इंद्रगढी देवीच्या शतचंडी होमहवन यज्ञाची पूर्णाहुतीने झाली सांगता:शुक्रवारी यात्रा उत्सवाचे आयोजन, लाभ घेण्याचे आवाहन

घाटनांद्रा येथून जवळच सागमाळ शिवारात डोंगराच्या कुशीत वसलेल्या डोंगरनिवासिनी श्री जगदंबा इंद्रगढी देवीच्या शतचंडी होमहवन‌ यज्ञाची सांगता सोमवारी (दि. ११) पूर्णाहुतीने मोठ्या उत्साहात झाली. यानिमित्ताने गडावर दोन दिवसांपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी भाविकांनी मंदिर परिसरात महाप्रसादाचाही लाभ घेतला. शुक्रवारी (दि. १५) कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त भव्य यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थानचे रघुनाथ मोरे, पांडुरंग सोनवणे व सुरेश गुळवे यांनी दिली. सीमा लालसिंग बिसेन, वैशाली संतोष बिसेन, सारिका सोनू बिसेन, छाया बिसेन, मीनाबाई बिसेन, कमलाबाई बिसेन, कोकिळाबाई बिसेन या यजमानांच्या हस्ते गणेश पुण्याहवाचन, षोडश मातृकापूजन, नवग्रह भद्रा मंडळ, चौसष्ट योगिनी ग्रह मंडळ, रुद्र कलश व होम हवन असे विविध धार्मिक कार्यक्रम पैठण येथील दत्तात्रय गुरू सेवनकर, अमेय सेवनकर, मयूर सेवनकर या होम हवन यज्ञासाठी बसलेले यजमान. इन्सेटमध्ये देविची मूर्ती. छाया ः राम जोशी. कार्यक्रमाचे सातवे वर्ष ः ^ दरवर्षी कार्तिक महिन्यामध्ये पौर्णिमेनिमित्त यात्रेच्या दोन दिवस अगोदर इंद्रगढी देवीच्या गडावर शतचंडी होमहवन यज्ञ करतो. यामुळे मनाला आत्मिक समाधान मिळते व घरात सुखशांती नांदते. गेल्या सात वर्षांपासून आम्ही हा सोहळा पार पाडत आहोत. या सोहळ्यासाठी आमचे कुटुंबीय व संस्थानचे पदाधिकारी, गावकऱ्यांचे सहकार्य लाभते. याही पुढे आम्ही ही परंपरा अशीच कायम सुरू ठेवू. – संतोष बिसेन, ग्रामपंचायत सदस्य ब्रह्मवृंदांच्या मंत्रघोषात पार पडले. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या शतचंडी होमहवन यज्ञाची सांगता पूर्णाहुतीने झाली. या वेळी इंद्रगढी मातेचा जयजयकार करण्यात आला. दरम्यान, भाविकांच्या उपस्थितीत देवीची महाआरती करण्यात आली. शुक्रवारी (दि. १५) ठेवण्यात आलेल्या यात्रोत्सवामध्ये परिसरातील भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थानतर्फे करण्यात आले.

  

Share