ईशान्येत काटेरी कुंपण…2 राज्यांत विराेध, एकामध्ये 37 किमी काम:नागालँड-मिझाेरामला पाहणीही नाही, अरुणाचलात सुरू

म्यानमारजवळील ईशान्येतील चार राज्यांच्या १६४३ किमी लांब सीमेवर काटेरी कुंपण लावण्याच्या केंद्र सरकारच्या याेजनेत काटे उगवू लागले आहेत. चारपैकी तीन राज्यांत अजूनही काम सुरू झालेले नाही. चाैथे राज्य मणिपूरमध्ये आतापर्यंत केवळ ३७ किमीचे कुंपण लावले आहे. नागालँड, मिझाेराममध्ये तर स्थानिक संघटनांनी जाहीर विराेध केला. नागांची सर्वात माेठी संघटना युनायटेड नागा काैन्सिलने (यूएनसी) स्थानिकांना धमकी दिली आहे. याेजनेवर काम सुरू झाल्यास गंभीर परिणाम भाेगावे लागतील, असे यूएनसीने म्हटले. गेल्या वर्षी संघटनेने लाेकांना विराेध करण्याचे आवाहन केले हाेते. परंतु तेव्हा कामावर बंदी घातली नव्हती. हीच स्थिती मिझाेराममध्येही आहे. दाेन्ही राज्यांत कुंपणासाठी आवश्यक पाहणीदेखील सुरू झालेली नाही. अरुणाचलमध्ये पाहणी सुरू आहे. टेंगनाउपाेलमध्ये फाइकाे व ठाणे गावात स्थानिकांनी विराेध केला. असा प्रकल्प : ३१ हजार काेटी खर्च हाेणार बीआरओ अधिकाऱ्यांनुसार चार राज्यांच्या १५०० किमी सीमेवर कुंपण व रस्ते बांधकाम हाेणार आहे. त्यावर ३१ हजार काेटी रुपये खर्च हाेतील, २० हजार काेटी रुपयांचे कुंपण आणि उर्वरित रस्ते बांधकाम. १४३ किमीत दुर्गम घाट, नद्या आहेत. म्हणून कुंपण लावणे अशक्य. म्यानमारची सर्वात लांब ५२० किमीची सीमा अरुणाचलजवळ आहे. मिझाेराम- ५१०, मणिपूर- ३९८, तर नागालँडला २१५ किमी सीमेवर कुंपण लावलेले आहे.पैकी एका राज्यात काम सुरू आहे. विराेधाचे एक कारण हेही यूएनसीचे एक नेते म्हणाले, कुंपणाला आधीपासूनच विराेध हाेत हाेता. परंतु बीआरओचे महासंचालक लेफ्टनंट जनरल रघू श्रीनिवासन व इतर प्रमुख अधिकाऱ्यांनी इंफाळ राजभवनात मणिपूरचे राज्यपाल अजयकुमार भल्ला यांची भेट घेतल्यानंतर संघटनेने विराेध आणखी कडवा करण्याचा निर्णय घेतला. या बैठकीत कुंपण याेजनेचा आढावा घेतला हाेता. सामायिक संस्कृती, वारशासह वास्तव्य सर्वात माेठी विद्यार्थी संघटना मिझाे जिरलाई पालने (एमझेडपी) शाह यांना पत्र पाठवून मुक्त वावरासंबंधीचा करार रद्द करणे आणि म्यानमार सीमेवर कुंपण लावण्याबाबत फेरविचार करण्याचे आवाहन केले. एमझेडपीचे सरचिटणीस चिंखानमंगा थाेमटे म्हणाले, वसाहतवादाच्या आधी काेणतीही सीमा नव्हती. आम्ही आमची सामायिक संस्कृती, आर्थिक व काैटुंबिक वारशासह राहत हाेताे. नागा लोकांच्या उपजीविकेला धक्का नागा पीपल्स फ्रंटचे (एनपीएफ) सरचिटणीस एस. कासुंग म्हणाले, काटेरी कुंपण लावत असलेली जमीन आमच्या पूर्वजांची आहे. कुंपण लावल्यास सीमेपलीकडे राहणाऱ्या नागा लाेकांच्या उपजीविकेवर संकट येईल. कारण ते आमच्यावर अवलंबून आहेत. म्हणूनच पारंपरिक सीमा ठरवाव्यात. नागा स्टुडंट्स फेडरेशनचे (एनएसएफ) वरिष्ठ नेते एशुओ क्रेलाे काटेरी कुंपण म्हणजे बर्लिनची भिंत असे म्हणतात.

Share