‘फ्रेंडशिप डे’च्या शुभेच्छा देत आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना डिवचले:शिरसाटांच्या वादग्रस्त विधानावरून लगावला टोला, म्हणाले- आता शिरसाट यांना अर्थखाते मिळणार का? ‘फ्रेंडशिप डे’च्या शुभेच्छा देत आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना डिवचले:शिरसाटांच्या वादग्रस्त विधानावरून लगावला टोला, म्हणाले- आता शिरसाट यांना अर्थखाते मिळणार का?

‘फ्रेंडशिप डे’च्या शुभेच्छा देत आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना डिवचले:शिरसाटांच्या वादग्रस्त विधानावरून लगावला टोला, म्हणाले- आता शिरसाट यांना अर्थखाते मिळणार का?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सर्वच मंत्र्यांना वादग्रस्त वक्तव्य टाळण्याच्या सूचना दिल्या असतानाही मंत्री संजय शिरसाट यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. निधी देण्यासंदर्भाने भाषण करताना त्यांनी, पैसा सरकारचा आहे, आपल्या बापाचे काय जाते, असे म्हणत टिपण्णी केली होती. त्यावरुन, आता शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना मैत्री दिनाच्या शुभेच्छा देत टोला लगावला. हॅपी फ्रेंडशिप डे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. हे पोस्ट करताना त्यांनी संजय शिरसाट यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात संजय शिरसाट यांनी सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचे काय जाते, असे विधान केले होते. वासतिगृहसाठी 5 कोटी, 10 कोटी कितीही निधी मागा, मी देणार असे म्हणत शिरसाट यांनी पैशाबाबत वरील वादग्रस्त विधान केले. यावरून विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली आहे. आदित्य ठाकरे काय म्हणाले? आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत म्हणले हॅपी फ्रेंडशिप डे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, असे दोस्त असताना. असे म्हणत त्यांनी संजय शिरसाट यांचा व्हिडिओ जोडला आहे. तसेच बरं, आता रम्मी खेळणाऱ्यांना क्रीडा खाते मिळते, युती धर्माच्या हतबलतेमुळे, तर ह्यांना अर्थ खाते मिळणारच, असा टोलाही लगावला आहे. वाह्याद शिरसाटचा राजीनामा कधी होणार?- सुषमा अंधारे संजय शिरसाट यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरून शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी राजीनाम्याची मागणी केली आहे. निव्वळ 5 वर्षात 25 पट संपत्ती, वादग्रस्त ठरल्यानंतर विट्स हॉटेलच्या लिलावातून माघार. भल्या मोठ्या रोकड रकमेसह स्वतःच्याच बेडरूममधले व्हिडिओ व्हायरल. आता आपल्या बापाचा माल थोडीच आहे, सरकारचा पैसा आहे लुटा.. हा बेतालपणा फडणवीसजी, वाह्याद शिरसाटचा राजीनामा कधी होणार? अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी टीका केली आहे.

  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *