एकनाथ शिंदे यांना उत्तर देण्यासाठी ते एवढे काही महान नाही. शेवटी गद्दार तो गद्दारच असतो. त्याच्या मताला मी किंमत देत नाही. असा शब्दात उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. तर राज ठाकरे यांच्या सोबतच्या युतीवर निर्णय घेण्यासाठी आम्ही दोघे सक्षम असल्याचे ठाकरे यांनी म्हटले आहे. इंडिया आघाडी राज ठाकरे यांना सोबत घेईल का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावरुन देखील उद्धव ठाकरे यांनी टीका केली. ते त्यांच्या मालकाला भेटायला आले असतील. त्यामुळे आपण त्यावर काय बोलू शकतो? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. ते त्यांच्या मालकाला भेटायला दिल्लीत आले असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. राज ठाकरे इंडिया आघाडीचा भाग होतील का? राज ठाकरे यांच्यासोबतच्या युतीवर जास्त बोलण्यास उद्धव ठाकरे यांनी नकार दिला. त्यावर निर्णय घेण्यास आम्ही दोघे भाऊ सक्षम असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. त्यामुळे या निर्णयात राहुल गांधी किंवा इंडिया आघाडीचा कोणताही हस्तक्षेप नसल्याचे ठाकरे यांनी म्हटले आहे. आजच्या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये या विषयावर चर्चा होणार का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. राज ठाकरे यांना इंडिया आघाडीत समाविष्ट केले जाईल का? यावर त्यांनी अशा कोणत्याही अटी शर्ती, इंडिया आघाडीमध्ये नसल्याचे म्हटले आहे. आम्ही हे वृत्त अपडेट करत आहोत…