एकनाथ शिंदे देशातील सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री होते:संजय राऊतांचा आरोप; भागवत कुंभमेळ्याला का गेले नाही? हिंदुत्त्वाच्या मुद्यावरुन पलटवार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे देखील कुंभमेळ्याला गेले नाहीत. त्यामुळे कुंभमेळ्यात का गेले नाहीत? असा प्रश्न एकनाथ शिंदे यांनी मोहन भागवत यांना विचारावा, असे आव्हान उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिले आहे. शिंदे देशातील सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री होते, असा दावा देखील त्यांनी केला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे हे देखील हिंदुह्दसम्राट होते. मात्र त्यांचे देखील कुंभमेळा तील एकही छायाचित्र आम्ही पाहिले नसल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. त्यामुळे काय बोलावे याचे ट्रेनिंगच अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांना द्यायला हवे, असे देखील राऊत यांनी म्हटले आहे. आम्ही हे वृत्त अपडेट करत आहोत…

  

Share