डॉ. आठवले यांच्या ‘भारतीय संविधान डॉ पंजाबराव देशमुख’ पुस्तकाचे प्रकाशन
दर्यापूर तालुक्यातील तोंगलाबाद येथील रहिवासी तसेच कोकिळाबाई गावंडे महिला महाविद्यालय दर्यापूर येथील राज्यशास्त्र विभाग प्रमुख, लेखक, प्रा. डॉ. देवलाल आठवले यांनी लिहिलेल्या ‘भारतीय संविधान : डॉ. पंजाबराव देशमुख’ या पुस्तकाचे प्रकाशन राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. या पुस्तकाची निर्मिती श्री शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे करण्यात आली. श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संस्थेचे संस्थापक, शिक्षणमहर्षी, कृषीरत्न डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या ६० व्या पुण्यतिथीनिमित्त डॉ. पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज परिसरातील श्री शिवाजी महाराज सभागृहात आयोजित आदरांजली कार्यक्रमात हा पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे खा. डॉ. अनिल बोंडे, शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, खा. बळवंत वानखडे, आ. सुलभा खोडके, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, उपाध्यक्ष अॅड. गजानन पुंडकर, दिलीप इंगोले, हेमंत काळमेघ, प्राचार्य केशव गावंडे, डॉ. वि. गो. ठाकरे व संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते. या पुस्तक प्रकाशनाबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, दिग्दर्शक प्रा. नीलेश जळमकर, डॉ. गोपाल जऊळकार, दत्ता पाटील जळमकर, पुरुषोत्तम बावनेर, राहुल जळमकर आदींनी अभिनंदन केले. पुस्तक प्रकाशन प्रसंगी मंत्री बावनकुळे, हर्षवर्धन देशमुख, खा.बोंडे आदी.