दिव्य मराठी अपडेट्स:बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ताफ्यासमोर घोषणाबाजी; बुलढाण्यात तीन वाहनांचा विचित्र अपघात

महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाची शहरे आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडेट्स… बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यासमोर घोषणाबाजी बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यासमोर घोषणाबाजी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शिक्षक संघटनेकडून अजित पवारांच्या ताफ्यासमोर घोषणाबाजी करण्यात आली. आत्महत्या केलेल्या नागरगोजे नामक शिक्षकाच्या घटनेसंदर्भात घोषणाबाजी करत न्याय देण्याची मागणी करण्यात आली. दिशा सालियन प्रकरण: मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी दिशा सालियनच्या संशयास्पद मृत्यूच्या प्रकरणाची सुनावणी आज मुंबई उच्च न्यायालयात होणार आहे. दिशाचे वडील सतीश सालियन यांनी उच्च न्यायालयात सीबीआय चौकशीची मागणी करणारी याचिका दाखल केली. सविस्तर वाचा बुलढाण्यात तीन वाहनांचा विचित्र अपघात, 5 जणांचा मृत्यू बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव-खामगाव महामार्गावर एक तिहेरी अपघात घडला आहे. या भीषण अपघातात 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. एसटी-कार आणि ट्रॅव्हल्सच्या अपघातात 26 हून अधिक जण जखमी आहेत. सविस्तर वाचा