गाझियाबादमध्ये ज्यूसमध्ये यूरिन मिसळल्याचा आरोप:लोकांनी दुकानदाराला मारहाण केली; दोन आरोपींना अटक, दुकान केले बंद

गाझियाबादमधील एका ज्यूसच्या दुकानाच्या मालकाला शुक्रवारी संध्याकाळी लोकांनी बेदम मारहाण केली. दुकानदार ज्यूसमध्ये मूत्र (यूरिन) मिसळून लोकांना ते प्यायला लावत असल्याचा आरोप आहे. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले असता त्यांनी दुकानदाराची सुटका केली. दुकानातून प्लास्टिकच्या कॅनमध्ये सुमारे एक लिटर मूत्र पोलिसांना आढळून आली. पोलिसांनी दुकानदार आमिर आणि त्याच्या एका अल्पवयीन साथीदाराला अटक केली आहे. 3 छायाचित्रे पाहा… लोकांनी ज्यूसमध्ये लघवी मिसळताना रंगेहाथ पकडले
हे प्रकरण लोणी सीमा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील इंदिरापुरी पोलिस चौकीजवळचे आहे. इथे ‘खुशी ज्यूस अँड शेक’ नावाचे दुकान आहे. शुक्रवारी सायंकाळी काही जण ज्यूस पिण्यासाठी आले होते. दुकानदार आमिरने ज्यूस बनवल्याचा आरोप आहे. तो गुपचूप ज्यूसमध्ये लघवी मिसळत होता, तेव्हा लोकांच्या लक्षात आले. ग्राहकाने आमिरला मारहाण करण्यास सुरुवात केली. गोंधळ वाढल्याने घटनास्थळी गर्दी जमली. जमावाने आमिर आणि त्याच्या एका साथीदाराला पकडून मारहाण केली. याची माहिती स्थानिक लोकांनी पोलिसांना दिली. दुकानदारांनी माफी मागितली
लोणी सीमा पोलिस ठाण्याचे पोलिस 10 मिनिटांतच घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी दुकानाची झडती घेतली असता प्लास्टिकची कॅन सापडली. ती हलक्या पिवळ्या द्रवाने भरलेली होती. लोकांनी सांगितले की, कॅनमध्ये लघवी होती, जी ज्यूसमध्ये मिसळली होती. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले – शॉप ऑपरेटर आमिर आणि त्याच्या साथीदाराने सर्वांसमोर लघवी मिसळल्याचे कबूल केले आणि माफीही मागितली. लोणी हद्द पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
एसीपी भास्कर वर्मा म्हणाले- आज एका ज्यूसच्या दुकानातील चालकांकडून ज्यूसमध्ये मानवी लघवी मिसळल्याची माहिती लोकांकडून आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून तपास केला. दुकानातील एका कॅनमधून सुमारे एक लिटर मानवी मूत्र जप्त करण्यात आले. याबाबत दुकानदारांना विचारणा केली असता ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. दुकान संचालक आमिरसह दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share