गुजरात दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) बंगळुरू येथून ३० वर्षीय शमा परवीन शमसूल अन्सारी हिला अटक केली आहे, जी अल कायदाशी संबंधित संघटना (एक्यूआयएस) साठी काम करत होती. देशविरोधी आणि जिहादी सामग्री पसरवण्याच्या आरोपाखाली शमाला बंगळुरूमधील आरटीनगर येथून अटक करण्यात आली होती. ती पाकिस्तानातील काही लोकांशी संपर्कात होती. तसेच, ती फेसबुक, इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक्यूआयएस आणि कट्टरपंथी धर्मगुरूंचे व्हिडिओ शेअर करत असे. एटीएसने सांगितले की, २२ जुलै रोजी दिल्ली, नोएडा, अहमदाबाद आणि मोडासा येथून एक्यूआयएसची सामग्री पसरवणाऱ्या ४ तरुणांना अटक केली. एकाच्या चौकशीत दिसले की त्याला बंगळुरूच्या शमाच्या सोशल मीडिया अकाउंटवरून कट्टरपंथी व्हिडिओ मिळतात. त्यानंतर एटीएसच्या तांत्रिक पथकाने शमाचा शोध सुरू केला. एटीएसचे डीआयजी सुनील जोशी म्हणाले, शमाने जिहादी भाषणे, ‘गजवा-ए-हिंद’, भारत सरकारविरुद्ध सशस्त्र संघर्ष व सोशल मीडियावर शरिया लागू करणे असे व्हिडिओ शेअर केले. मूळची झारखंडमधील, बी.कॉम.पर्यंत शिक्षण एटीएसच्या म्हणण्यानुसार, शमाने एक्यूआयएस प्रमुख मौलाना असीम उमर, अल कायदाचे इमाम अन्वर अवलाकी आणि लाहोरच्या लाल मशिदीचे मौलाना अब्दुल अजीज यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले होते. या व्हिडिओंमध्ये मुस्लिम तरुणांना धर्माच्या नावाखाली द्वेष पसरवण्याचे आवाहन केले होते. शमा झारखंडची रहिवासी आहे. बी.कॉम. पर्यंत शिक्षण घेतलेली शमा तिचा भाऊ आणि आईसोबत बंगळुरूमध्ये राहते.


By
mahahunt
31 July 2025