सरकारकडून खातेवाटप जाहीर, गृह खाते फडणवीसांकडेच:अजित पवारांकडे अर्थ आणि उत्पादन शुल्क, शिंदेंकडे नगरविकास आणि गृहनिर्माण

मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खाते वाटप कधी होणार, अशी चर्चा सुरू होती. अशात सरकारच्या वतीने आज रात्री खातेवाटप करण्यात आले असून देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच गृहमंत्रालय असणार आहे. तर अर्थ खाते हे अजित पवारांकडे देण्यात आले आहे. गृहखात्यासाठी अडून बसलेले एकनाथ शिंदे यांना नगर विकास खात्यासोबतच गृहनिर्माण खाते दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह खात्यासोबतच ऊर्जा, कायदा व न्यायव्यवस्था, सामान्य प्रशासन आणि माहिती व प्रसारण खाते स्वत:कडेच ठेवले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थसह उत्पादन शुल्क खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
जाणून घ्या, कोणाला कोणते खाते मिळाले…
कॅबिनेट मंत्री राज्यमंत्री 15 डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर 23 व्या दिवशी रविवारी नागपुरात मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. फडणवीस सरकारमध्ये 33 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांसह ही संख्या 42 झाली आहे. मंत्रिमंडळात एकूण 43 मंत्री शपथ घेऊ शकतात. तर, एक जागा रिक्त ठेवण्यात आली आहे. फडणवीस सरकारमध्ये भाजपच्या 19, शिवसेनेच्या 11 आणि राष्ट्रवादीच्या कोट्यातील 9 मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. शिंदे सरकारमधील 12 मंत्र्यांना त्यात स्थान मिळाले नाही. यामध्ये भाजपचे 4, शिवसेनेचे 3, राष्ट्रवादीचे 5 मंत्री आहेत. तर, 19 नवीन आमदार मंत्री झाले. यामध्ये भाजपचे 9, शिवसेनेचे 8 आणि राष्ट्रवादीचे 4 उमेदवार आहेत. याशिवाय 4 महिला (3 भाजप, 1 राष्ट्रवादी) आणि 1 मुस्लीम (राष्ट्रवादी) यांना सरकारमध्ये स्थान मिळाले आहे. सर्वात तरुण मंत्री राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे (36) आहेत, तर सर्वात वयस्कर मंत्री भाजपचे गणेश नाईक (74) आहेत. या संबंधित ही पण बातमी वाचा… महाराष्ट्रात 33 कॅबिनेट, 6 राज्यमंत्र्यांची शपथ:फडणवीस सरकारमध्ये 2 उपमुख्यमंत्र्यांसह 42 मंत्री, त्यात 1 मुस्लीम, 4 महिला; 1 जागा रिक्त महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार रविवारी नागपुरात झाला. यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह 33 कॅबिनेट मंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजा आणि त्यांचे चुलत भाऊ धनंजय मुंडे यांचा समावेश आहे. राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ हे एकमेव मुस्लिम चेहरा आहेत, तर 4 महिलांना मंत्री करण्यात आले आहे. वाचा सविस्तर बातमी…

  

Share