दिव्य मराठी अपडेट्स:मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्थानकाबाहेर बेस्टच्या बसला भीषण आग, सुदैवाने जीवितहानी टळली

महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाची शहरे आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडेट्स… मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्थानकाबाहेर बेस्टच्या बसला भीषण आग मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्थानकाबाहेर बेस्टच्या बसला भीषण आग लागल्याची घडना आज पहाटे घडली. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सुदैवाने सर्व प्रवाशांना सुदैवाने सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. बुलढाण्यात देवदर्शनाला जाणाऱ्या बसचा अपघात, 35 जखमी बुलढाण्यात भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. आंध्रप्रदेशातील देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांची खाजगी बस उभ्या ट्रकवर धडकली. या अपघातात जवळपास 35 भाविक जखमी झाले, तर 3 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. हे भाविक आंध्रप्रदेशातील असून ते नाशिक, शिर्डीला देवदर्शानासाठी जात होते. रणजीत कासलेंना स्वारगेटच्या हॉटेलमधून अटक निलंबित झालेला पोलिस उपनिरीक्षक रणजित कासले शरण आला नसतानाच त्याला पुण्यातील एका हॉटेलमधून अटक करण्यात आली आहे. निलंबनानंतर त्याने सोशल मीडियावर व्हिडिओ टाकून थेट मुख्यमंत्री आणि एसपींवर आरोप केले होते. वाल्मीक कराडच्या एन्काऊंटरसाठी आपल्याला 50 कोटींची ऑफर मिळाल्याचा दावाही त्याने केला होता. सविस्तर वाचा बीडमध्ये सरपंच अन् कार्यकर्त्यांकडून वकिल महिलेला मारहाण बीड जिल्ह्यात आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अंबाजोगाई सत्र न्यायालयात वकील करणाऱ्या महिलेला सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्यांकडून जबर मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. या महिलेने गावातील ध्वनी प्रदूषणामुळे आपल्याला मायग्रेनचा त्रास होत असल्याने या विरोधात तक्रार केली होती. याचा राग मनात धरूनच ही मारहाण करण्यात आली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सविस्तर वाचा औंढा नागनाथ येथे काँग्रेसच्या बैठकीत कार्यकर्त्यांचा विधान परिषद आमदारांवरच रोष
औंढा नागनाथ येथे काँग्रेस पक्षाच्या निरीक्षकांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत कार्यकर्त्यांनी विधान परिषद आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांच्या विरुद्ध रोष व्यक्त केला. त्यांची भेट होत नाही तसेच त्यांच्याकडून विकास कामांसाठी निधी दिला जात नसल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला. त्यामुळे काँग्रेसची बैठक जिल्हाभरात चर्चेचा विषय बनली आहे. सविस्तर वाचा