भारत-ऑस्ट्रेलिया तिसरी कसोटी, ब्रिस्बेनमध्ये पाऊस सुरूच:दुसरे सत्रही रद्द होण्याच्या मार्गावर, मॅकस्विनी-ख्वाजा नाबाद; ऑस्ट्रेलिया 28/0

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर करंडक क्रिकेट स्पर्धेतील तिसरा कसोटी सामना ब्रिस्बेन येथे खेळवला जात आहे. द गाबा स्टेडियमवर शनिवारी भारतीय संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडली. सध्या ब्रिस्बेनमध्ये पाऊस परतला असून खेळ पुन्हा थांबवण्यात आला आहे. यानंतर थोड्याच वेळात लंच ब्रेक जाहीर झाला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या सत्रात बिनबाद 28 धावा केल्या. नॅथन मॅकस्वीनी आणि उस्मान ख्वाजा नाबाद आहेत. 5 सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. पहिला सामना भारताने 295 धावांनी तर दुसरा सामना ऑस्ट्रेलियाने 10 विकेट्सने जिंकला होता. भारत-ऑस्ट्रेलिया तिसऱ्या कसोटीचा स्कोअरबोर्ड दोन्ही संघांचे प्लेइंग-11 भारत: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, आकाश दीप, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार) आणि मोहम्मद सिराज. ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स (कर्णधार), नॅथन मॅकस्वीनी, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, जोश हेझलवूड.

Share