मान्सून : जूनमध्ये १०९% पाऊस; जुलैत ४-५ कमी दाबाचे पट्टे तयार होतील जुलैमध्येही मान्सून जोरदार राहील. या महिन्यात १०६% पाऊस पडण्याचा अंदाज आहे. साधारणपणे जुलैमध्ये २८०.४ मिमी पाऊस पडतो. या वेळी २९७.२ मिमीपर्यंत पावसाची शक्यता आहे. मान्सूनमध्ये जास्तीत जास्त पाऊस जुलैमध्ये पडतो. हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा म्हणाले, जुलैत बिहार, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ व गुजरातचा कच्छ प्रदेश वगळता देशातील उर्वरित भागात चांगला पाऊस पडेल. डोंगराळ भागात पावसाचा तडाखा सुरूच हिमाचलमध्ये २८५ रस्ते बंद, सिमल्यात पाच मजली इमारत कोसळली; तीन ठार हिमाचल प्रदेश: सोमवारी सकाळी सिमल्याजवळील भट्टाकुफर येथे एक ५ मजली इमारत कोसळली. रामपूरमध्ये ढगफुटीमुळे अनेक गुरे वाहून गेली. सिमला-चंदीगड राष्ट्रीय महामार्गावर ५ ठिकाणी भूस्खलन झाले. सिमल्याजवळ पावसामुळे झालेल्या रस्ते अपघातात तिघांचा मृत्यू झाला. २० जूनपासून राज्यात पावसामुळे ३४ जणांचा, रस्ते अपघातात १७ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात २८५ रस्ते बंद आहेत. उत्तराखंड: चारधाम यात्रेवरील २४ तासांची बंदी उठली. उत्तरकाशीत सिलाई बंद आणि ओजरी दरम्यान दोन ठिकाणी रस्ता वाहून गेल्याने यमुनोत्री राष्ट्रीय महामार्ग बंद आहे. जूनमध्ये ४३२ वेळा मुसळधार


By
mahahunt
1 July 2025