दिव्य मराठी अपडेट्स:शरद पवार आजपासून दोन विदर्भ दौऱ्यावर; महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करणार

नमस्कार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देश-विदेशातील सर्वच घडामोडींचे अपडेट्स आणि विश्वासार्ह बातम्या येथे मिळतील केवळ एका क्लिकवर… अपडेट्स बाबा सिद्दिकी हत्या ; आणखी 1 जण अटकेत मुंबई – माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी आणखी एका आरोपीला अटक करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. ही या प्रकरणातील 16 वी अटक आहे. या प्रकरणी कुख्यात लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोलच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले आहे. बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात गुन्हे शाखेने गौरव विलास आपुणे (23) याला अटक केली आहे. तो कर्वेनगर, पुणे येथील रहिवासी आहे. हल्ल्याच्या कटात त्याचा सहभाग असल्याचे तपासात उघड झाले आहे. फरार आरोपींनी त्याला शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षणही दिले होते, अशी माहिती समोर आली. पुण्यात 14 वे सावरकर संमेलन 19 नोव्हेंबरला पुणे – स्वातंत्र्यवीर सावरकरप्रेमी मित्रमंडळ छत्रपती संभाजीनगर आयोजित 14 वे स्वातंत्र्यवीर सावरकर संमेलन पुण्यातील स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्र, डेक्कन जिमखान्याजवळ 9 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे. उद्घाटन सत्राचे प्रमुख संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रमेश जलतारे, सिनेअभिनेता योगेश सोमण, रणजित सावरकर, शंकरराव गायकर यांच्यासह इतर पहिल्या सत्रामध्ये आपला विषय नमूद करणार आहेत. 24 डिसेंबर 2025 अंदमान येथील मृत्युंजय दिनाच्या पत्रिकेचा प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होईल. या कार्यक्रमात पद्मश्री मुरलीकांत राजारामजी पेटकर यांचा सन्मान सोहळा मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. सुभेदार मुरलीकांत पेटकर हे 1965 च्या भारत पाकिस्तान युद्धामध्ये लढले होते. अशा महान शूरवीराचा सन्मान होणार आहे. स. 9 ते साडेसहापर्यंत हा कार्यक्रम राहणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष भाऊ सुरडकर यांच्यासह इतरांनी सांगितले. नणंद असली तरी मी रोहिणी खडसेंचा प्रचार करणार नाही : केंद्रीय मंत्री रक्षा खडसे नाशिक – लोकसभेला माजी मंत्री एकनाथ खडसंेनी जाहीर पाठिंबा देऊन माझा प्रचार केला. मात्र, विधानसभेला शरद पवार गटाच्या उमेदवार, माझ्या नणंदबाई रोहिणी खडसेंचा मी प्रचार करणार नाही, असे केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी स्पष्ट केले आहे. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आलेल्या रक्षा यांनी सांगितले की, एकनाथ खडसे भाजपतून राष्ट्रवादीत गेले. ते ज्येष्ठ असून त्यांनी काय करावे हा त्यांचा निर्णय आहे. त्यांच्या प्रचाराच्या परतफेडीची आवश्यकता नाही. लोकसभेला फेक नॅरेटिव्हमुळे विरोधकांना यश आले. विधानसभेत तो चालणार नाही, असा दावाही रक्षा खडसे यांनी केला. नांदेडला 14 ठिकाणी‎धाडी, 5 लाखांचे मद्य जप्त‎ नांदेड – आचारसंहितेत अवैध मद्य‎जप्त करण्याची धडक कारवाई,‎राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून‎सुरू आहे. 4 नोव्हेंबरला 14‎ठिकाणी धाडी टाकून एकूण 5 लाख‎33 हजार 600 रुपयांचा मद्यसाठा‎जप्त केल्याची माहिती चे राज्य‎उत्पादन शुल्क अधीक्षक गणेश‎पाटील यांनी दिली. कारवाईमध्ये‎14 गुन्हे दाखल करण्यात आले‎आहेत. यामध्ये 13 संशयितांना अटक‎करण्यात आली आहे.‎कारवाईदरम्यान 3 वाहनेदेखील‎ताब्यात घेण्यात आली आहेत.‎जिल्ह्यातील 9 विधानसभा‎मतदारसंघातील मतदानप्रक्रिया मुक्त‎व निर्भयपणे पार पाडावी, यासाठी‎राज्य उत्पादन शुल्क विभागास‎दक्षतेच्या सूचना जिल्हाधिकारी तथा‎मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी‎अभिजीत राऊत यांनी दिल्या आहेत.‎ सावरकरप्रेमी मित्रमंडळातर्फे 9 नोव्हेंबर रोजी संमेलन बीड – स्वातंत्र्यवीर सावरकरप्रेमी मित्रमंडळातर्फे 14 वे स्वातंत्र्यवीर सावरकर संमेलन पुणे येथे होणार आहे. सकाळी 9.30 वाजता कार्यक्रम सुरू होईल. स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्र, डेक्कन जिमखान्याजवळ, कर्वे रोड, पुणे येथे हा सोहळा होईल. उद्घाटन सत्राचे प्रमुख संमेलनाध्यक्ष डॉ. रमेश जलतारे असतील. रणजित सावरकर आदी विचार मांडतील. संमेलनानिमित्त एका सावरकर पुस्तकाचे तसेच 24 डिसेंबरला पत्रिकेचे प्रकाशन होणार आहे. शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने एकास 20 लाखांचा गंडा पुणे – मुंढवा परिसरात केशवनगर येथे राहणाऱ्या मनीषा राहुल गहाणे (31) या तरुणीस अदिती सिंग नावाच्या अनाेळखी महिलेने तसेच विविध व्यक्तींनी संपर्क करून अायपीअाे ट्रेडिंगबाबत माहिती दिली. तिला एका शेअर मार्केटिंगच्या व्हाॅट्सअॅप ग्रुपमध्ये सामावून घेत ट्रेडिंग अॅपकरिता एक लिंक पाठवून त्याअाधारे गुंतवणूक करण्यास भाग पाडून 19 लाख 82 हजार रुपयांची अाॅनलाइन अार्थिक फसवणूक केली. याप्रकरणी वेगवेगळे माेबाइलधारक, बँक खातेधारकाविराेधात मुंढवा पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अाला असून तपास सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. थुंकण्यास मनाई : सुरतेत 9 लाखांचा दंड वसूल सुरत – गुटखा, पानमसाला खाऊन ठिकठिकाणी थुंकणाऱ्यांना सुरत महापालिकेने धडा शिकवायला सुरुवात केली आहे. सीसीटीव्ही नेटवर्क वापरून 5,200 लोकांना पकडण्यात आले आणि त्यांच्याकडून 9 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. सुरत महानगरपालिका नियंत्रण आणि कमांड सेंटरद्वारे संपूर्ण शहरात स्थापित 4,500 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे थुंकणाऱ्यांना पकडत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर थुंकणाऱ्यांवर कारवाई होण्याची राज्यातील ही पहिलीच वेळ असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला. तरीही अशी कृत्ये करणारे लोक थांबत नाहीत हे दुर्दैव आहे. जम्मू-काश्मीर विधानसभेत कलम 370 बहाली प्रस्ताव मंजूर; भाजपकडून विराेध जम्मू – जम्मू-काश्मीर विधानसभेने राज्याचा विशेष दर्जा (कलम 370) बहाल (पुनर्स्थापित) करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. मात्र, भाजप आमदारांनी याला विरोध करत प्रस्तावाच्या प्रती फाडल्या. आमदार वेलमध्ये जाऊन घोषणाबाजी करत राहिले. सभापतींनी मंत्र्यांची बैठक बोलावून स्वत: ठरावाचा मसुदा तयार केल्याचा आरोप भाजपने केला आहे. आमदारांनी बेंचवर चढून गोंधळ घातला. या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज गुरुवारपर्यंत तहकूब करण्यात आले. भाजप अध्यक्ष सत शर्मा यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या कार्यालयात कार्यकर्त्यांनी जम्मू-काश्मीर सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. आंदोलकांनी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी यांच्या पुतळ्यांचेही दहन केले.

  

Share