दिघेसाहेबांच्या आश्रमात शिंदेंच्या सेनेने नोटा उधळल्या:पावित्र्य नष्ट केले म्हणत ठाकरे गटाची टीका; तर नरेश म्हस्के यांनीही टोचले कान

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांच्या नावाने राजकारण करत असतात. मात्र आता दिघे यांच्या आनंद आश्रमातून एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये गणपती उत्सवात ढोल पथकावर पैसे उडवल्याचे दिसून येत आहे. मात्र, यावरून आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दिघेसाहेबांच्या आनंद आश्रमात नोटा उधळल्या, यातून दिघेसाहेबांच्या समाजसेवेचे पवित्र नष्ट केले असल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने केली आहे. तुम्ही आनंदाश्रमात नोटा उधळल्या यामुळे दिघे साहेबांच्या समाजसेवेची पावित्र नष्ट केले. आमचा आनंद हरपला, अशा शब्दात आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर निशाणा साधला आहे. अगामी विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून उद्धव ठाकरे गट केदार दिघे यांना एकनाथ शिंदे यांच्या विरोधात उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर या घटनेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या संदर्भात एकनाथ शिंदे यांच्या गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. दिघे साहेब ढोल पथकांना मोठ्या प्रमाणात बक्षीसांचे वाटप करत होते. मात्र, आनंद आश्रमात ज्या पद्धतीने नोटा उधळण्यात आल्या ती पद्धत चुकीची असल्याचे नरेश मस्के यांनी म्हटले आहे. या माध्यमातून नरेश मस्के यांनी एका अर्थाने पदाधिकाऱ्यांचे कान टोचले आहे. आनंद दिघे आणि ठाणे यांचे एक जुने नाते आहे. आजही आनंद दिघे यांचा सन्मान करणारे अनेक नागरिक या परिसरामध्ये राहतात. 2001 मध्ये गणेश उत्सवाच्या काळात एका कार अपघातात आनंद दिघे यांचा मृत्यू झाला होता. वास्तविक अपघात झाल्यानंतर आनंद दिघे यांच्यावर ठाण्यातील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने यादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला होता. असे असले तरी ठाण्यामधील नागरिकांनाच्या मनात आनंद दिघे यांच्या विषयी अद्यापही आदर कायम आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आनंद दिघे यांच्या नावाने राजकारणात पुढे आले आहेत. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा… ज्योती मेटे बीडमधून लढण्यावर ठाम:शरद पवार यांच्यासह अजित पवारांसोबतही चर्चा; शिवसंग्राम पक्षाची पाच मतदारसंघाची मागणी आगामी विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून सर्वच राजकीय पक्षांनी आपापली तयारी सुरू केली आहे. शिवसंग्राम पक्षाच्या नेत्यांनी देखील उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, आता त्यांची चर्चा शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांसोबत सोबत सुरू आहे, अशी माहिती त्यांनी स्वतः दिली. ज्योती मेटे या बीडमधून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. या आधी देखील त्यांनी बीड लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी तयारी केली होती. त्यामुळे आता या वेळी त्या काय निर्णय घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पूर्ण बातमी वाचा… होरपळणारे मणिपूर मोदी सरकारच्या बेपर्वाईचेच पाप:पंतप्रधानांना मणिपूरपेक्षा रशिया-युक्रेन युद्धाची ‘काळजी’; ठाकरे गटाचा हल्लाबोल होरपळणारे मणिपूर केंद्रातील मोदी सरकारच्या बेपर्वाईचेच पाप असल्याची टीका उद्धव ठाकरे गटाने केली आहे. पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामना मधून ठाकरे गटाने मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. मणिपुरातील हिंसाचारग्रस्त भागाचीही जातीनुसार विभागणी झाली आहे. हे सगळेच भयंकर आहे. तरीही आपल्या पंतप्रधानांना मणिपूरपेक्षा रशिया-युक्रेन युद्धाची ‘काळजी’ लागून राहिली आहे. मणिपूरबाबत मात्र ते ‘निष्काळजी’ असल्याचा आरोपही सामनामधून करण्यात आला आहे. पूर्ण बातमी वाचा…

​मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांच्या नावाने राजकारण करत असतात. मात्र आता दिघे यांच्या आनंद आश्रमातून एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये गणपती उत्सवात ढोल पथकावर पैसे उडवल्याचे दिसून येत आहे. मात्र, यावरून आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दिघेसाहेबांच्या आनंद आश्रमात नोटा उधळल्या, यातून दिघेसाहेबांच्या समाजसेवेचे पवित्र नष्ट केले असल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने केली आहे. तुम्ही आनंदाश्रमात नोटा उधळल्या यामुळे दिघे साहेबांच्या समाजसेवेची पावित्र नष्ट केले. आमचा आनंद हरपला, अशा शब्दात आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर निशाणा साधला आहे. अगामी विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून उद्धव ठाकरे गट केदार दिघे यांना एकनाथ शिंदे यांच्या विरोधात उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर या घटनेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या संदर्भात एकनाथ शिंदे यांच्या गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. दिघे साहेब ढोल पथकांना मोठ्या प्रमाणात बक्षीसांचे वाटप करत होते. मात्र, आनंद आश्रमात ज्या पद्धतीने नोटा उधळण्यात आल्या ती पद्धत चुकीची असल्याचे नरेश मस्के यांनी म्हटले आहे. या माध्यमातून नरेश मस्के यांनी एका अर्थाने पदाधिकाऱ्यांचे कान टोचले आहे. आनंद दिघे आणि ठाणे यांचे एक जुने नाते आहे. आजही आनंद दिघे यांचा सन्मान करणारे अनेक नागरिक या परिसरामध्ये राहतात. 2001 मध्ये गणेश उत्सवाच्या काळात एका कार अपघातात आनंद दिघे यांचा मृत्यू झाला होता. वास्तविक अपघात झाल्यानंतर आनंद दिघे यांच्यावर ठाण्यातील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने यादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला होता. असे असले तरी ठाण्यामधील नागरिकांनाच्या मनात आनंद दिघे यांच्या विषयी अद्यापही आदर कायम आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आनंद दिघे यांच्या नावाने राजकारणात पुढे आले आहेत. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा… ज्योती मेटे बीडमधून लढण्यावर ठाम:शरद पवार यांच्यासह अजित पवारांसोबतही चर्चा; शिवसंग्राम पक्षाची पाच मतदारसंघाची मागणी आगामी विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून सर्वच राजकीय पक्षांनी आपापली तयारी सुरू केली आहे. शिवसंग्राम पक्षाच्या नेत्यांनी देखील उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, आता त्यांची चर्चा शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांसोबत सोबत सुरू आहे, अशी माहिती त्यांनी स्वतः दिली. ज्योती मेटे या बीडमधून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. या आधी देखील त्यांनी बीड लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी तयारी केली होती. त्यामुळे आता या वेळी त्या काय निर्णय घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पूर्ण बातमी वाचा… होरपळणारे मणिपूर मोदी सरकारच्या बेपर्वाईचेच पाप:पंतप्रधानांना मणिपूरपेक्षा रशिया-युक्रेन युद्धाची ‘काळजी’; ठाकरे गटाचा हल्लाबोल होरपळणारे मणिपूर केंद्रातील मोदी सरकारच्या बेपर्वाईचेच पाप असल्याची टीका उद्धव ठाकरे गटाने केली आहे. पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामना मधून ठाकरे गटाने मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. मणिपुरातील हिंसाचारग्रस्त भागाचीही जातीनुसार विभागणी झाली आहे. हे सगळेच भयंकर आहे. तरीही आपल्या पंतप्रधानांना मणिपूरपेक्षा रशिया-युक्रेन युद्धाची ‘काळजी’ लागून राहिली आहे. मणिपूरबाबत मात्र ते ‘निष्काळजी’ असल्याचा आरोपही सामनामधून करण्यात आला आहे. पूर्ण बातमी वाचा…  

Share