दिव्य मराठी अपडेट्स:पुण्यात सिलिंडरचा भीषण स्फोट, दोघांचा होरपळून मृत्यू; दिवसभरातील घडामोडी एका क्लिकवर

महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाची शहरे आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडेट्स… नरेंद्र मोदी सध्या मनमोहनसिंग यांच्या भूमिकेत गेले- संजय राऊत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या भूमिकेत गेले आहेत. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना नरेंद्र मोदी हे त्यांना म्युट प्राइम मिनिस्टर म्हणत होते. तेच मोदी आता का गप्प बसले असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे. जगभरातील सर्वच देश ट्रम्प यांनी लादलेल्या कराच्या विरोधात बोलत असताना मोदी गप्प का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सविस्तर वाचा शिवसेना उबाठाच्या प्रवक्त्यांची यादी जाहीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने अधिकृत प्रवक्ते जाहीर केले आहे. मुख्य प्रवक्तेपदी शिवसेना नेते-खासदार संजय राऊत आणि खासदार अरविंद सावंत यांची नियुक्ती करण्यात आली असून इतर सहा जणांवर प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सविस्तर वाचा तुळजापूर ड्रग्ज प्रकरण: तुळजाभवानी मंदिराच्या 13 पुजाऱ्यांचा सहभाग? धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी तुळजाभवानी पुजाऱ्यांची नावे समोर आली आहेत. हे पुजारी एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी असल्याची माहिती समोर आल्याचे वृत्त आहे. सविस्तर वाचा रिझर्व्ह बँकेने सलग दुसऱ्यांदा व्याजदरात केली 0.25% कपात, आता 6.0% झाले रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआयने रेपो दर 0.25% ने कमी करून 6.0% केला आहे. पूर्वी ते 6.25% होते. म्हणजेच, येत्या काळात कर्जे स्वस्त होऊ शकतात. तुमचा ईएमआय देखील कमी होईल. सविस्तर वाचा पुण्यात सिलिंडरचा भीषण स्फोट, दोघांचा मृत्यू पुणे शहरातील वारजे माळवाडी परिसरात मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. या घटनेत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. ही घटना पत्र्याच्या बांधकाम असलेल्या घरांमध्ये सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे घडली. ठाण्यात 10 वर्षीय मुलीवर बलात्कार करून गळा चिरला ठाणे येथे एका 10 वर्षीय मुलीवर बलात्कार करून नंतर तिचा गळा चिरून हत्या करण्यात आली. त्यानंतर आरोपीने सहाव्या मजल्यावरील त्याच्या फ्लॅटच्या बाथरूमच्या खिडकीतून मृतदेह खाली फेकून दिला. पोलिसांनी 20 वर्षीय आरोपी आसिफ अकबर मन्सूरीला अटक केली आहे. सविस्तर वाचा
अजित पवार यांनी कोकाटे यांना घेतले फैलावर महायुती सरकारमध्ये कृषीमंत्री झाल्यापासून आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे माणिकराव कोकाटे चांगलेच चर्चेत आहेत. त्यातच आता अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीला देखील माणिकराव कोकाटे उशिराने पोहोचले. त्यामुळे अजित पवार त्यांच्यावर चांगलेच भडकले होते. सविस्तर वाचा मंगेशकर रुग्णालय प्रकरण अपडेट दीनानाथ मंगेशकर रुग्णालय ज्या जमिनीवर उभे आहे, त्या जमिनीचे मूळ मालक खिलारे कुटुंबीय आता तनिषा भिसे यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. हॉस्पिटल उघडण्यासाठी जागा दिली, याचा पश्चात्ताप होतोय, अशा प्रकारची खंत खिलारे कुटुंबीयांनी प्रसार माध्यमांसमोर व्यक्त केली होती. सविस्तर वाचा सैफ अली हल्ला प्रकरण: पोलिसांनी दाखल केले 1000 पानांचे आरोपपत्र सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी वांद्रे न्यायालयात 1000 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपी शरीफुल इस्लामविरुद्ध अनेक पुरावे त्यात समाविष्ट करण्यात आले आहेत. सविस्तर वाचा सेन्सेक्स 500 अंकांनी घसरून 73,700 वर शेअर बाजारात आज घसरण दिसून येत आहे. सेन्सेक्स 500 अंकांनी घसरला आहे, तो 73,700 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. निफ्टी देखील सुमारे 200 अंकांनी खाली आला आहे, तो 22, 400 पातळीवर व्यवहार करत आहे. सेन्सेक्समधील 30 पैकी 24 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. सविस्तर वाचा

  

Share