अमित शहा यांच्या उपस्थितीत पुण्यातील एका कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी थेट गुजरातची घोषणा दिली. त्यामुळे आता मोठे राजकीय वादंग निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विरोधकांच्या प्रतिक्रिया देखील येत असून जोरदार टीका केली जात असताना एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे. समोर बसलेली सगळी मंडळी ही गुजराती होती एकनाथ शिंदे म्हणाले, पुण्यात एक कार्यक्रम होता पुणे गुजराती नावाने एक संस्था आहे. त्या संस्थेच्या माध्यमातून पुण्यात राहणाऱ्या गुजराती बांधवांनी मोठे जयराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बांधले आहे. तिथे हॉल आहे तसेच खेळाडूंना प्लॅटफॉर्म मिळवून देण्याचे काम त्यांनी केले आहे. त्याचे लोकार्पण होते. मी नेहमी जय हिंद, जय महाराष्ट्र म्हणतच असतो. जय हिंद म्हणजे देशाचा अभिमान, जय महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राचा अभिमान आणि शेवटी मी जय गुजरात म्हणालो, त्याचे कारण असे की समोर बसलेली सगळी मंडळी ही गुजराती होती. त्यांनी पिढ्यांपिढ्या या महाराष्ट्राला आपली कर्मभूमी मानली आहे आणि जो प्रकल्प उभा राहिला आहे तो सर्वांसाठी आहे. त्याची प्रशंसा आपण करत असतो म्हणून मी ते म्हटले. जिनके घर शिशे के होते हें.. पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, मराठी हा आमचा श्वास आहे, हिंदुत्व आमचा आत्मा आहे. मराठीबद्दल जे काही टीका करायचे काम करत आहेत. मी यावर भाष्य करू इच्छित नाही. परंतु, जिनके घर शिशे के होते हें वो दुसरों के घर पर पत्थर नहीं फेका करते, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंची एक व्हिडिओ क्लिप दाखवली. या व्हिडिओ क्लिपमध्ये उद्धव ठाकरे एका सभेत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात असे म्हणताना दिसत आहेत. गुजरात पाकिस्तान आहे का? एकनाथ शिंदे म्हणाले, गुजरात पाकिस्तान आहे का? गुजरात पाकिस्तानमध्ये आहे का? निवडणुकीत त्यांनी पाकिस्तानी झेंडे नाचवले, त्यावेळी मराठी प्रेम कुठे गेले होते? आमची नाळ या मराठीशी जोडली आहे, या मातीतच पुरलेली आहे. त्यामुळे मराठीच्या बद्दल आम्हाला शिकवण्याची गरज नाही. आम्ही मराठी मातीशी जुळलो आहोत, सुट्ट्या पण इथेच घालवतो आम्ही. त्यांनी केलेले मतासाठी होते. मी जे केले ते तिथल्या लोकांनी केलेल्या कामाची प्रशंसा करण्यासाठी. हे सगळे राजकारण करत असून यावर मी आत्ताच बोलणार नाही. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शहा सेना म्हणत टीका केली होती. यावर एकनाथ शिंदे म्हणाले, ही शिवसेना आहे, बाळासाहेब आणि आनंद दिघे यांच्या विचाराची शिवसेना आहे. महाराष्ट्रातील जनतेने आम्हाला अधिकृत मान्यता दिली आहे. खरी शिवसेना कोणाची आहे आणि कोण कुठल्या शिवसेनेचा आहे हे कोणी सांगायची गरज नाही. मला जास्त स्पष्टीकरण देण्याची गरज वाटत नाही. एकनाथ शिंदेंनी दिला ‘जय गुजरात’चा नारा:अमित शहांपुढे फोडले वादाला तोंड; विरोधी पक्षातील नेत्यांचा ‘लोटांगण घातल्याचा आरोप’ राज्यात मराठी भाषेच्या मुद्द्यावरून चांगलेच वातावरण तापलेले आहे. मराठी भाषेच्या मुद्द्यावरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे उद्या विजयी मेळावा साजरा करत आहेत. मात्र या मेळाव्याच्या आदल्याच दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या हातात आयते कोलीत दिले आहे. अमित शहा यांच्या उपस्थितीत पुण्यातील एका कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी थेट गुजरातची घोषणा दिली. त्यामुळे आता मोठे राजकीय वादंग निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वाचा सविस्तर