दिव्य मराठी अपडेट्स:लाडक्या बहिणींचे पैसे बंद करू म्हणणाऱ्या खासदार धनंजय महाडिकांवर गुन्हा दाखल

नमस्कार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देश-विदेशातील सर्वच घडामोडींचे अपडेट्स आणि विश्वासार्ह बातम्या येथे मिळतील केवळ एका क्लिकवर… अपडेट्स लाडक्या बहिणींचे पैसे बंद करू म्हणणाऱ्या खासदार धनंजय महाडिकांवर गुन्हा दाखल कोल्हापूर – ‘लाडक्या बहिणीचे 1500 रुपये घेणाऱ्या महिला जर काँग्रेसच्या रॅलीत दिसल्या तर त्यांचे फोटो काढून आणा. त्यांचे पैसे बंद करू’ असा इशारा भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी शनिवारी कोल्हापुरातील सभेत दिला होता. हे प्रकरण त्यांच्या चांगलेच अंगलट आले आहे. विरोधकांनी त्यांच्यासह भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनीही महाडिक यांचे कान टोचले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी त्यांनी सोशल मीडियावर जाहीर माफी मागितली. दरम्यान, निवडणूक आयोगानेही महाडिक यांना नोटीस बजावून या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण मागवले हाेते. राजेंद्र मुळूकसह काँग्रेसचे 16 बंडखोर निलंबित मुंबई – रामटेक मतदारसंघातून बंडखोरी करणारे नागपूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळूक यांच्यासह 16 बंडखोर उमेदवारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेनुसार 6 वर्षांसाठी या बंडखोरांवर कारवाई करण्यात आली. यात काटोलचे याज्ञवल्क जिचकार, राजापूरचे अविनाश लाड, यवतमाळचे शबीर खान, उमरखेडचे विजय खडसे, कोपरी पाचपाखाडीतील मनोज शिंदे, सुरेश पाटीलखेडे, अहिल्यानगरच्या मंगल भुजबळ, पलूस कडेगावचे मोहन दांडेकर, कसबा पेठेतील कमल व्यवहारे, भिवंडीतील विलास पाटील, आसमा चिखलेकर, बल्लारपूरचे अभिलाषा गावतुरे, राजू झोडे यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. तनवाणी 14 नोव्हेंबर रोजी शिंदेसेनेत छत्रपती संभाजीनगर – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संभाजीनगर मध्य मतदारसंघातील उमेदवार किशनचंद तनवाणी यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केवळ एक दिवस शिल्लक असताना रिंगणातून माघार घेतली. त्यामुळे ठाकरेंच्या पक्षाला जोरदार धक्का बसला. आता तनवाणी 14 नोव्हेंबर रोजी शिंदेसेनेत प्रवेश करणार आहेत. हा पक्ष प्रवेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होईल की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वेगळा करून घेतील हे अजून स्पष्ट झालेले नाही. तनवाणी यांनी उमेदवारी परत करताच त्यांना जिल्हाप्रमुखपदातून मुक्त केले. त्यानंतर काही दिवसांतच त्यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. नंतर त्यांच्या 18 समर्थक पदाधिकाऱ्यांनी उद्धवसेनेला जय महाराष्ट्र केला. यातील काहींनी शिंदेसेनेत प्रवेश करण्याची तयारी सुरू केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. हिंदुत्वासाठी माघार घेतल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर काही हिंदुत्ववादी संघटनांनी त्यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज‎ सकाळी 10 वाजता कन्नडमध्ये सभा‎ कन्नड – येथील गिरणी ग्राऊंडवर आज सकाळी 10‎वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होणार‎‎आहे. कन्नड-सोयगाव मतदारसंघात‎‎महायुतीच्या प्रचारासाठी त्यांची सभा‎‎आयोजित केली आहे.‎‎कन्नड-सोयगाव मतदारसंघ‎‎शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला‎‎आहे. या तालुक्यात ठाकरे गटाचे‎आमदार उदयसिंग राजपूत आणि शिंदेसेनेच्या संजना‎जाधव यांच्यात सामना होत आहे.‎ सिल्लोडमध्ये पळशीत उसातून 13‎लाखांची गांजाची 2 क्विं. झाडे जप्त‎ सिल्लोड‎ – उसाच्या शेतात लावलेली सव्वादोन क्विंटल‎वजनाची दीडशे गांजाची झाडे पोलिसांनी‎जप्त केली. ही कारवाई सिल्लोड ग्रामीण‎पोलिसांनी शनिवारी (दि. 9) रोजी दुपारी‎तालुक्यातील पळशी शिवारात केली. या‎प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले‎आहे. नारायण सोनाजी बडक (45, रा.‎पळशी) असे ताब्यात घेण्यात आलेल्या‎संशयिताचे नाव आहे.‎ पळशी शिवारातील गट नं. 113 मध्ये‎उसाच्या शेतात गांजाची झाडे लावलेली‎असल्याची माहिती पोलिसांना मिळाली‎होती. मिळालेल्या माहितीवरून शनिवारी‎दुपारी पोलिसांनी मोठ्या शिताफीने छापा‎मारला व तब्बल सव्वादोन क्विंटल वजनाची‎गांजाची झाडे जप्त केली. जप्त गांजाची‎किंमत जवळपास 13 लाख रुपये असल्याची‎माहिती पोलिसांनी दिली. उसाच्या शेतातील‎गांजाची झाडे पाहून पोलिसही अवाक् झाले‎होते. या प्रकरणी वरील आरोपी विरोधात‎सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा‎दाखल करण्यात आला अाहे. संशयित बडक‎गांजाची विक्री कोणाला करणार होता, याचा‎तपास केला जात आहे.‎ विद्यापीठाचा बॅडमिंटन संघ भोपाळला रवाना छत्रपती संभाजीनगर – संजीव अग्रवाल ग्लोबल एज्युकेशन विद्यापीठ भोपाळ (मध्य प्रदेश) येथे होणाऱ्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ बॅडमिंटन पुरुष स्पर्धेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा संघ रवाना झाला. संघात आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रथमेश कुलकर्णी, यश शहा, नागेश चांगले, श्रावण दुधाडे, तुषार शर्मा, निनाद कुलकर्णी, सदानंद महाजन यांचा समावेश आहे. संघ प्रशिक्षक म्हणून चेतन तायडे, तर व्यवस्थापक म्हणून हिमांशू गोडबोले यांची नियुक्ती करण्यात आली.

मुंबईत 19 वर्षांपासून फरार आरोपीला अटक मुंबई – गेल्या 19 वर्षांपासून पोलिसांचा ससेमिरा चुकवणाऱ्या फरार आरोपीला अटक करण्यात अँटॉपहिल पोलिसांना यश आले आहे. आरोपी ओळख लपवून बोटीवर काम करत होता. तो अधूनमधून नातेवाईकांना भेटण्यासाठी मुंबईत येत होता. प्रकाश अनंत सुर्वे (57) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून तो शीव कोळीवाडा येथील प्रतिक्षा नगर चाळीत राहत होता. त्याच्याविरोधात गंभीर दुखापत व धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. सुर्वे याच्याविरोधात प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांनी अटक वॉरंट जारी केले होते. ते वॉरंट स्थानिक अँटॉप हिल पोलिस ठाण्याला प्राप्त झाले होते. ते वॉरंट बजावणी करण्यासाठी तसेच फरारी आरोपीचा शोध घेण्याकरता एक विशेष पथक तयार करण्यात आले. या विशेष तडीपार पथकाने आरोपीचा शोध घेण्याकरता जुन्या कागदपत्रांची पाहणी केली. त्यात त्याचे मित्र व नातेवाईकांची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने तपासले असता त्याचे नातेवाईक तेथे राहत असल्याचे निष्पन्न झाले. तेथे माहिती घेतली असता फरार आरोपी सुर्वे बोटीवर काम करत असल्याचे समजले. त्यानंतर त्याला अटक केली. मुंबईत अल्पवयीनाकडून आईवर चाकूने हल्ला मुंबई – घरगुती वादातून अल्पवयीन मुलाने त्याच्याच आईच्या गळ्यावर चाकूने वार केल्याचा गंभीर प्रकार चुनाभट्टी परिसरात घडला आहे. जखमी महिलेला शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी चुन्नाभट्टी पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवून पंधरा वर्षांच्या मुलाला ताब्यात घेतले होते. त्याला डोंगरीतील बालनिरीक्षणगृहात पाठवण्यात आले आहे. जखमी महिला बोलण्याच्या मनस्थितीत नसल्यामुळे तिच्याकडून घटनेची माहिती मिळाली नाही. न्या. खन्ना आज घेणार सरन्यायाधीशांची शपथ नवी दिल्ली – न्यायमूर्ती संजीव खन्ना सोमवारी 51वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सकाळी 10 वाजता त्यांना या पदाची शपथ देतील. न्या. खन्ना इलेक्टोरल बाँडला (निवडणूक रोखे) घटनाबाह्य ठरवणे आणि जम्मू-काश्मीरातील कलम 370 रद्द करणे आदी अनेक महत्त्वाच्या निकालांचा भाग होते.

  

Share