भारतीय सैन्याला दहशतवादी समजून रडू लागले पर्यटक:महिला म्हणाली- मुलाला काहीही करू नका; सैनिकाने दिला धीर, VIDEO मध्ये दहशतीचे दृश्य

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दुपारी २.४५ वाजता दहशतवाद्यांनी गोळीबार केला. बैसरन व्हॅलीला भेट देणाऱ्या पर्यटकांना लक्ष्य करण्यात आले. गोळीबारात २७ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. पुलवामा हल्ल्यानंतर हा आतापर्यंतचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला मानला जात आहे. हल्ल्यानंतर, जेव्हा लष्कराचे जवान बैसरन खोऱ्यात पोहोचले, तेव्हा महिला आणि मुलांनी त्यांना दहशतवादी समजले कारण गोळीबार करणारे दहशतवादीही लष्कराचे गणवेश परिधान केलेले होते. यानंतर सैनिकांनी त्यांना समजावून सांगितले की आम्ही भारतीय सैन्य आहोत. वरील व्हिडिओमध्ये दहशतीचे दृश्य पाहा…

Share