निवडणुका होताच महायुती ॲक्शन मोडवर:मोहिते पाटील, परिचारक कुटुंबाला धक्का; सोलापूर जिल्हा बँक कर्ज वाटप प्रकरणी कारवाई

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला झालेल्या 238 कोटी 43 लाख रुपयांच्या नुकसानीस मृत संचालकांचे वारसही जबाबदार असतील, असा महत्त्वपूर्ण आदेश सहकार खात्याच्या पुणे विभागाचे सहनिबंधक योगिराज सुर्वे यांनी दिला आहे. मृत झालेल्या सहा माजी संचालकांच्या वारसांकडून नुकसानीपोटी जबाबदारी निश्चित केलेली रक्कम आणि त्यावर 12 टक्के व्याज आकार वसूल करण्याचे आदेशात म्हटले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीच्या वतीने ही पहिलीच कारवाई मानली जात आहे. बँकेच्या 35 संचालक आणि कर्मचाऱ्यांवर 238 कोटी 43 लाख रुपयांच्या नुकसानीस जबाबदार धरण्यात आले आहे. पैकी मृत असलेल्या 6 संचालकांच्या वारसांचा प्रश्न होता. त्यावर सुर्वे यांनी हे आदेश काढले आहेत. सहकार कायद्यातील कलम 88 नुसार झालेल्या चौकशीत जबाबदारी निश्चित करण्यात आली. निवृत्त पणन संचालक डॉ. किशोर तोष्णीवाल यांनी त्याचा अहवाल शासनाकडे सादर केला. या मृत संचालकांच्या वारसांना जबाबदार धरण्यात आले उच्च न्यायालयामध्ये दाद बँकेला झालेल्या नुकसानीची रक्कम जमीन महसूल पद्धतीने वसूल करण्याचा अहवाल चौकशी अधिकाऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे मृत संचालकांच्या नावाची मालमत्ता त्यांचे वारस असलेल्यांच्या नावाने झालेली असेल तर त्यावर आता बोजा नोंदवण्याचे काम होईल. तत्पूर्वी वारसांचा शोध आणि त्यांच्या नावाची वडिलोपार्जित मालमत्ता यांचा शोध घ्यावा लागेल. या आदेशाच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागता येते. पुढे काय?… या आदेशाला मिळू शकते स्थगिती राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा… महाराष्ट्र विधानसभेचे आजपासून विशेष अधिवेशन:कालिदास कोळंबकर हंगामी अध्यक्ष; सर्व आमदारांना देतील शपथ महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. नवीन सरकारच्या स्थापनेनंतर भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी महाराष्ट्र विधानसभेचे प्रोटेम स्पीकर म्हणून कालच शपथ घेतली. नऊ वेळा आमदार राहिलेल्या कोळंबकर यांना राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी राजभवनात शपथ दिली. आता कोळंबकर हे सर्व आमदारांना विधानभवनात शपथ देतील. पूर्ण बातमी वाचा… कोकण, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत हलका ते मध्यम पावसाची शक्यता:बहुतांश भागात शुष्क आणि कोरडे वातावरण मागील काही दिवसांपासून आज्यात पावसाचा अलर्ट देण्यात आला होता. त्यानुसार मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेला फेंगल चक्रीवादळाचा परिणाम झाल्याने हा पाऊस पडत आहे. दरम्यान आता कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे चक्राकार वारे देखील पुढे सरकल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. त्यानुसार आता दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि उत्तरेच्या काही भागांमध्ये हलक्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर उर्वरित राज्यात काही ठिकाणी कोरडे हवामान राहण्याचा अंदाज आहे. तर काही भागात अंशतः ढगाळ वातावरण राहील. पूर्ण बातमी वाचा….

  

Share