गजानन महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन:प्रशासनाच्या वतीने स्वागत, ज्ञानेश्ववर माऊलींची पालखी फलटणमध्ये दाखल गजानन महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन:प्रशासनाच्या वतीने स्वागत, ज्ञानेश्ववर माऊलींची पालखी फलटणमध्ये दाखल

गजानन महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन:प्रशासनाच्या वतीने स्वागत, ज्ञानेश्ववर माऊलींची पालखी फलटणमध्ये दाखल

माझे जीवाचे आवडी, पंढरपुरा नेईन गुढी… या संतोक्ती प्रमाणे ऊन, वारा, पाऊस अंगावर झेलत टाळ-मृदंगांचा निनाद, ज्ञानोबा-तुकारामांचा अखंड नामघोष, गजानन महाराजांचा जयघोष, भजनांची मांदियाळी अशा भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात शेगावच्या श्री गजानन महाराजांचा पालखी सोहळा शनिवारी सायंकाळी तुळजापूर मार्गे ‘श्रीं’च्या पालखीचे तामलवाडी गाव ओलांडून सोलापूर जिल्ह्यात कसेगावाच्या शिवारात आगमन झाले. आमदार सचिन कल्याणशेट्टी, भाजपचे प्रदेश नेते शहाजी पवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, त्यांच्या पत्नी सौ. जंगम, अप्पर जिल्हाधिकारी मोनिका ठाकूर, तहसीलदार किरण जमदाडे, गटविकास अधिकारी कवितके, कासेगावचे सरपंच यशपाल वाडकर, उळे गावचे सरपंच अंबिका कोळी यांच्यासह इतर मान्यवर व अधिकाऱ्यानी पालखीचे स्वागत केले. पालखी सोहळ्यात तरुणांचा उल्लेखनीय सहभाग या पालखी सोहळ्यात शिस्तीचे व भक्तीचे वातावरण पाहावयास मिळाले. २६ दिवसांचा पायी प्रवास करीत सोलापूर जिल्ह्यात आगमन झालेल्या या पालखी सोहळ्यात पांढऱ्याशुभ्र पोशाखातील ६५० भगव्या पताकाधारी वारकरी एका रांगेत चालत होते. यात तरुणांचा सहभाग उल्लेखनीय आहे. उळे गावी पालखीचा मुक्काम दिनांक 2 जून 2025 रोजी श्री गजानन महाराज पालखी शेगाव येथून पंढरपूर वारीसाठी प्रस्थान केले आहे. या वारीदरम्यान, दिनांक 28 जून 2025 रोजी 27 वा मुक्काम श्री क्षेत्र तुळजापूर होता. हे ठिकाण आई तुळजाभवानीच्या चरणी महाराजांची भावपूर्ण भेट घडवणारे एक अत्यंत महत्त्वाचे व पवित्र स्थान मानले जाते. त्यानंतर श्रीं’च्या पालखीचे शनिवारी तामलवाडी गाव ओलांडून सोलापूर जिल्ह्यात कसेगावाच्या शिवारात आगमन झाले. दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे या गावी पालखी सोहळ्याचा मुक्काम आहे. रविवारी सकाळी पालखी सोहळा सोलापूर शहरात दाखल होणार आहे. ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा फलटणमध्ये दाखल दरम्यान, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सातारा जिल्ह्यातील फलटणमध्ये दाखल झाला आहे. टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि ‘ज्ञानोबा-तुकाराम’ नामाच्या जयघोषात वारकरी फलटण शहरात दाखल झाले. फलटण नगर परिषदेच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. पालखीचा आज फलटण शहरात मुक्काम असणार आहे. उद्या 29 जून रोजी सकाळी पालखीचे बरडच्या दिशेने प्रस्थान होईल. बरड येथे गोल रिंगण होणार आहे.

  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *