शरद पवारांच्या विरोधात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक:भाजप व शिंदे सेनेच्या वतीने टाळ मृदुंग वाजवत आंदोलन

रघुपती राघव राजाराम पतीत पावन सीताराम, राम राम हरे हरे, हरे कृष्ण हरे यासह अनेक भजन म्हणत भाजपने शरद पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले आहे. भाजपचे शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी हिंदूच्या अपमनाला तुमची मुक संमती आहे का, शरद पवार हाय हाय उद्धव ठाकरेंचे करायचे काय खाली मुडंके वर पाय, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. ज्ञानेश महाराव तोंडी हिंदू देवदेवतांची स्क्रिप्ट तुमचीच आहे का?, असा सवाल यावेळी शिरीष बोराळकर यांनी केला आहे. पवारांच्या विरोधात विविध घोषणाबाजी यावेळी शरद पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी भाजपच्या वतीने करण्यात आली. तसेच त्यांच्या विरोधाचे वेगवेगळे बॅनर देखील या आंदोलनात लावण्यात आले होते. शरद पवार हाय हाय खाली मुंडके वर पाय, अशी घोषणा यावेळी करण्यात आली. शिंदे सेनेच्या वतीने देखील आंदोलन छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकात सुरुवातीला भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले. त्यानंतर शिंदे सेनेच्या वतीने देखील आंदोलन करण्यात आले. शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. हिंदू देवतांचे अपमान केले जात असतानाही शरद पवार शांत होते. त्यामुळे केवळ एका समाजाची मते मिळवण्यासाठी हा प्रकार सुरू असल्याचे टीका शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी केली आहे. यावेळी पवारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. काय आहे प्रकरण? संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनामध्ये पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी प्रभू रामचंद्र आणि श्री स्वामी समर्थांच्या संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केले. यावेळी मंचावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. शरद पवारांनी सर्व विधानांना पाठींबा दिल्याचा आरोप करत भाजप आणि हिंदू संघटना शरद पवारांविरोधात आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.

​रघुपती राघव राजाराम पतीत पावन सीताराम, राम राम हरे हरे, हरे कृष्ण हरे यासह अनेक भजन म्हणत भाजपने शरद पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले आहे. भाजपचे शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी हिंदूच्या अपमनाला तुमची मुक संमती आहे का, शरद पवार हाय हाय उद्धव ठाकरेंचे करायचे काय खाली मुडंके वर पाय, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. ज्ञानेश महाराव तोंडी हिंदू देवदेवतांची स्क्रिप्ट तुमचीच आहे का?, असा सवाल यावेळी शिरीष बोराळकर यांनी केला आहे. पवारांच्या विरोधात विविध घोषणाबाजी यावेळी शरद पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी भाजपच्या वतीने करण्यात आली. तसेच त्यांच्या विरोधाचे वेगवेगळे बॅनर देखील या आंदोलनात लावण्यात आले होते. शरद पवार हाय हाय खाली मुंडके वर पाय, अशी घोषणा यावेळी करण्यात आली. शिंदे सेनेच्या वतीने देखील आंदोलन छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकात सुरुवातीला भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले. त्यानंतर शिंदे सेनेच्या वतीने देखील आंदोलन करण्यात आले. शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. हिंदू देवतांचे अपमान केले जात असतानाही शरद पवार शांत होते. त्यामुळे केवळ एका समाजाची मते मिळवण्यासाठी हा प्रकार सुरू असल्याचे टीका शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी केली आहे. यावेळी पवारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. काय आहे प्रकरण? संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनामध्ये पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी प्रभू रामचंद्र आणि श्री स्वामी समर्थांच्या संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केले. यावेळी मंचावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. शरद पवारांनी सर्व विधानांना पाठींबा दिल्याचा आरोप करत भाजप आणि हिंदू संघटना शरद पवारांविरोधात आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.  

Share