जनतेच्या प्रश्नावर सरकारला धारेवर धरा, सळो की पळो करून सोडा:उद्धव ठाकरे यांचे ‘शिवसेना’ खासदारांना आदेश जनतेच्या प्रश्नावर सरकारला धारेवर धरा, सळो की पळो करून सोडा:उद्धव ठाकरे यांचे ‘शिवसेना’ खासदारांना आदेश

जनतेच्या प्रश्नावर सरकारला धारेवर धरा, सळो की पळो करून सोडा:उद्धव ठाकरे यांचे ‘शिवसेना’ खासदारांना आदेश

दिल्लीमध्ये सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे हे सध्या दिल्लीत आहेत. या दरम्यान ते इंडिया आघाडीच्या बैठकीला देखील उपस्थित राहणार आहेत. मात्र त्याआधी त्यांनी त्यांच्या पक्षाच्या खासदारांची बैठक घेत त्यांना काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. जनतेच्या प्रश्नावर सरकारला धारेवर धरा, त्यांना सळो की पळो करुन सोडा, असे आदेशच उद्धव ठाकरे यांनी आपल्या खासदारांना दिले आहेत. उद्धव ठाकरे यांनी बुधवारी दिल्लीत खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी त्यांच्या शिवसेनेतील लोकसभा आणि राज्यसभा खासदारांची एकत्रित बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी मोदी सरकारवर देखील टीका केली. सत्ता हेच मोदी सरकारचे ध्येय आहे, त्यांना जन हिताशी काही देणे घेणे नाही, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. मात्र आपल्या पक्षाचा जन्मच मुळात जनहिताचा लढा देण्यासाठी झालेला आहे. त्यामुळे तुम्ही संसदेत जनतेच्या प्रश्नावर ठामपणे भूमिका घ्या, सरकारला सळो की पळो करून सोडा, असे आदेश त्यांनी आपल्या खासदारांना दिले आहेत. या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या समोर त्यांच्या पक्षाच्या खासदारांनी आपापल्या संबंधित अडचणी देखील सांगितल्या. या बैठकीला आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्यासह शिवसेनेचे सर्वच खासदार उपस्थित होते. या बैठकीत आगामी काळात संसदेमध्ये खासदारांनी मांडण्याच्या भूमिकेबाबत देखील चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उद्धव ठाकरेंचा तीन दिवस दिल्लीत तळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे 3 दिवस दिल्ली दौऱ्यावर आहेत. ते खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी पोहोचल्यानंतर त्यांनी सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. याशिवाय त्यांनी आपल्या पक्षाच्या खासदारांशीही संवाद साधला. उद्धव ठाकरे हे राहुल गांधींनी आयोजित केलेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीला हजर राहणार आहेत. या दिल्ली दौऱ्यात आमदार आदित्य ठाकरे हे देखील उद्धव ठाकरेंसोबत आहेत.

  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *