हिंदु, सनातन धर्माचा अपमान करणाऱ्यांना किंमत चुकवावी लागेल:एकनाथ शिंदे काँग्रेस नेत्यांवर संतापले; म्हणाले- उद्धव ठाकरेंचे मतांसाठी सोयीचे हिंदुत्व हिंदु, सनातन धर्माचा अपमान करणाऱ्यांना किंमत चुकवावी लागेल:एकनाथ शिंदे काँग्रेस नेत्यांवर संतापले; म्हणाले- उद्धव ठाकरेंचे मतांसाठी सोयीचे हिंदुत्व

हिंदु, सनातन धर्माचा अपमान करणाऱ्यांना किंमत चुकवावी लागेल:एकनाथ शिंदे काँग्रेस नेत्यांवर संतापले; म्हणाले- उद्धव ठाकरेंचे मतांसाठी सोयीचे हिंदुत्व

हिंदु आणि सनातन धर्माचा अपमान करणाऱ्यांना त्याची किंमत चुकवावी लागेल, असा इशाराच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. काँग्रेस नेत पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यावर त्यांनी संताप व्यक्त केला आहे. इतकेच नाही अशा वेळी उद्धव ठाकरे यांना हिंदुत्व आठवत नाही का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. ठाकरेंचे केवळ मतांसाठी असलेले सोयीचे हिंदुत्व असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. हिंदुधर्म आणि सनातन धर्म कधीही कोणावर अन्याय करत नाही. हा धर्म सहिष्णू आहे, सहन करणारा आहे. म्हणून हा खऱ्या अर्थाने हिंदुत्व आणि सनातन धर्माचा अपमान करणाऱ्यांना याची किंमत त्यांना चुकवावी लागेल. काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी हिंदु धर्माचा अपमान करणारे वक्तव्य केलेले आहे. त्याना याची किंमत मोजावी लागेल, असा इशारा देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. भगव्या वरील वाराला उत्तर देण्याचे काम शिवसेना करेल आम्ही हिंदुत्व सोडले नाही, असे म्हणणारे आता कुठे गेले? असा प्रति प्रश्न देखील एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला. एवढ्या मोठ्या वक्तव्यावर एकही भ्र न काढणे हे कसे शक्य आहे? असा प्रश्न एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला आहे. त्यामुळेच बाळासाहेब ठाकरे यांचे खरे हिंदुत्व आम्ही पुढे घेऊन चाललो आहोत, असा दावा देखील एकनाथ शिंदे यांनी केला आहे. ज्यावेळी भगव्या वर वार होईल, त्यावेळी त्याला उत्तर देण्याचे काम आमची शिवसेना करेल, असे देखील शिंदे यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरेंचा खरा चेहरा जनतेला दिसला राहुल गांधी नेहमीच सावरकर आणि हिंदुत्वाचा अपमान करतात. आता ऑपरेशन सिंदूरचा आणि प्रधान मंत्र्यांचा देखील त्यांनी अपमान केला आहे. पाकिस्तानला धडा शिकवला, त्यामुळेच त्यांना पोट दुखी आली असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे. त्यामुळेच ते रोज किती विमान पडले? याचा हिशोब विचारत आहेत. दहशतवाद्यांच्या बॉम्ब स्फोटात किती शहीद झाले? याचा हिशोब विचारण्याची हिंमत नाही का? असा प्रश्न त्यांनी विचारला. राहुल गांधी नेहमीच सावरकरांचा अपमान करतात आणि उबाठा ते सहन करते. उबाठाचे नेते राहुल गांधींच्या मांडीला मांडी लावून बसतात. याचा जाब जनता विचारल्याशिवाय राहणार नाही. म्हणून यांचे सोयीचे हिंदूच आहे. मतांसाठी हिंदुत्व धरायचे आणि सोडायचे, हे सर्व जनतेसमोर आले आहे. त्यांचा खरा चेहरा आता दिसला असल्याचेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *