आहे हे वरिष्ठांना समजावून सांगितले. काही जणांनी शक्तिप्रदर्शन केले. बैठकीच्या सर्वात शेवटी पटोले म्हणाले की, भास्कर पाटील खतगावकर काँग्रेसमध्ये नि:स्वार्थ भावनेने प्रवेशासाठी तयार अाहेत. त्यावर लगेच नांदेड, विशेषत: बिलोली गावातील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी विरोध सुरू केला. त्यानंतर काही मिनिटांतच पटोले, आमदार अमित देशमुख यांच्या उपस्थित खतगावकर आणि त्यांच्या सुनबाई मीनल खतगावकरांना प्रवेश देण्यात आला. नांदेड जिल्ह्यात अशोक चव्हाण यांना धक्का अशोक चव्हाणांनी काँग्रेसमधून भाजपत प्रवेश केल्यानंतर खतगावकर भाजपवासी झाले होते. सहा महिन्यांतच त्यांनी घरवापसी केली आहे. लोकसभा आणि त्यानंतर विधान परिषदेचे आश्वासन भाजपने पूर्ण केले ते नाराज होते. त्यांच्या घरवापसीने अशोक चव्हाणांची अडचण झाली आहे. आता कशासाठी काँग्रेसमध्ये गेले? खतगावकरांच्या सुनबाई डॉ. मीनल यांना नायगाव विधानसभा लढण्यास इच्छुक आहेत. त्यासाठी त्यांनी भाजपमध्ये असताना मोर्चेबांधणीही केली. पण तेथील भाजपचे आमदार राजेश पवार यांनाच उमेदवारी दिली जाणार असे लक्षात आल्यावर काँग्रेसमध्ये प्रवेशाशिवाय दुसरा पर्याय त्यांच्यापुढे नव्हता. म्हणूनच भास्कर खतगावकर यांनी चौथ्यांदा पक्षांतर केले आहे. पदाधिकाऱ्यांनी बजावले : निष्ठावंतांना विसरू नका खतगावकर काँग्रेस पक्षासाठी योग्य नसल्याच्या कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. कोणतीही अपेक्षा नसल्याचे पक्षाने लेखी घ्यावे, अशीही मागणी काहींनी केली. तर काहींनी स्पष्टपणे बजावले की, खतगावकरांमुळे पक्षातील निष्ठावंतांवर अन्याय करू नका. आम्ही बूथस्तरावर काम करून पक्ष वाढवला. पक्ष वाढवण्यासाठी त्यांचे कोणतेही योगदान नाही. फेब्रुवारीत भाजपमध्ये दाखल झाले होते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांवर टीका करून भास्कर खतगावकर यांनी २०१४ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. २०२१ मध्ये देगलूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीदरम्यान चव्हाणांचे नेतृत्व मान्य करून ते भाजपमधून काँग्रेसमध्ये आले. लोकसभेपूर्वी चव्हाणांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मग फेब्रुवारीत खतगावकर पुन्हा काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले होते.

​नांदेडचे माजी खासदार भास्कर खतगावकर यांनी त्यांच्या सुनबाईंच्या राजकीय पुनर्वसनासाठी शुक्रवारी भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तेव्हा स्थानिक पदाधिकाऱ्यांनी प्रचंड विरोध दर्शवला. खतगावकर नि:स्वार्थ भावनेने पक्षाचे काम करतील असे लेखी लिहून घ्या, अशी घोषणाबाजीही झाली. त्यांचा विरोध मोडीत काढून मुंबईत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला. लोकसभेच्या वेळी भाजपत प्रवेश करणारे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे दाजी अशीही खतगावकरांची ओळख आहे. त्यांच्यासोबत त्यांच्या सुनबाई डाॅ. मीनल, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांनीही पक्षांतर केले. यावेळी माजी मंत्री डी. पी.सावंत, आमदार मोहन हंबर्डे उपस्थित होते. विधानसभेसाठी मुंबईतील टिळक भवनात नांदेड जिल्ह्याची आढावा बैठक झाली. ९ मतदारसंघांतील प्रत्येक इच्छुकाने आपण पक्षामध्ये किती जुने आहोत आणि आपली किती वर्षांपासून उमेदवारीची दावेदारी आहे हे वरिष्ठांना समजावून सांगितले. काही जणांनी शक्तिप्रदर्शन केले. बैठकीच्या सर्वात शेवटी पटोले म्हणाले की, भास्कर पाटील खतगावकर काँग्रेसमध्ये नि:स्वार्थ भावनेने प्रवेशासाठी तयार अाहेत. त्यावर लगेच नांदेड, विशेषत: बिलोली गावातील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी विरोध सुरू केला. त्यानंतर काही मिनिटांतच पटोले, आमदार अमित देशमुख यांच्या उपस्थित खतगावकर आणि त्यांच्या सुनबाई मीनल खतगावकरांना प्रवेश देण्यात आला. नांदेड जिल्ह्यात अशोक चव्हाण यांना धक्का अशोक चव्हाणांनी काँग्रेसमधून भाजपत प्रवेश केल्यानंतर खतगावकर भाजपवासी झाले होते. सहा महिन्यांतच त्यांनी घरवापसी केली आहे. लोकसभा आणि त्यानंतर विधान परिषदेचे आश्वासन भाजपने पूर्ण केले ते नाराज होते. त्यांच्या घरवापसीने अशोक चव्हाणांची अडचण झाली आहे. आता कशासाठी काँग्रेसमध्ये गेले? खतगावकरांच्या सुनबाई डॉ. मीनल यांना नायगाव विधानसभा लढण्यास इच्छुक आहेत. त्यासाठी त्यांनी भाजपमध्ये असताना मोर्चेबांधणीही केली. पण तेथील भाजपचे आमदार राजेश पवार यांनाच उमेदवारी दिली जाणार असे लक्षात आल्यावर काँग्रेसमध्ये प्रवेशाशिवाय दुसरा पर्याय त्यांच्यापुढे नव्हता. म्हणूनच भास्कर खतगावकर यांनी चौथ्यांदा पक्षांतर केले आहे. पदाधिकाऱ्यांनी बजावले : निष्ठावंतांना विसरू नका खतगावकर काँग्रेस पक्षासाठी योग्य नसल्याच्या कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. कोणतीही अपेक्षा नसल्याचे पक्षाने लेखी घ्यावे, अशीही मागणी काहींनी केली. तर काहींनी स्पष्टपणे बजावले की, खतगावकरांमुळे पक्षातील निष्ठावंतांवर अन्याय करू नका. आम्ही बूथस्तरावर काम करून पक्ष वाढवला. पक्ष वाढवण्यासाठी त्यांचे कोणतेही योगदान नाही. फेब्रुवारीत भाजपमध्ये दाखल झाले होते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांवर टीका करून भास्कर खतगावकर यांनी २०१४ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. २०२१ मध्ये देगलूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीदरम्यान चव्हाणांचे नेतृत्व मान्य करून ते भाजपमधून काँग्रेसमध्ये आले. लोकसभेपूर्वी चव्हाणांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मग फेब्रुवारीत खतगावकर पुन्हा काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले होते.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment