फडणवीसांच्या मंत्रिमंडळात 19 नवीन चेहरे:भाजप 9, शिवसेना 6 तर राष्ट्रवादीकडून चौघांना पहिल्यांदा संधी; वाचा यादी
महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार होणार असून सायंकाळी 4 वाजता नागपूर येथे मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिडळात आज 39 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेत मंत्रिमंडळात 19 नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. महायुतीमधील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिनही पक्षांनी आपल्या सर्व नेत्यांना संतुष्ट ठेवण्याचा प्रयत्न केला. मिळालेल्या माहितीनुसार भाजप पक्षातर्फे एकूण 9 नवे चेहरे असतील. राष्ट्रवादी पक्षात एकूण 4 तर शिवसेना पक्षात एकूण 6 नव्या चेहऱ्यांना मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे. भाजपकडून या नव्या चेहऱ्यांना संधी
नितेश राणे
माधुरी मिसाळ
मेघना बोर्डीकर
पंकज भोयर
जयकुमार गोरे
संजय सावकारे
आकाश फुंडकर
शिवेंद्रराजे भोसले
अशोक उईके शिवसेनेकडून या नव्या नेत्यांना संधी
संजय शिरसाट
भरत गोगावले
प्रकाश आबीटकर
प्रताप सरनाईक
आशिष जैस्वाल
योगेश कमद राष्ट्रवादीकडील नवीन नेत्यांची नावे
नरहरी झिरवळ
इंद्रनील नाईक
बाबासाहेब पाटील
मकरंद जाधव पाटील
अनेक दिग्गजांना अजून फोन नाही
देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात शिवसेनेच्या दीपक केसरकर, तानाजी सावंत आणि अब्दुल सत्तार यांना डच्चू देण्यात आल्याचे समोर आले आहे. तर आता अजित पवार गटाच्या शिलेदारांच्या यादीत अद्याप छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांचे नाव नाही, तर दुसरीकडे भाजपच्या यादीत रवींद्र चव्हाण यांना स्थान देण्यात आले नसल्याने आता या नेत्यांना पक्ष संघटनेत संधी मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भुजबळांची राष्ट्रवादीच्या मेळाव्याला अनुपस्थिती दरम्यान, मंत्र्यांच्या शपथविधी पूर्वी नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा पार पडला. या मेळाव्याला छगन भुजबळ उपस्थित नसल्याने या चर्चांना उधाण आले आहे. अजित पवारांकडून ऐनवेळी धनंजय मुंडे यांना संधी देण्यात आली. अदिती तटकरे, बाबासाहेब पाटील, दत्तात्रय भरणे, हसन मुश्रीफ, नरहरी झिरवाळ, मकरंद पाटील, इंद्रनील नाईक, धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद निश्चित झाले आहे. या यादीत आपले नाव नसल्याने छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळेच ते पक्षाच्या नागपुरातील मेळाव्या उपस्थित राहिले नसल्याचे बोलले जात आहे.