संभाजीनगरमध्ये लिबेर कंपनीतील 50 कर्मचाऱ्यांना विषबाधा:कँटीनमधील पदार्थ खाल्ल्याने घडला प्रकार, सर्वांची प्रकृती स्थिर

छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहरातील शेंद्रा एमआयडीसीतील लिबेर कंपनीतील जवळपास 40-50 कर्मचाऱ्यांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. कँटीनमधील काही पदार्थ खाल्ल्याने कंपनीतील कर्मचाऱ्यांना ही विषबाधा झाली. रुग्णांवर शहरातील आदर्श हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. ही घटना सायंकाळी चार वाजेच्या सुमारास घडली. यासंदर्भात आम्ही आदर्श हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी संवाद साधला असता डॉ. आर. बी. पाटील म्हणाले की, या घटनेत जवळपास 15 जणांना विषबाधा झालेली आहे. त्यातील सर्वांची तब्येत आता धोक्याच्या बाहेर असून बऱ्याच जणांना डिस्चार्जही देण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांना विषबाधा, पाहा रुग्णालयातील फोटो… रुग्णांशी बोललो असता त्यांनी फक्त 5 जणांना विषबाधा झाल्याचे सांगितले. मीही आता डिस्चार्ज घेऊन घरी जात असल्याचे रुग्णाने आम्हाला सांगितले. त्यासोबतच त्यांच्या बोलण्यात जरा शंका जाणवत होती. कारण आत्तापर्यंत बऱ्याच जणांना डिस्चार्ज मिळाला असून आम्ही आता पाच जण येथे हॉस्पिटलला असल्याचे रुग्ण म्हणालेत. त्यांना अधिकची माहिती विचारली असता रुग्णाने डॉक्टरांशी सविस्तर संवाद साधण्याचे कारण देत बोलणे टाळले. रुग्णांना विषबाधा का झाली?
रुग्ण म्हणाला की, मी नेहमीप्रमाणेच घरून डब्बा आणतो. परंतु आज कँटीनमधून नाश्ता वगैरे जसे की दररोज करतो. तसेच आजही आम्ही केले. पण अचानक आम्हाला उलट्या होऊ लागल्या. त्यानंतर कंपनीने कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल केले. एकाचवेळी एवढ्या लोकांना विषबाधा कशी काय होऊ शकते? या प्रश्नाचे उत्तर देतांना त्यांनी टाळाटाळ केली. ते म्हणाले की, मला याविषयी अधिक माहिती नाही. परंतु एकाच वेळी आम्हाला अनेकजणांना उलटी, मळमळ ही लक्षणे जाणवू लागली होती. या संदर्भात कंपनीशीदेखील आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्याशी कुठल्याही प्रकारचा संपर्क होऊ शकला नाही.

​छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहरातील शेंद्रा एमआयडीसीतील लिबेर कंपनीतील जवळपास 40-50 कर्मचाऱ्यांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. कँटीनमधील काही पदार्थ खाल्ल्याने कंपनीतील कर्मचाऱ्यांना ही विषबाधा झाली. रुग्णांवर शहरातील आदर्श हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. ही घटना सायंकाळी चार वाजेच्या सुमारास घडली. यासंदर्भात आम्ही आदर्श हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी संवाद साधला असता डॉ. आर. बी. पाटील म्हणाले की, या घटनेत जवळपास 15 जणांना विषबाधा झालेली आहे. त्यातील सर्वांची तब्येत आता धोक्याच्या बाहेर असून बऱ्याच जणांना डिस्चार्जही देण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांना विषबाधा, पाहा रुग्णालयातील फोटो… रुग्णांशी बोललो असता त्यांनी फक्त 5 जणांना विषबाधा झाल्याचे सांगितले. मीही आता डिस्चार्ज घेऊन घरी जात असल्याचे रुग्णाने आम्हाला सांगितले. त्यासोबतच त्यांच्या बोलण्यात जरा शंका जाणवत होती. कारण आत्तापर्यंत बऱ्याच जणांना डिस्चार्ज मिळाला असून आम्ही आता पाच जण येथे हॉस्पिटलला असल्याचे रुग्ण म्हणालेत. त्यांना अधिकची माहिती विचारली असता रुग्णाने डॉक्टरांशी सविस्तर संवाद साधण्याचे कारण देत बोलणे टाळले. रुग्णांना विषबाधा का झाली?

Share