मुंबई बोट दुर्घटनेवर वेळ दिला गेला पाहिजे:अध्यक्ष महोदय तो तुमचाच मतदारसंघ, अजित पवारांनी मांडला सभागृहात मुद्दा

नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात सभागृहात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबई झालेल्या बोट अपघातावर भाष्य केले आहे. यावेळी बोलताना अजित पवार यांनी अध्यक्षांना उद्देशून म्हंटले की आपल्याच मतदारसंघात हा अपघात झाला आहे. त्यामुळे इतर कामकाज बाजूला ठेऊन ज्यांचे जीव गेले आहेत तो मुद्दा सभागृहात मांडला गेला पाहिजे, असे अजित पवारांनी म्हंटले. सभागृहात बोलताना अजित पवार म्हणाले, मी आठ वेळा सभागृहात निवडून आलो आहे. मी अनेक अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली कामकाज करत असताना मी बघितले आहे. आपली मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. आपल्याच मतदारसंघात ती लोक बोटीत बसली आहेत. त्यातील 13 लोकांचा मृत्यू झाला. अधिवेशन सुरू असताना अशाप्रकारची घटना घडली असताना अध्यक्षांना अधिकार असतो की बाकीचे कामकाज बाजूला ठेऊन ज्यांचे जीव गेलेत तो मुद्दा सभागृहात मांडला गेला पाहिजे. पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, आज तुमच्या आमच्या घरातले जर कोणी गेले असते तर ते आपल्याच घरातले गेल्या सारखे आहेत. त्यांचे घेणे न देणे, ती बोट चालली काय दुसरी बोट येऊन धडकते काय कोणाचा कोणाला मेळ नाही. अध्यक्ष महोदय 13-14 कोटी जनतेला वाटेल की हे सभागृह चाललेले आहे, इथे माणसे त्या ठिकाणी इतकी मृत्युमुखी पडलेली आहेत आणि त्याचा मुद्दा काढला जातोय, मांडायचा प्रयत्न केला जात आहे. तर त्यांचा मांडण्याचा अधिकार आहे. या संदर्भात आज जरी पुरवण्या मागण्या वगैरे असल्या तर अध्यक्ष महोदय एखादी व्यक्ती म्हणजे काही गंभीर घटना घडली तर ताबडतोब बाकीचे सगळे कामकाज बाजूला ठेऊन सगळे स्वीकारले जात आहे चर्चा केली जाते. पण, यात अध्यक्ष महोदय 13 लोक गेलेली आहेत आणि तुमच्या मतदारसंघाचाच एरिया आहे अध्यक्ष महोदय. आज कोण प्रवासी असतील काय असतील त्यांच्याबद्दल मुख्यमंत्री महोदयांनी काही निवेदन केलेले आहेत. पण माझी विनंती आहे की बोलायला वेळ दिला गेला पाहिजे. दरम्यान, ‘गेट वे ऑफ इंडिया’ जवळ समुद्रात नौदलाच्या स्पीडबोटने जोराच धडक दिल्याने प्रवशी बोट उलटल्याची घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली होती. या दुर्घटनेत 13 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 101 प्रवाशांना वाचवण्यात आले आहे. तसेच काही लोक बेपत्ता झाले असून त्यांची शोधमोहीम सुरू आहे. कुलाबा येथे फेरीबोटीला नेव्हीच्या स्पीड बोटीने बुधवारी धडक दिली. या घटनेप्रकरणी भरधाव वेगाने बोट चालवल्याप्ररकणी नेव्हीच्या चालकावर कुलाबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातातील दोन जण अद्यापही बेपत्ता आहेत. मुंबई पोलिस कोस्टल पेट्रोलिंग आणि इतर यंत्रणांच्या मदतीने शोध मोहीत अजूनही सुरू आहे. हंसराज सतराजी भाटी आणि जोहान निसार अहमद अशी बेपत्ता प्रवाशांची नावे आहेत, अशी माहिती पोलिस उपायुक्त प्रविण मुंडे यांनी माध्यमांना दिली.

  

Share