आधी म्हणाले अंबादास दानवे काड्या करतो:आता म्हणाले आमचा वाद केव्हाच मिटला, उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर चंद्रकांत खैरेंचा बदलला सूर

छत्रपती संभाजीनगर येथे रविवारी शिवसेना ठाकरे गटाची बैठक बोलावण्यात आली होती. मात्र या बैठकीला माजी खासदार चंद्रकांत खैरे उपस्थित नव्हते. तसेच अंबादास दानवे यांनी आपल्याला बोलावलेच नाही, असा आरोप खैरे यांनी केला होता. तसेच अंबदास दानवे काड्या करत आहे, असे म्हणत चंद्रकांत खैरे यांनी आज मातोश्री गाठली होती. उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर चंद्रकांत खैरे यांनी वाद मिटला असल्याचे स्पष्ट केले आहे. दानवे आणि माझा वाद केव्हाच मिटला मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर चंद्रकांत खैरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना चंद्रकांत खैरे म्हणाले, उद्धव ठाकरे यांची भेट झाली असून कार्यक्रमासंदर्भात चर्चा झाली आहे. काही कार्यक्रम पक्षाकडून आखले जाणार आहेत, त्याबाबत त्यांच्याशी बोलणे झाले. तसेच पुढे बोलताना चंद्रकांत खैरे म्हणाले, अंबादास दानवे आणि माझा वाद केव्हाच मिटला आहे. यापुढे आम्ही दोघे मिळून एकत्र कार्यक्रम करणार आहोत. तो एकटा किंवा मी एकटा कार्यक्रम करणार नाही, सोबत म्हणून कार्यक्रम करणार आहोत. आज सुद्धा सेना भवनला बैठक आहे, त्यावेळी मी आणि अंबादास दानवे सोबत बैठकीला असणार आहोत, असेही खैरे यांनी स्पष्ट केले आहे. ..म्हणून मेळाव्याला जाऊ शकलो नाही चंद्रकांत खैरे पुढे म्हणाले, संभाजीनगरमधील मेळाव्याच्या कार्यक्रमाला मला निमंत्रण नव्हतं. शिवाय त्या मेळाव्याच्या दिवशी माझ्या समाजाचा कार्यक्रम आधीपासून ठरलेला होता, त्यासाठी मी तिकडे गेलो होतो. त्यामुळे मेळाव्याला जाऊ शकलो नाही. उद्धव ठाकरेंना मी सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि आता वाद मिटलेला आहे. तसेच 15 जूनला उद्धव ठाकरे संभाजीनगर येथे शिवसेना भवनचे उद्घाटन करतील तसेच शिबिर सुद्धा घेतील, अशी माहिती चंद्रकांत खैरे यांनी दिली आहे. मातोश्री तुमचे ऐकणार नाही:एक दिवस अंबादास दानवेंचे जोडे उचलावे लागतील, संजय शिरसाटांचा चंद्रकांत खैरेंना इशारा चंद्रकांत खैरे मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मुंबईला गेले आहेत. यावरून शिवसेना शिंदे गटाचे नेते व मंत्री संजय शिरसाट यांनी टीका केली आहे. मातोश्रीवर तुमचे ऐकले जाणार नाही, अडीच वर्षापुर्वी आम्हीही त्यांना काही सांगायला गेलो होतो. काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ सोडा, पण त्यांनी ऐकले नाही, शेवटी पक्ष फुटला. हेही वाचा अंबादास दानवे – चंद्रकांत खैरेंतील वाद ‘मातोश्री’वर:’दानवे लै काड्या करतो’ म्हणत खैरे उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मोठा निर्णय घेण्याचे संकेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे तथा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यातील वाद सर्वश्रूत आहे. खैरे यांनी नुकतेच अंबादास दानवे लै काड्या करतो असे म्हणत त्यांच्यावर आपल्याला जिल्ह्यातील राजकारणात विश्वासात न घेण्याचा आरोप केला होता. तसेच हे प्रकरण उद्धव ठाकरे यांच्या कानावर घालण्याचा इशाराही दिला होता. त्यानुसार, खैरे आज मातोश्रीवर ठाकरेंची भेट घेण्यासाठी पोहोचले. हेही वाचा

  

Share