हिंदी सक्तीचा जीआर मागे घेईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार:आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा, फडणवीसांना दिला विचार करण्याचा सल्ला हिंदी सक्तीचा जीआर मागे घेईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार:आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा, फडणवीसांना दिला विचार करण्याचा सल्ला

हिंदी सक्तीचा जीआर मागे घेईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार:आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा, फडणवीसांना दिला विचार करण्याचा सल्ला

राज्यात पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याच पार्श्वभूमीवर युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी हिंदी सक्तीचा निर्णय भाजप सरकारचा असल्याचे सांगत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांवर निशाणा साधला. हिंदी सक्तीचा जीआर मागे घेईपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहिल, असा इशाराही आदित्य ठाकरे यांनी सरकारला दिला आहे. आम्ही सक्तीचा जीआर काढला होता का? आम्ही प्रत्येक शाळेत मराठी भाषेची सक्ती केली होती. हिंदी भाषा लादण्याचे किंवा तिसरी भाषा लादण्याचे काम भाजपवाल्यांनी केले आहे, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. एकनाथ शिंदेंवर साधला निशाणा गेल्या तीन वर्षांत दोन मुख्यमंत्री वेगळे झालेत. ते सरकारमध्ये स्वत: बसलेत. पण आरोप आमच्यावर करत आहेत. नशीब ते नेहरूंवर पोहोचले नाहीत, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना टोला लगावला आहे. भाजपमध्येही अंतर्गत वाद आहेत, ते आपल्याला दिसत आहेत. दुसरे कोणी असे मंत्री आहेत का, ज्यांना फडणवीसांची जागा पाहिजे? हे ही असू शकते. सक्तीच्या जीआरची तारीख काय आहे? तो परवा काढला आहे. हे लोक कोणत्या धुंदीत आहेत? झोपेत आहेत का? हिंदीच्या सक्तीचा जीआर हा भाजपच्या सरकाने काढलेला आहे. भ्रष्टनाथ शिंदेंच्या मंत्र्यांनी काढलेला आहे. शिंदेंनाच फडणवाीसांना अडचणीत आणायचे नाही ना? हा देखील विचार करा, असे आदित्य ठाकरे म्हणाले. आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सरकारमध्ये कोण विरोधात काम करतंय हे ओळखावे. आपण सगळे भारतीय आहोच. पहिलीच्या विद्यार्थ्यांवर तिसरी भाषा खरोखरच लादणार आहात का? याचा थोडा स्वार्थाचे राजकारण बाजुला ठेवून विचार करावा, असा सल्ला आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला. जीआर मागे घेईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार हिंदी सक्तीचा जीआर जोपर्यंत मागे घेतला जात नाही, तोपर्यंत उद्याचे आणि ५ जुलैचे आंदोलन चालूच राहिल. आमचा विरोध भाषेला किंवा भाषिकाला नाही. तुम्ही पहिलीच्या विद्यार्थ्यांवर हिंदी लादत आहात, महाराष्ट्रात सक्ती करत आहात, त्याला आमचा विरोध आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. सरकारमध्ये जी गडबड चालू आहे, त्याविरोधात आम्ही विरोधीपक्ष म्हणून उतरलो आहोत. आमच्यावर कोणतीही भाषा आम्ही लादू देणार नाही, असा इशाराही आदित्य ठाकरे यांनी सरकारला दिला. … युवासेना शांत बसणार नाही महाराष्ट्रात जवळपास २५ लाख विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. १३ मे रोजी दहावीचा निकाल लागला होता. १३ मे पासून आतापर्यंत प्रवेशाची ऑनलाइन प्रक्रिया सुरू केली, त्यामध्ये पुढे कसे जायचे? याबद्दल कोणाला काहीच माहिती नाही. ऑनलाइन फॉर्ममध्ये गडबडी आहे, ओटीपी येण्यामध्ये अडचणी येत आहेत. वेबसाइट देखील कोलमडली. ११ वी प्रवेशाची यादी लागली नाही, तर युवासेना शांत बसणार नाही, असा इशाराही आमदार आदित्य ठाकरे यांनी दिला. हे ही वाचा… हिंदीत नाही, मी मराठीतच बोलणार!:मंत्री अशोक उईके यांचे पुण्यात विधान; देवेंद्र फडणवीस सरकारला घरचा आहेर दिल्याची चर्चा राज्यात पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या मुद्यावरून मोठे आकांडतांडव माजले आहे. या प्रकरणी सरकार व विरोधकांत कमालीची राजकीय चिखलफेक होत असताना आता भाजपच्याच एका मंत्र्याने महायुती सरकारला घरचा आहेर दिल्याची बाब समोर आली आहे. राज्याचे कॅबिनेट मंत्री अशोक उईके यांनी शनिवारी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी आपल्यावर मराठीचे संस्कार झाल्यामुळे आपण हिंदीत नव्हे तर मराठीतच बोलणार असे ठणकावून सांगितले. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे. पूर्ण बातमी वाचा…

  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *