धरणगावातील संघाच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांचीही उपस्थिती:एकनाथ खडसे भाजपत नाहीत, पण संघात; जळगावातील उपस्थिती चर्चेची धरणगावातील संघाच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांचीही उपस्थिती:एकनाथ खडसे भाजपत नाहीत, पण संघात; जळगावातील उपस्थिती चर्चेची

धरणगावातील संघाच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांचीही उपस्थिती:एकनाथ खडसे भाजपत नाहीत, पण संघात; जळगावातील उपस्थिती चर्चेची

आपण भाजपमध्ये नसलो तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात मात्र आहोत, असे सांगत राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी धरणगावच्या कार्यक्रमात हजेरी लावून दाखवून दिले. या कार्यक्रमासाठी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्याला आवर्जून बोलावले होते, असे सांगायलाही ते विसरले नाहीत. त्यामुळे क्रांतिवीर खाज्या नाईक यांच्या पुतळा अनावरण समारंभात माध्यमांचे ते एक आकर्षण ठरले. सतत ४० वर्षे भारतीय जनता पक्षासाठी रक्त आटवले आहे, हे संधी मिळेल तेव्हा बिंबवणारे एकनाथ खडसे सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे स्वत:च घोषित केले होते. मात्र, त्यांचा जाहीर प्रवेश झालाच नाही. त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी आपण भाजपमध्ये जाण्याचा विचार थांबवला आहे, असे जाहीर करत राष्ट्रवादी काँग्रेसचीच पाठराखण केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सहज भेटता आले असते तर तसा आपला प्रयत्न होता, असेही ते बोलून गेले. गिरीश महाजनांचा विरोध, तरीही पदाधिकाऱ्यांनी बोलावले भाजपचे सत्ताधारी अर्थात मंत्री गिरीश महाजन यांचा खडसे यांना प्रचंड विरोध असला तरी जिल्ह्यातील संघाचे पदाधिकारी मात्र खडसे यांच्याविषयी आपुलकी बाळगून आहेत आणि खडसे यांच्या योगदानाची त्यांना जाणीव आहे हे त्यांना आमंत्रण देऊन आणि पुढच्या रांगेत बसवून संघाने दाखवून दिले आहे. फडणवीस यांचे राजकीय भवितव्य पाहता त्यांच्याशी चांगले संबंध असणे भविष्यात पुढच्या पिढ्यांसाठी उपयुक्त ठरतील, असा खडसे यांचा विचार दिसतो.

  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *