माजी PM मनमोहन सिंग यांची प्रकृती खालावली:AIIMS च्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये दाखल, प्रकृती चिंताजनक

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना आज एम्स (ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स) च्या आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात आणण्यात आले. माजी पंतप्रधान 91 वर्षांचे आहेत. 2004 ते 2014 पर्यंत ते देशाचे पंतप्रधान होते. डॉ. सिंग यांच्या प्रकृतीबाबत सध्या कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. डॉक्टरांचे विशेष पथक त्यांची तपासणी करत आहे. ही बातमी अपडेट करत आहोत…

Share