समाजाचा राजकारणासाठी वापर करू नका:फसवणूक न करता योग्य मार्गाने न्याय द्या, आमदार राजेंद्र राऊत यांचा मनोज जरांगेंना टोला

मराठा समाजाचा राजकारणासाठी वापर करू स्वतःची पोळू भाजू नका. विशेषतः त्यांची फसवणूक करता त्यांना योग्य मार्गाने न्याय द्या, अशी इशारावजा मागणी बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी गुरुवारी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याकडे केली आहे. त्यांच्या या विधानामुळे या दोघांतील वाद एका नव्या उंचीवर जाण्याची शक्यता आहे. आमदार राजेंद्र राऊत म्हणाले की, सर्वच राजकीय पक्षांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर अंधारात भूमिका न मांडता विधानसभेचे एकदिवसीय अधिवेशन बोलवण्याची मागणी करावी. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यायचे असेल तर तसे स्पष्ट सांगावे. पण त्यांनी समाजाला झुलवत ठेवणे तत्काळ बंद करावेत. या प्रकरणी मनोज जरांगे यांनी पुढाकार घेतला पाहिजे. त्यांनी बाष्कळ बडबड बंद करून सर्व आमदारांचे पत्र घेऊन विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी करावी. विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी राजेंद्र राऊत पुढे म्हणाले, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासंबंधी आपली भूमिका स्पष्ट न करणाऱ्या पक्षांमच्या उमेदवारांविरोधात मराठा समाजाने विरोधात मतदान करण्याचा निर्णय घ्यावा. यातून सर्वच पक्षांची अंधारातील व उजेडातील भूमिका स्पष्ट होईल. मी स्वतः या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यासह शरद पवार, उद्धव ठाकरे व नाना पटोले यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. जवळपास सर्वच पक्ष व आमदारांना मी पत्र पाठवले असून, आता त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे पत्र पाठवून विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी करण्याची गरज आहे. समाजाला योग्य पद्धतीने न्याय देण्याची गरज कुणीही मराठा समाजाचा गैरवापर करू नये. या प्रकरणाची मराठा समाजाची फसवणूक न करता मराठा समाजाला योग्य पद्धतीने न्याय देण्याची गरज आहे, असा इशाराही राजेंद्र राऊत यावेळी मनोज जरांगे यांचे नाव न घेता त्यांना दिला. ते म्हणाले की, मी मराठा समाजावर एखादा विचार मांडला तर त्याचा कुणालाही राग येण्याचे कारण नाही. जरांगे कुणाची बाजू घेतात हे सर्वश्रूत आहे. आता मी माझी बाजू स्पष्ट केली असून, त्यांनीही आता विशेष अधिवेशनासाठी आमदारांकडून पत्रे घ्यावीत. कारण, अधिकाधिक आमदारांनी विशेष अधिवेशन घेण्याची मागणी केल्यास अध्यक्षांना ते बोलवावेच लागते. ..तर निवडणुकीवर बहिष्कार टाका विरोधकांनी स्वतःच्या राजकारणासाठी मराठा समाजाचा वापर करू नये. त्यांना महाराष्ट्राचा मणिपूर करायचा आहे का? सर्वच पक्षांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध केला तर राज्यातील 5 कोटी मराठ्यांनी विधानसभा निवडणुकीवरच बहिष्कार टाकावा, असे आवाहनही आमदार राजेंद्र राऊत यांनी यावेळी केले.

​मराठा समाजाचा राजकारणासाठी वापर करू स्वतःची पोळू भाजू नका. विशेषतः त्यांची फसवणूक करता त्यांना योग्य मार्गाने न्याय द्या, अशी इशारावजा मागणी बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी गुरुवारी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याकडे केली आहे. त्यांच्या या विधानामुळे या दोघांतील वाद एका नव्या उंचीवर जाण्याची शक्यता आहे. आमदार राजेंद्र राऊत म्हणाले की, सर्वच राजकीय पक्षांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर अंधारात भूमिका न मांडता विधानसभेचे एकदिवसीय अधिवेशन बोलवण्याची मागणी करावी. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यायचे असेल तर तसे स्पष्ट सांगावे. पण त्यांनी समाजाला झुलवत ठेवणे तत्काळ बंद करावेत. या प्रकरणी मनोज जरांगे यांनी पुढाकार घेतला पाहिजे. त्यांनी बाष्कळ बडबड बंद करून सर्व आमदारांचे पत्र घेऊन विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी करावी. विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी राजेंद्र राऊत पुढे म्हणाले, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासंबंधी आपली भूमिका स्पष्ट न करणाऱ्या पक्षांमच्या उमेदवारांविरोधात मराठा समाजाने विरोधात मतदान करण्याचा निर्णय घ्यावा. यातून सर्वच पक्षांची अंधारातील व उजेडातील भूमिका स्पष्ट होईल. मी स्वतः या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यासह शरद पवार, उद्धव ठाकरे व नाना पटोले यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. जवळपास सर्वच पक्ष व आमदारांना मी पत्र पाठवले असून, आता त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे पत्र पाठवून विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी करण्याची गरज आहे. समाजाला योग्य पद्धतीने न्याय देण्याची गरज कुणीही मराठा समाजाचा गैरवापर करू नये. या प्रकरणाची मराठा समाजाची फसवणूक न करता मराठा समाजाला योग्य पद्धतीने न्याय देण्याची गरज आहे, असा इशाराही राजेंद्र राऊत यावेळी मनोज जरांगे यांचे नाव न घेता त्यांना दिला. ते म्हणाले की, मी मराठा समाजावर एखादा विचार मांडला तर त्याचा कुणालाही राग येण्याचे कारण नाही. जरांगे कुणाची बाजू घेतात हे सर्वश्रूत आहे. आता मी माझी बाजू स्पष्ट केली असून, त्यांनीही आता विशेष अधिवेशनासाठी आमदारांकडून पत्रे घ्यावीत. कारण, अधिकाधिक आमदारांनी विशेष अधिवेशन घेण्याची मागणी केल्यास अध्यक्षांना ते बोलवावेच लागते. ..तर निवडणुकीवर बहिष्कार टाका विरोधकांनी स्वतःच्या राजकारणासाठी मराठा समाजाचा वापर करू नये. त्यांना महाराष्ट्राचा मणिपूर करायचा आहे का? सर्वच पक्षांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध केला तर राज्यातील 5 कोटी मराठ्यांनी विधानसभा निवडणुकीवरच बहिष्कार टाकावा, असे आवाहनही आमदार राजेंद्र राऊत यांनी यावेळी केले.  

Share