दिव्य मराठी अपडेट्स:बीडमध्ये मध्यरात्री जुन्या वादातून गोळीबार; गंभीर जखमीला संभाजीनगरला हलवले

नमस्कार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देश-विदेशातील सर्वच घडामोडींचे अपडेट्स आणि विश्वासार्ह बातम्या येथे मिळतील केवळ एका क्लिकवर… अपडेट्स ​​​​​​​बीडमध्ये मध्यरात्री जुन्या वादातून गोळीबार; गंभीर जखमीला संभाजीनगरला हलवले ​​​​​​​बीड – जुन्या वादात बदनामी झाल्याच्या रागातून एकाने घरात घुसून केलेल्या गोळीबारात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे तातडीने हलविण्यात आले आहे.
विश्वास दादाराव डोंगरे (रा.इमामापुर रोड, बीड) असे जखमी तरुणाचे नाव आहे. बीड शहरातील डोंगरे व आठवले गटात या पूर्वी जुन्या वादातून हाणामारीची घटना घडली होती. याप्रकरणी पेठ बीड पोलिस ठाण्यात परस्पराविरोधी गुन्हे दाखल झालेले आहे. शुक्रवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास अक्षय आठवले याने डोंगरे यांच्या इमामपुर रोडवरील घरात घुसून गोळीबार केल्याची माहिती समोर येत आहे. या गोळीबारात डोंगरे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले. जिल्हा पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी तातडीने पेठ बीड पोलिसांना गुन्हा दाखल करून आरोपीच्या अटकेचे आदेश दिले. त्यानुसार पेठ बीड पोलिस ठाण्यातील एक पथक जखमीचा जबाब घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगरकडे पहाटेच रवाना झाले आहे. अमरावती मधील छायानगर भागात ‘एनआयए’ पथकाची छापेमारी; आजही चौकशी सुरु अमरावती – मो. मुसैब शेख ईसा (२३, रा. छायानगर, अमरावती) याला ‘एनआयए’च्या पथकाने गुरुवारी पहाटे चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मो. मुसैब चे वडील शेख ईसा हे प्रवासी सायकल रिक्षा चालवतात. तर आई गृहिणी आहे. दहावीपर्यंत शिकलेला मुसैब मागील आठ महिन्यांपासून अत्तर विक्रीचे काम करतो. त्याचा नेमका कोणत्या प्रकरणात सहभाग आहे, हे आम्हाला एनआयएने सांगितले नसल्याचे त्याच्या आईने सांगितले. दरम्यान आज पुन्हा एकदा त्याला एनआयएच्या टीमने चौकशीसाठी बोलावले आहे. परभणीत तणावपूर्ण शांतता; शाळा-काॅलेज बंद, हिंसाचारप्रकरणी ९ महिलांसह ५० ताब्यात परभणी – संविधान अवमानाच्या निषेधार्थ बंददरम्यान उसळलेल्या हिंसाचारानंतर शहरात तणावपूर्ण शांतता होती. बुधवारच्या हिंसाचारप्रकरणी ८ गुन्हे दाखल झाले असून गुरुवारी ९ महिलांसह ५० जणांना अटक करण्यात आली . जमावबंदी दुसऱ्या दि‌वशीही कायम होती. त्यामुळे गुरुवारी जिल्ह्यामधील अनेक शाळा व महाविद्यालये बंद होती. परिस्थितीनुसार मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांनी शाळा-महाविद्यालय भरवण्याचा निर्णय घ्यावा, असे पत्र शिक्षण विभागाने काढले. गुरुवारीदेखील शहरातील भाजीपाल्याचे लिलाव झाले नाहीत, तसेच काही भागात बाजारपेठ बंद होती. दरम्यान, विधान परिषद विराेधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी परभणीतील दंगलग्रस्त भागाची पाहणी करून व्यापाऱ्यांशी चर्चा केली. बुधवारी झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने अनेक व्यावसायिकांचे नुकसान झाले. व्यापाऱ्यांच्या दुकानावरील पाट्या तसेच टपऱ्यांची आणि वाहनांची तोडफोड झाली होती. पूर्ण बातमी वाचा… भरपाई मिळेपर्यंत परभणी‎बाजारपेठ बंद : व्यापारी‎ परभणी – दगडफेकीसह ‎जाळपोळीमुळे झालेल्या नुकसानीचे‎ तातडीने पंचनामे करावेत, व‎ संबंधित व्यापाऱ्यांना भरपाई द्यावी,‎अशी मागणी जिल्हा व्यापारी‎ महासंघाने राज्य सरकारकडे केली.‎ भरपाई मिळेपर्यंत, तसेच संबंधित‎ अधिकाऱ्यांची बदली होईपर्यंत‎ बाजारपेठ बेमुदत बंद राहतील असा‎ इशाराही दिला आहे. जिल्हा व्यापारी‎ महासंघाची गुरुवारी सकाळी व्यापक ‎बैठक झाली. हजारोंच्या संख्येने ‎व्यापारी शिवाजी चौकातील ‎बैठकीला उपस्थित होते. परभणीत‎ घडलेल्या घटनेचा व्यापारी‎ महासंघाने तीव्र शब्दात निषेध व्यक्त‎ केला. व्यापाऱ्यांना भरपाई मिळेपर्यंत ‎बाजारपेठ बेमुदत बंद करण्याचा ‎निर्णय जिल्हा व्यापारी ‎महासंघाने घेतला. महासंघाचे‎ जिल्हाध्यक्ष सूर्यकांत हाके कोषाध्यक्ष ‎अशोक मात्रा उपस्थित होते.‎ मुलीला फूस लावून पळवून‎नेणाऱ्या बंगाली बाबास पकडले‎ आष्टी‎ – अल्पवयीन मुलीस फूस लावून‎पळवून नेणाऱ्या बंगाली जडीबुटी‎विक्रेत्यास पोलिसांनी उत्तर प्रदेशातून‎अटक केली आहे. त्याने दोन‎महिन्यांपूर्वी परतूर तालुक्यातील एका‎गावातून अल्पवयीन मुलीस पळवून‎नेले होते. आष्टी पोलिसांनी त्यास‎बुधवारी पकडले. समिरण निर्मल‎सरकार असे पकडण्यात आलेल्या‎ आरोपीचे नाव आहे.‎ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार‎समीरन निर्मल सरकार हा मुळचा‎ पश्चिम बंगालमधील रहिवासी‎ आहे. त्याने पीडिता राहत असलेल्या‎ घराशेजारीच त्याचा बंगाली औषधी‎ उपचाराचा छोटा दवाखाना सुरू‎ केला होता. त्याने अल्पवयीन मुलीस ‎फूस लावली आणि तिला पळवू न‎नेले. याबाबतची फिर्याद कुटुंबीयांनी‎ आष्टी पोलिस ठाण्यात दाखल केली ‎होती. त्यानुसार प्रभारी पोलिस ‎निरीक्षक सचिन इंगेवाड यांनी‎ पीएसआय अजित चाटे व गुन्हे‎शोध पथकाला मुलीचा शोध व‎ आरोपीस अटक करण्यासाठी ‎पाठविले होते. गुन्हे शोध पथकाने ‎समिरण सरकार यांच्या मोबाइलचे‎ लोकेशन तपासून पाठलाग केला‎ असता हा उत्तर प्रदेश हद्दीतील‎ नगलिया येथे आढळून आला. ‎त्याला ताब्यात घेऊन आष्टी येथ े‎आणले अाहे. पोक्सो कलमा‎अंतर्गत गुन्हा दाखल करून‎ आरोपीस अटक केली आहे. अॅड. आशिष शेलार यांना सावानाचा कार्यक्षम आमदार पुरस्कार जाहीर नाशिक – सार्वजनिक वाचनालयातर्फे दिला जाणारा वर्ष २०२४ चा कार्यक्षम आमदार पुरस्कार अॅड.आशिष शेलार यांना जाहीर झाला आहे. फेब्रुवारी २०२५ च्या पहिल्या आठवड्यात पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे. सावानाच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथे शेलार यांची भेट घेऊन त्यांना त्यांची निवड झाल्याचे सांगितले. पुरस्कार प्रदान सोहळ्याचे निमंत्रणही दिले. याबद्दल त्यांनी संस्थेचे आभार मानले. महालक्ष्मीची अमृतलक्ष्मी रूपात पूजा मार्गशीर्ष महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीची अमृतलक्ष्मी या स्वरूपात पूजा बांधली होती. लक्ष्मी ही अमृत आणि चंद्रासोबत उद्भवली. त्यामुळे लक्ष्मी, चंद्र आणि अमृत यांचा घनिष्ठ संबंध आहे. टिळेकर मामा खून; आरोपींना २० तारखेपर्यंत पोलिस कोठडी पुणे – भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ ( ५५ ) यांचा ९ डिसेंबर रोजी अपहरण करून हल्लेखोरांनी निर्घृण खून केल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत चार आरोपींना अटक केली असून त्यांना गुरुवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एच. अतकरे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. या वेळी न्यायालयाने चार आरोपींना २० डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पवन श्यामसुंदर शर्मा (३०, रा. वाघोली, पुणे ), नवनाथ अर्जुन गुरसाळे (३१, रा. वाघोली, पुणे, मू.रा. बीड), विकास सीताराम शिंदे (२८, रा. – वाघोली, पुणे मूळ रा.अरणगाव, अहिल्यानगर) आणि अक्षय हरीश जावळकर ( २९, रा. फुरसुंगी, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दरम्यान, याप्रकरणी आरोपींची सखोल चौकशी करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, वाघ यांचा अनैतिक संबंधातून खून करण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे. पोलिस या प्रकरणाचा सर्व बाजुंनी तपास करत असल्याचे सांगण्यात आले आहे. भाजपविरोधात विधानसभा लढलेल्या उमेदवारांना शिंदेसेनेचे दार खुले नवी मुंबई – विधानसभेला बेलापूर आणि ऐरोलीतून भाजपच्या अधिकृत उमेदवारांविरोधात विजय नाहटा आणि विजय चौघुले या शिंदेसेनेच्या स्थानिक नेत्यांनी बंडखोरी केली होती. त्यांच्यावर एकनाथ शिंदे यांनी त्यावेळी निलंबनाची कारवाई केली होती. मात्र, या दोघांनाही पुन्हा पक्षाचे दरवाजे खुले होणार आहेत. तसा निर्णय पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात झाला. मनपा निवडणुकीसाठी या नेत्यांना परत घ्यावे, असा ठराव मंजूर झाला आहे. डोंगरजवळा येथे शेतात‎पेरणीवरून एकास मारहाण‎ परभणी‎ – शेतजमिनीच्या मालकी हक्कावरून‎न्यायालयात वाद सुरू आहे. दोन्ही‎गटाला वादग्रस्त शेतात पेरणी न‎करण्याविषयी आदेश देण्यात आले‎आहे. तरी देखील पेरणी केल्याने‎झालेल्या वादातून मारहाणीची घटना‎घडली. हा प्रकार गंगाखेड‎तालुक्यातील डोंगरजवळा पाटीवर‎घडला. सदर प्रकरणी पिंपळदरी‎पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल‎करण्यात आला आहे. वेणुबाई‎पांचाळ यांनी दिलेल्या तक्रारीवरुन‎मारोती सांगळे, मनीषा सांगळे,‎रुक्मिणी सांगळे यांच्यावर गुन्ह्याची‎नोंद करण्यात आली आहे. आरोपींनी‎संगनमत करुन केलेल्या मारहाणीत‎फिर्यादीच्या तोंडातील दात पडले.‎लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत जिवे‎मारण्याची धमकी दिली. तपास‎उपनिरीक्षक अंधोरीकर करत आहेत.‎ जन्मठेपेची शिक्षा भोगणारा कैदी कारागृहातून पसार
पुणे – येरवडा परिसरात असलेल्या येरवडा खुल्या कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा न्यायालयाने सुनावलेला एक कैदी कारागृह रक्षकांची नजर चुकवून पसार झाल्याची घटना उघडकीस आली अाहे. याप्रकरणी पसार झालेल्या अनिल मेघदास पटोनिया (३५) याच्याविरुद्ध येरवडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पटोनिया मूळचा ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा परिसरात असलेल्या म्हारल गावामधील रहिवासी आहे. त्याच्याविरुद्ध एक खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता त्याचा शोध घेण्यात येत आहे. संसदेमध्ये आजपासून ४ दिवस संविधानावर चर्चा नवी दिल्ली – शुक्रवारपासून संसदेत चार दिवस विशेष असतील. शुक्रवार आणि शनिवारी लोकसभेत भारतीय राज्यघटनेवर विशेष चर्चेला सुरुवात होईल. संविधान स्वीकारल्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त ही चर्चा होणार आहे. तथापि, राज्यसभेत सोमवारी व मंगळवारी संविधानावर चर्चा होईल. या महिन्याच्या सुरुवातीला संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू व इतर पक्षांच्या नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीत यावर सहमती झाली होती. सूत्रांनी सांगितले की, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह लोकसभेत चर्चेला सुरुवात करतील, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह राज्यसभेत चर्चेला सुरुवात करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी लोकसभेत चर्चेला उत्तर देऊ शकतात. कर्ज स्वस्त होण्याची आशावाढली, किरकोळ महागाई ३ महिन्यांनंतर ६% च्या खाली नवी दिल्ली – देशात नोव्हेंबरमध्ये किरकोळ महागाई कमी होऊन ५.८% झाली आहे. हा दर ऑक्टोबरमध्ये १४ महिन्यांची सर्वोच्च पातळी ६.२१% इतका होता. तथापि, तो अजूनही आरबीआयच्या २ ते ४% च्या खूप वर आहे. या वर्षी ऑगस्टमध्ये तो ३.६५% होता, पण तेव्हापासून यात सातत्याने वाढ झाली. तथापि, औद्योगिक उत्पादन या वर्षी ऑक्टोबरमध्ये ३.५% पर्यंत वाढले. ते सप्टेंबरमध्ये ३.१% होते. मात्र, गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये हा वेग ११.९% होता. केअरएज रेटिंगच्या चीफ इकॉनॉमिस्ट रजनी सिन्हा यांच्या मते, भाज्यांच्या किमती घसरल्याने किरकोळ महागाई कमी झाली आहे.

  

Share